Vodafone-Idea कंपनी बंद पडण्याच्या मार्गावर? कुमार मंगलम बिर्ला स्वत:ची हिस्सेदारी विकण्याच्या तयारीत

vodafone Idea | बिर्ला यांच्या पत्रातील उल्लेखानुसार Vodafone-Idea लिमिटेड कंपनी डबघाईला आली आहे. आता कंपनीचा गाडा हाकणे अवघड असल्याचे बिर्ला यांनी म्हटले आहे.

Vodafone-Idea कंपनी बंद पडण्याच्या मार्गावर? कुमार मंगलम बिर्ला स्वत:ची हिस्सेदारी विकण्याच्या तयारीत
व्होडाफोन आयडियासह सर्व दूरसंचार कंपन्यांना दिलासा
Follow us
| Updated on: Aug 03, 2021 | 7:34 AM

नवी दिल्ली: आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला यांनी कर्जाच्या विळख्यात सापडलेल्या Vodafone-Idea लिमिटेड कंपनीतील आपला हिस्सा सरकार किंवा अन्य कंपनीला विकण्याची तयारी दर्शविली आहे. कुमार मंगलम बिर्ला यांनी कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांना पत्र लिहून यासंदर्भात माहिती दिली. Vodafone-Idea लिमिटेडच्या डोक्यावर 58,254 कोटी रुपयांचे कर्ज होते. यापैकी 7,854.37 कोटी रुपयांचे कर्ज कंपनीने फेडले होते. मात्र, अजूनही कंपनीच्या डोक्यावर 50,399.63 कोटींचे कर्ज आहे.

Vodafone-Idea लिमिटेडमध्ये कुमार मंगलम बिर्ला यांचा 27 टक्के हिस्सा आहे. त्यांनी राजीव गौबा यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, स्पेक्ट्रमचे पैसे भरण्यासाठी पुरेसा अवधी आणि अन्य काही गोष्टी जुळून न आल्याने कंपनीत कोणीही गुंतवणूक करण्यास इच्छूक नाही, असे कुमार मंगलम बिर्ला यांनी म्हटले. गेल्याच महिन्यात केंद्र सरकारने Vodafone-Idea लिमिटेडला परकीय गुंतवणुकीच्या माध्यमातून 15000 कोटी रुपयांचा निधी उभारण्याची परवानगी दिली होती.

Vodafone-Idea लिमिटेड दिवाळखोरीत निघणार?

बिर्ला यांच्या पत्रातील उल्लेखानुसार Vodafone-Idea लिमिटेड कंपनी डबघाईला आली आहे. आता कंपनीचा गाडा हाकणे अवघड असल्याचे बिर्ला यांनी म्हटले आहे. सध्याच्या घडीला Vodafone-Idea लिमिटेडकडे 27 कोटी ग्राहक आहेत. त्यामुळेच या कंपनीची सूत्रे सरकार किंवा अन्य कोणाकडे सोपवून कारभार सुरु ठेवण्याचा विचार कुमार मंगलम बिर्ला यांनी बोलून दाखवला आहे.

व्होडाफोन आयडियाने आपल्या 27 कोटी वापरकर्त्यांना दिला इशारा

व्होडाफोन आयडिया (Vi) ने आपल्या 27 कोटी वापरकर्त्यांना ऑनलाइन फसवणूक करणाऱ्यांपासून दूर राहण्यास सांगितले आहे. हे फसवणूक करणारे नो युवर कस्टमर (KYC) च्या माध्यमातून वापरकर्त्यांना लक्ष्य करत आहेत. सायबर फसवणुकीसंदर्भात एअरटेलने जारी केलेल्या अॅडवायजरीनंतर व्हीआय(Vi)चा इशारा आला आहे. एअरटेलच्या सर्व ग्राहकांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात फसवणूक करणारे नवीन तंत्रज्ञानाद्वारे मोबाईल वापरकर्त्यांना कसे शिकार बनवत आहेत हे मुख्य कार्यकारी अधिकारी गोपाळ विठ्ठलल यांनी सांगितले आहे. असाच एक प्रकार आता व्हीआय(Vi) सब्सक्राइबर्समध्येही दिसून येत आहे, जिथे व्होडाफोन आयडियाचे कर्मचारी बनून फसवणूक करणारे लोक त्यांचा वैयक्तिक डेटा लोकांकडून घेत आहेत आणि वापरकर्त्यांना धमकावत आहेत. यापासून सावध राहावे, असे कंपनीच्यावतीने ग्राहकांना सांगण्यात आले आहे.

संबंधित बातम्या:

सावधान! व्होडाफोन आयडियाने आपल्या 27 कोटी वापरकर्त्यांना दिला इशारा, जिओ आणि एअरटेल वापरकर्त्यांनीही सतर्क रहा

व्होडाफोन, आयडिया युजर्ससाठी आनंदाची बातमी, आता या 23 रिचार्ज पॅकवर मिळवा 60 रुपयांपर्यंत कॅशबॅक

Good News! आता एकच अकाऊंट 25 जणांमध्ये वापरा, Idea आणि Vodafone ची धमाकेदार ऑफर

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.