नव्या वर्षात गॅसचा भाव वाढला आणि गावात पुन्हा चूलीचा धुराडा

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी तेल मार्केटिंग कंपन्यांनी सर्वसामान्य जनतेला मोठा झटका दिला आहे.

नव्या वर्षात गॅसचा भाव वाढला आणि गावात पुन्हा चूलीचा धुराडा
Follow us
| Updated on: Jan 01, 2021 | 3:49 PM

मुंबई: कोरोनाच्या संकटामुळे (COVID-19 Crisis) सामान्य नागरिकांचं खूप मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. अशात अनेक वस्तूंच्या किंमती वाढत असल्यामुळे नागरिकांच्या खिशाला आणखी कात्री बसत आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी तेल मार्केटिंग कंपन्यांनी सर्वसामान्य जनतेला मोठा झटका दिला आहे. घरगुती गॅस वापरासाठी लागणाऱ्या सिलेंडरच्या किमती वाढल्याने ग्रामीण भागातील गृहिणीचे आर्थिक गणित बिघडल्याचं पाहायला मिळतं. (lpg cylinder price high on new year know how much price increased in mumbai)

खरंतर, शासकीय योजनेतून गॅस मिळाल्यामुळे चूल बंद झाली होती. मात्र, सध्या गॅसचे भाव गगनाला भिडल्याने ग्रामीण भागातील चुली नव्याने पेटल्या आहेत. आज LPG गॅस सिलेंडरच्या दरांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मागच्या महिन्यातही गॅस सिलेंडरचे भाव तब्बल 100 रुपयांनी वाढले होते. आताही नव्या वर्षात भाव पुन्हा वाढल्याने नागरिकांच्या खिशाला कात्री बसणार आहे.

Indian Oil च्या म्हणण्यानुसार, 1 जानेवारीला 19 किलोच्या कमर्शिअल गॅस सिलेंडरची किंमत दिल्लीमध्ये 1349 रुपये झाली आहे. तर मुंबईमध्ये गॅसची किंमत 1280.50 रुपयांवर पोहोचली आहे. याआधी 15 डिसेंबरला ही किंमत 1332 रुपये इतकी होती. म्हणजेच 17 रुपये प्रति सिलेंडर अशा किंमती वाढल्या आहेत. कोलकत्तामध्ये कमर्शिअल सिलेंडरची किंमत 1410 रुपये, चेन्नईमध्ये 1463.50 रुपयांवर पोहोचली आहे.

मागच्या महिन्यातही वाढल्या गॅसच्या किंमती

मागच्या महिन्यामध्ये गॅस सिलिंडर्सच्या किंमतींमध्ये मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत दोनदा सुमारे 100 रुपयांनी वाढवली गेली होती. त्यानंतर दिल्लीत 14.2 किलो विना अनुदानित एलपीजी सिलिंडरची किंमत आता वाढून 694 रुपयांवर पोहोचली आहे. तर 5 किलोच्या छोट्या सिलिंडरच्या किंमतीत 18 रुपयांची वाढ झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 19 किलो कमर्शिअल सिलिंडरच्या किंमतीमध्ये 36.50 रुपयांची वाढ करण्यात आली. खरंतर, तेल कंपन्या दरमहा एलपीजी सिलिंडरच्या किंमतींचा आढावा घेते आणि किंमतींमध्ये बदल करते. यामध्ये प्रत्येक राज्यातील गॅसच्या किंमती वेगवेगळ्या असतात. (lpg cylinder price high on new year know how much price increased in mumbai)

संबंधित बातम्या –

Happy New Year 2021 : नवीन वर्षात घराचं अर्थकारण सांभाळायचं असेल तर ‘हे’ नक्की वाचा!

नववर्षाच्या मुहुर्तावर नांदेडच्या शेतकऱ्याची मेहनतीची वांगी फळाला, 40 दिवसांत 3 लाखांचा नफा!

(lpg cylinder price high on new year know how much price increased in mumbai)

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.