1 वर्षात FD वर मिळणार 6 टक्के जास्त फायदा, 31 मार्चपर्यंत पैसा होईल डबल
ही एक म्युच्युअल फंड ईएलएसएस (ELSS) योजना आहे. याला ईएलएसएसची इक्विटी-लिंक्ड सेव्हिंग स्कीमही म्हटले जाते.
मुंबई : तुम्हाला एफडीकडून आणखी परतावा मिळवायचा असेल तर आणि यासोबत जर तुम्हाला करातही सूट हवी असेल तर एलआयसी एमएफ कर योजना – डायरेक्ट प्लॅन (LIC MF Tax Plan – Direct Plan) तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकेल. ही एक म्युच्युअल फंड ईएलएसएस (ELSS) योजना आहे. याला ईएलएसएसची इक्विटी-लिंक्ड सेव्हिंग स्कीमही म्हटले जाते. ईएलएसएस योजनांमध्ये आयकर कायद्याच्या कलम 80C सी अंतर्गत म्युच्युअल फंड योजनेस SIP मार्फत सूट देण्यात आली आहे. (lic india mutual fund tax plan direct plan growth gets two benefit)
जाणून घेऊया याबद्दल…
एलआयसी एमएफ कर योजना (LIC MF Tax Plan – Direct Plan) – गेल्या एका वर्षात या फंडाने 41 टक्के परतावा दिला आहे. तर एफडीला वर्षाकाठी फक्त 6% व्याज मिळते. जर 5 वर्षात परतावा पाहिला तर 10 हजार रुपयांची रक्कम वाढून 20 हजार रुपये झाली आहे. यावेळी, 100 टक्क्यांहून अधिक रिटर्न मिळाले आहे. हा निधी वर्ष 2013 मध्ये सुरू करण्यात आला होता. त्यानंतर, निधीने 194 टक्क्यांचा भरघोस परतावा दिला आहे.
आता पैसे गुंतवणे योग्य?
ही एक लार्जकॅप योजना आहे. टॉप स्टॉकमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. आयसीआयसीआय बँक (ICICI), एचडीएफसी बँक (HDFC), इन्फोसिस, टीसीएस, एव्हीन्यू सुपरमार्ट्स यासारख्या बंपर रिटर्न कंपन्यांच्या समभागांचा या फंडामध्ये समावेश आहे.
कोटक महिंद्र बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटा केमिकल्स भारती एअरटेल आणि बजाज फायनान्ससारख्या निफ्टी – 50 चे टॉप शेअर्सदेखील कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये आहेत. म्हणूनच भविष्यातही त्याच्या चांगल्या कामगिरीची अपेक्षा केली जाऊ शकते.
ELSS फंडाशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी…
या फंडांमध्ये लॉक-इन पीरियड्स असतात. म्हणूनच, पैशांची गुंतवणूक करण्यापूर्वी त्याची माहिती असणं महत्त्वाचं आहे. अल्पावधीत या योजनांमध्ये चढउतार दिसून येतात. परंतु दीर्घकाळात जास्त उत्पन्न देण्याची त्यांची क्षमता आहे. जेव्हा तुम्हाला इक्विटी योजनेत गुंतवणूक करणे परवडेल तेव्हाच तुम्ही ईएलएसएसमध्ये पैसे गुंतवावे. जोखीम या योजनांशी संबंधित आहे. (lic india mutual fund tax plan direct plan growth gets two benefit)
संबंधित बातम्या –
Petrol Diesel : पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमुळे दिलासा, वाचा तुमच्या शहरातले ताजे दर
SBI ची खास सुविधा! विना कागदपत्रं एक मिनिटांत उघडा खातं, वाचा संपूर्ण प्रोसेस
घरबसल्या सुरू करा ‘हा’ व्यवसाय, वेळेची मर्यादा नाही आणि कामाचा लोडही नाही!
Start Business in India : कमी बजेटमध्ये घर बसल्या सुरू करा बिझनेस, तुमच्यासाठी खास 5 आयडिया
(lic india mutual fund tax plan direct plan growth gets two benefit)