दिवसाला 28 रुपये खर्च करून मिळवा 2 लाखांचा विमा, जाणून घ्या काय आहे LIC ची खास योजना
या पॉलिसीचे सगळ्यात महत्त्वाचे फायदे म्हणजे सुरक्षा आणि बचत. जाणून घेऊयात काय आहेत पॉलिसीचे फायदे आणि वैशिष्ट्ये.
नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी जीवन विमा कंपनी ‘लाइफ इन्श्युरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ (LIC) ने ग्राहकांसाठी आणखी एक खास योजना आणली आहे. LIC ने कमी उत्पन्न (low income ) असणार्या ग्राहकांसाठी मायक्रो बचत विमा पॉलिसी (Micro Bachat Insurance Policy) सुरू केली आहे. या पॉलिसीचे सगळ्यात महत्त्वाचे फायदे म्हणजे सुरक्षा आणि बचत. जाणून घेऊयात काय आहेत पॉलिसीचे फायदे आणि वैशिष्ट्ये. (lic scheme for low income group micor bachat Insurance Policy know its benefits)
या योजनेमुळे अपघाती मृत्यू झाल्यास कुटुंबाला आर्थिक मदत मिळणार आहे. तसंच खातेधारकारा पॉलिसीच्या मॅच्युरिटीनंतर एकरकमी रक्कमही मिळणार आहे. या योजनेत 50 हजार ते 2 लाख रुपयांचा विमा उपलब्ध आहे. ही एक नॉन-लिंक्ड विमा योजना आहे. या योजनेंतर्गत पॉलिसीमध्ये लॉयल्टीचादेखील फायदा होणार आहे. जर एखाद्या खाते धारकाने 3 वर्षांसाठी प्रीमियम दिला असेल तर त्याला मायक्रो सेव्हिंग्ज प्लॅनमध्ये कर्जाची सुविधा देखील उपलब्ध आहे.
विमा घेण्यासाठी वयोमर्यादा या योजनेचा लाभ घेण्यासाठी कंपनीने वयोमर्यादा निश्चित केली आहे. यानुसार, फक्त 18 ते 55 वयोगटातील लोकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. यामध्ये कोणत्याही वैद्यकीय तपासणीची आवश्यकता नाही असंही कंपनीनं स्पष्ट केलं आहे. या पॉलिसीमध्ये जर एखाद्याने 3 वर्षांसाठी नियमित प्रीमियम भरला तर त्यानंतर त्यांना प्रीमियम भरता येणार नाही. यामध्ये खाते धारकाला 6 महिने विम्याची सुविधा सुरू असेल.
दररोज 28 रुपये खर्च करून मिळला 2 लाखांचा विमा या योजनेमध्ये जर 18 वर्षाच्या व्यक्तीने 15 वर्षांसाठी योजना घेतली तर त्याला प्रति हजार 51.5 रुपये प्रीमियम द्यावा लागेल. त्याचबरोबर, 25 वयोगटातील व्यक्तीला त्याच कालावधीसाठी 51.60 रुपये आणि 35 वर्षाच्या व्यक्तिला प्रति हजार रुपये 52.20 रुपये प्रीमियम भरावा लागेल.
10 वर्षांच्या योजनेत 85 हजार 45 ते 91.9 रुपये प्रति हजार प्रीमियम असणार आहे. यात प्रीमियममध्ये 2 टक्के सूटदेखील देण्यात आली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर हा विमा तुम्हाला आवडला नसेल तर तुम्ही 15 दिवसांच्या आत सरेंडर देखील करू शकता.
या पॉलिसीसाठी मॅच्युरिटीचं कमाल वय 70 वर्ष असेल. ही एक लाइफ इन्श्युरन्स पॉलिसी आहे, म्हणून तुम्हाला प्रीमियम पेमेंटवर कलम 80 C अंतर्गत आयकरात सूटदेखील मिळेल.
इतर बातम्या –
घर बसल्या खातं उघडा अन् मिळावा 3 सेकंदात 25 लाखांचं कर्ज! या बँकेची धमाकेदार ऑफर
एका वर्षात 1 लाखाचे झाले 9 लाख रुपये, या गुंतवणुकीत मिळाला बंपर रिटर्न
VIDEO | Uday Samant | महाविद्यालयं सुरु करण्याचा निर्णय अद्याप नाही, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांची माहितीhttps://t.co/pN6Bb2nwM6 @samant_uday
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 6, 2020
(lic scheme for low income group micor bachat Insurance Policy know its benefits)