AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केवळ 10000 रुपयांची गुंतवणूक, LIC ची ‘ही’ पॉलिसी तुमच्या मुलाला लखपती बनवणार

तुम्ही तुमच्या मुलांच्या भविष्याचा विचार करत असाल तर एलआयसीची (LIC) 'न्यू चिल्ड्रन्स मनी बॅक प्लॅन' (LIC New Children’s Money Back Plan) पॉलिसी एक उत्तम पर्याय आहे.

केवळ 10000 रुपयांची गुंतवणूक, LIC ची 'ही' पॉलिसी तुमच्या मुलाला लखपती बनवणार
प्रतिकात्मक फोटो
| Edited By: | Updated on: Jun 11, 2021 | 10:15 PM
Share

मुंबई : तुम्ही तुमच्या मुलांच्या भविष्याचा विचार करत असाल तर एलआयसीची (LIC) ‘न्यू चिल्ड्रन्स मनी बॅक प्लॅन’ (LIC New Children’s Money Back Plan) पॉलिसी एक उत्तम पर्याय आहे. यामध्ये 10 हजार रुपयांची गुंतवणूक करता येते. या योजनेअंतर्गत मुलाचे वय 18 वर्ष होईपर्यंत लाखोंचा परतावा देण्यात येईल. ज्यामुळे त्याचे शिक्षण किंवा इतर गरजा पूर्ण करण्यात कोणतीही अडचण येणार नाही. (LIC New Children’s Money Back Plan will make your child a millionaire, know details)

एलआयसीची न्यू चिल्ड्रन्स मनी बॅक प्लॅन पॉलिसी 25 वर्षांची आहे. यात मॅच्योरिटी रक्कम टप्प्या टप्प्यांमध्ये मिळते. या योजनेंतर्गत एलआयसीकडून मुलांचे वय 18 वर्षे, 20 वर्षे आणि 22 वर्षे इतके झाल्यानंतर मूलभूत रकमेपैकी 20-20 टक्के रक्कम दिली जाते. उर्वरित 40 टक्के रक्कम मुलाची 25 वर्ष पूर्ण झाल्यावर दिली जाते. इतकेच नव्हे तर मॅच्युरिटीच्या रकमेसह बोनसदेखील दिला जातो.

पॉलिसीबद्दलच्या खास बाबी

  • एलआयसीची ‘न्यू चिल्ड्रन्स मनी बॅक प्लॅन’ पॉलिसी घेण्यासाठी किमान वय 0 वर्षे ते कमाल वय 12 वर्षे इतकं आहे.
  • किमान 10,000 रुपयांच्या विमा रकमेसह पॉलिसी घेता येते, परंतु जास्तीत जास्त विम्याच्या रकमेची कोणतीही मर्यादा नाही.
  • प्रीमियम माफीचा बेनिफिट रायडर-ऑप्शन देखील उपलब्ध आहे.
  • पॉलिसीधारकाचा पॉलिसी मुदतीदरम्यान मृत्यू झाल्यास, नामित व्यक्तीस विम्याच्या रक्कमेशिवाय रिव्हर्शनरी बोनस आणि अंतिम अतिरिक्त बोनस उपलब्ध मिळेल. डेथ बेनिफिट एकूण प्रीमियम पेमेंटच्या 105% पर्यंत असेल.

पॉलिसी घेण्याकरिता आवश्यक कागदपत्रे

पॉलिसी घेण्यासाठी पालकांकडे त्यांचे आणि मुलाचे आधार कार्ड असले पाहिजे. याशिवाय पॅनकार्ड आणि अॅड्रेस प्रूफची फोटोकॉपी जमा करावी लागेल. या पॉलिसीसाठी विमाधारकाची वैद्यकीय कागदपत्रे देखील आवश्यक असतात. अर्जासाठी एलआयसी शाखेकडून योजनेशी संबंधित फॉर्म घ्या आणि कागदपत्रे पूर्ण झाल्यानंतर सबमिट करा.

संबंधित बातम्या : 

तुमच्याकडे दोन रुपयांचं नाणं आहे का? मग तुम्हीही होऊ शकता लखपती, जाणून घ्या कसे?

Personal Loan घेताय, मग ‘या’ गोष्टींची घ्या काळजी, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Investment tips : 5 वर्षात रक्कम डबल, SIP सुरु करण्यासाठी 5 चांगल्या योजना

(LIC New Children’s Money Back Plan will make your child a millionaire, know details)

मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.