LIC IPO: एलआयसीचं नियोजन अंतिम टप्प्यात, आयपीओची तारीख ठरली?

आर्थिक वर्ष 2021-22 च्या अर्थसंकल्पात 1.75 लाख कोटी रुपये निर्गृंतवणुकीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. गेल्या आर्थिक वर्षात 32,835 कोटी रुपये निर्गृंतवणुकीतून उभारण्यात आले होते.

LIC IPO:  एलआयसीचं नियोजन अंतिम टप्प्यात, आयपीओची तारीख ठरली?
LIC IPO
Follow us
| Updated on: Jan 27, 2022 | 11:42 PM

नवी दिल्ली : भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) च्या आयपीओची सर्वांना प्रतीक्षा आहे. नेमका एलआयसीचा आयपीओ कधी दाखल होणार याकडं अर्थजगताचं लक्ष लागलं आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआईसी) इनिशियल पब्लिक ऑफरिंग (IPO) विवरण पुस्तिका अंतिम टप्प्यात आहे. एलआयसीकडून लवकरच सेबीला गुंतवणूक धोरण सादर केले जाणार आहे. अर्थ खात्यातील वरिष्ठ अधिकारी तुहिन कांत यांनी मार्च अखेरपर्यंत एलआयसी आयपीओ सूचीबद्ध (लिस्टेड) करण्याचे उद्दिष्ट असल्याचे म्हटले आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात एलआयसीची निर्गृंतवणूक (LIC DISINVESTMENT) रक्कम समाविष्ट करण्यात आली असल्याचे कांत यांनी स्पष्ट केले आहे. आर्थिक वर्ष 2021-22 च्या अर्थसंकल्पात 1.75 लाख कोटी रुपये निर्गृंतवणुकीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. गेल्या आर्थिक वर्षात 32,835 कोटी रुपये निर्गृंतवणुकीतून उभारण्यात आले होते.

केंद्राचं आयपीओसाठी प्रयत्न

केंद्र सरकारने सर्वात मोठ्या विमा कंपनीच्या आयपीओसाठी मोठी पावलं उचलली आहेत. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यांत 10 मर्चंट बँकरची नियुक्ती करण्यात आली होती. यामध्ये गोल्डमॅन सॅक्स, सिटी ग्रूप आणि नोमुरा यांचा समावेश आहे. कायदेशीर सल्लागार म्हणून सिरिल अमरचंद मंगलदास यांची नियुक्ती केली होती. एलआयसीचा आयपीओ या आर्थिक वर्षात येणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. एलआयसीच्या आयपीओ कधी येऊन धडकणार याची घोषणा अर्थसंकल्पात होण्याची दाट शक्यता आहे.

विक्रमी आयपीओची चिन्ह

इश्य प्राईसवर एलआयसी मार्केट कॅपमध्ये देशातील पहिल्या तीन कंपन्यांमध्ये सहज समाविष्ट होऊ शकेल. लिस्टिंगनंतर एलआयसीची कामगिरी दमदार राहिली तर विमा कंपनीची दादागिरी आयपीओ आणि शेअर बाजारात ही चालेल. कंपनी आयआयएल आणि टीसीएलही मागे टाकण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सरकारने या आर्थिक वर्षात निर्गुंतवणुकीच्या माध्यमातून 1.75 लाख कोटी रुपये उभे करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

आयपीओ म्हणजे काय?

आयपीओ म्हणजे इनिशियल पब्लिक आॕफर. मार्केटमध्ये पैसे गोळा/उभारण्याचा मार्ग आहे. कंपनीला पैशाची आवश्यकता असते. तेव्हा शेअर बाजारपेठेत लिस्ट केले जातात. आयपीओ द्वारे मिळणारी रक्कम कंपनी स्वतःच्या निर्णयानुसार खर्च करतात. या रकमेचा वापर कंपनी लोन भरण्यासाठी किंवा कंपनीच्या फायद्यासाठी वापरली जाऊ शकते. स्टॉक एक्स्चेंज वर शेअर्स लिस्टिंगमुळे कंपनीला आपल्या शेअरला योग्य किंमत मिळविण्यासाठी मदत होते.

इतर बातम्या :

Video: बुलडाण्यात भीषण अपघात, कारच्या धडकेत मुलगा रस्त्यावरुन उडाला, जगण्याशी झूंज

MPSC Exam : एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, गट ब मुख्य परीक्षा न्यायालयीन कारणांमुळे लांबणीवर

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.