LIC POLICY: ‘एलआयसी’ची ग्राहकांसाठी नवी पॉलिसी, सर्वोत्तम परताव्यासह आजीवन बचत; जाणून घ्या-तपशील

भारतीय जीवन विमा महामंडळानं नव्या पॉलिसीची घोषणा केली आहे. एलआयसीची विमा रत्न ही पॉलिसी ग्राहकांसाठी आज सार्वजनिक करण्यात आली. एलआयसीद्वारे बॉम्बे स्टॉक एक्स्जेंजला याविषयी अधिकृत माहिती सादर करण्यात आली आहे.

LIC POLICY: ‘एलआयसी’ची ग्राहकांसाठी नवी पॉलिसी, सर्वोत्तम परताव्यासह आजीवन बचत; जाणून घ्या-तपशील
Image Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: May 27, 2022 | 11:22 PM

नवी दिल्ली : भारताची सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची विमा कंपनी (INSURANCE COMPANY) भारतीय जीवन विमा महामंडळानं नव्या पॉलिसीची घोषणा केली आहे. एलआयसीची विमा रत्न ही पॉलिसी ग्राहकांसाठी आज सार्वजनिक करण्यात आली. एलआयसीद्वारे बॉम्बे स्टॉक एक्स्जेंजला याविषयी अधिकृत माहिती सादर करण्यात आली आहे. एलआयसी विमा रत्न ही नॉन लिंक्ड, वैयक्तिक, आजीवन गुंतवणूक विमा योजनेतील प्लॅन आहे. विमा रत्न (BIMA RATNA) पॉलिसीमुळे एलआयसी गुंतवणुकदारांना नवा पर्याय समोर आला आहे. आगामी आठवड्यात एलआयसीच्या संचालक मंडळाची बैठक होणार आहे. आर्थिक तिमाही अहवाल जारी करण्याची शक्यता आहे. तसेच कंपनीच्या सर्व भागधारकांना प्रति शेअर लाभांश (DIVIDEND) वितरित करण्याची योजना असल्याचे वृत्त आहे. एलआयसीच्या आयपीओ इश्यू प्राईसमध्ये सध्या 13 टक्क्यांची घसरण नोंदविली गेली आहे.

किती मिळणार डिव्हिडंड ?

बहुचर्चित भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या आयपीओची सर्वत्र चर्चा होती. गुंतवणुकदारांनी शेअर्स नोंदणीसाठी बंपर प्रतिसाद दिला. मात्र, अपेक्षित कामगिरी अभावी गुंतवणुकदारांचा भ्रमनिरास झाला. शेअर्सच्या किंमतीत होणाऱ्या घसरणीमुळे गुंतवणुकदारांची मोठ्या प्रमाणात निराशा झाली आहे. दरम्यान, एलआयसी गुंतवणुकदारांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. कंपनी पहिला आर्थिक तिमाही अहवाल घोषित करण्याच्या तयारीत आहे. कंपनीच्या व्यवस्थापन मंडळाची बैठक बोलविण्यात आली आहे. या बैठकीत गुंतवणुकदारांना लाभांश (डिव्हिंडड) (Dividend) देण्याची घोषणा केली जाणार आहे. एलआयसीनं बीएसई सोबतच्या पत्रव्यवहारात 30 मे रोजी पहिला तिमाही आर्थिक पाहणी अहवाल जारी करणारं असल्याचं म्हटलं आहे. कंपनीच्या व्यवस्थापन मंडळात अहवालावर चर्चा करण्यात येईल आणि त्यानंतर लाभांशाची (डिव्हिडंड) निश्चिती केली जाईल, अशी माहिती एलआयसीच्या सूत्रांनी दिली आहे.

‘आयपीओ’ नंतर ‘एफपीओ’

अर्थजाणकारांच्या मते, शेअरच्या किंमतीत घसरणीनंतरही एलआयसीच्या गुंतवणुकदारांना लाभ होणार आहे. गेल्या वर्षी कंपनीनं लाभांश दिला नव्हता. एलआयसीमधील 25 टक्के शेअर विक्रीचं सरकारचं धोरण आहे. आतापर्यंत 3.5 टक्के शेअरची विक्री करण्यात आली आहे. आगामी काळात सरकार एफपीएओ बाजारात सूचीबद्ध सुरू करू शकते. अर्थजाणकारांनी एलआयसी गुंतवणुकदारांना बंपर सवलत मिळण्याची अंदाज वर्तविला आहे.

हे सुद्धा वाचा

LIC शेअर नीच्चांकी स्तरावर

आजच्या व्यवहाराच्या दिवशी एलआयसी शेअरचा भाव 821.20 रुपयांवर पोहोचला. एलआयसी शेअर 17 मे ला बाजारात लिस्ट(सूचीबद्ध) झाला होता. शेअरची इश्यू प्राइस 949 होती. मात्र, लिस्टिंग 867 रुपयांवर झाला होता. बहुप्रतिक्षित एलआयसीचा शेअर शेअर बाजारात सूचीबद्ध झाला होता. मात्र, सूचीबद्धतेच्या दिवशीच एलआयसी आयपीओ शेअर्समध्ये मोठी घसरण नोंदविली गेली होती. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजवर एलआयसीचा शेअर 7.77 टक्के घसरणीसह 875 रुपयांवर बंद झाला होता. (Life insurance corporation launch new policy bima ratna know the update in marathi)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.