IPO पूर्वीच LIC च्या कमाई मध्ये मोठी घसरण, डिसेंबर महिन्यामध्ये नवीन योजना विक्रीमध्ये तब्बल 20 टक्‍क्‍यांची पीछेहाट!

LIC IPO चर्चा जोरात असतानाच भारतीय जीवन विमा निगम ला व्यवसायात मोठा फटका सहन करावा लागला डिसेंबर महिन्याच्या विमा  विक्रीमध्ये 20 टक्क्यांची घसरण नोंदविण्यात आली. मैदानात उतरण्या पूर्वीच पहेलवानाची दमछाक  पहायला मिळाली.

IPO पूर्वीच LIC च्या कमाई मध्ये मोठी घसरण, डिसेंबर महिन्यामध्ये नवीन योजना विक्रीमध्ये तब्बल 20 टक्‍क्‍यांची पीछेहाट!
Follow us
| Updated on: Jan 08, 2022 | 2:11 PM

मुंबई : IPO येण्यापूर्वीच एलआयसी च्या कमाई मध्ये प्रचंड घसरण नोंदविण्यात आली डिसेंबर महिन्याच्या व्यवसायामध्ये नवीन पोलिसी विक्रीमध्ये 20 टक्क्यांची पीछेहाट झाली गेल्या महिन्यात एलआयसीची नवीन व्यवसायातील घोडदौडीला ब्रेक लागला एलआयसीचा व्यवसाय 20.30 टक्के घसरुन 11,434.13 कोटी रुपयांवर आला. याच्या उलट देशातील इतर सक्रीय 23 खाजगी विमा कंपन्यांच्या व्यवसायात कमालीची ऋद्धि बघायला मिळाली नवीन पॉलिसी व्यवसायांमध्ये या कंपन्यांनी गेल्या डिसेंबर महिन्यामध्ये  29.83 टक्क्यांची वाढ नोंदवून 13,032.33 कोटी रुपयांचा व्यवसाय केला त्या अगोदरच्या वर्षात याच डिसेंबर महिन्यामध्ये या कंपन्यांचा व्यवसाय अवघा 10,037.72 कोटी रुपये होता. विमा कंपन्यांचा डिसेंबर 2021 मधील नवीन विमा पॉलिसी व्यवसाय 24,466.46 कोटी रुपये झाला. विमा विनियमन मंडळ (IRDA) मी डिसेंबर महिन्याची आकडेवारी जाहीर केली यामधील आकडेवारीवरून हे स्पष्ट झाले आहे की भारतीय जीवन विमा निगम सह इतर 23 खाजगी विमा कंपन्यांची व्यवसायाची गती स्थिर आहे डिसेंबर 2020 मध्ये 24,383.42 कोटी रुपयांचा प्रीमियम जमा करण्यात आला होता

HDFC स्टॅंडर्ड लाइफच्या कमाई मध्ये वाढ

खाजगी विमा कंपनी एचडीएफसी स्टॅंडर्ड लाइफ ने त्यांच्या व्यवसायात कमालीची ऋद्धि नोंदवली नवीन विमा विक्रीमध्ये कंपनीने कमाईचा उच्चांक नोंदवला. व्यवसायामध्ये 55.67 टक्के वाढ नोंदवत कंपनीने  2,973.74 कोटी रुपये कमावले तर एसबीआय लाइफ ने नवीन विमा विक्रीमध्ये वाढ नोंद केली कंपनीच्या आकडेवारीनुसार नवीन विमा विक्रीमध्ये 26.72 टक्क्यांची वाढ झाली कंपनीने 2,943.09 कोटी रुपयांचा व्यवसाय केला या स्पर्धेत आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफने डिसेंबर 2020 च्या तुलनेमध्ये कमी व्यवसायाची नोंद केली कंपनीच्या व्यवसायात 6.02 टक्क्यांची घसरण होऊन व्यवसाय 1,380.93 कोटी झाला व्यवसाय घसरणीच्या यादीमध्ये कोटक महिंद्रा लाइफ, ऐगॉन लाइफ, फ्यूचर जनरली या कंपन्यांनीही ओळीत नंबर लावला नव्या विमा विक्रीत या कंपन्यांना एक दमदार कामगिरी करता आली नाही

निर्गुंतवणुकीसाठी कवायत

विमा क्षेत्रात  FDI चे सध्याचे धोरण भारतीय विमा निगम मधील निर्गुंतवणुकीत अडथळा ठरत आहे. धोरणात आमूलाग्र बदल केला तरच LIC IPO बाजारात दाखल होऊ शकतो.FDI नियमांत बदल करण्यासाठी  डिपार्टमेंट ऑफ फायनेंशियल सिस्टम (DFS) आणि सरकारचे निर्गुंतवणूक खाते( DIPAM) यांच्यांत चर्चा सत्र सुरू आहे. याविषयी दोन बैठका झाल्या आहेत. त्यानंतर DPIIT, DFS, DIPAM यांच्यांत निर्गुंतवणूक धोरणाविषयी सहमती झाली आहे.

FDI नियमांमध्ये बदलासंबंधी चा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे प्रस्ताव तयार केल्यानंतर तो मंजुरीसाठी कॅबिनेट समोर ठेवण्यात येणार आहे. या बदलाचा थेट फायदा LIC IPO ला सुद्धा मिळणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार  या  जानेवारी शेवटी नियमातील हा बदल लागू करण्यात येईल. तर दुसरीकडे  सार्वजनिक योजनेत FPI, FDI या दोघांच्या प्रवेशाला अनुमती आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, LIC कायद्यात विदेशी थेट गुंतवणूक की संबंधी कुठलीच माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे SEBI मापदंडासाठी सरकारने निर्गुंतवणुक धोरणात बदलाची कवायत सुरू केली आहे.

संबंधित बातम्या

LIC IPO च्या दमदार प्रदर्शनासाठी केंद्र सरकारचा टेकू, विमा क्षेत्रात निर्गुंतवणुकीची मात्रा, विदेशी थेट गुंतवणुकदारांना आकर्षित करण्यासाठी सरकारची कसरत

शेअर्स तारण ठेऊन मिळवा कर्ज, देशातील पहिल्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर करा व्यवहार 

कर भरण्याच्या मुदतवाढीस नकार; आयकर विभागाला कायदेशीर नोटीस, ओडिशा टॅक्स अॅडव्होकेट असोसिएशनने धरला विभागाच्या तांत्रिक चुकांवर नेम 

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...