सर्वसामान्य नागरिकांना मोठा झटका! पुन्हा वाढली LPG गॅस सिलेंडरची किंमत

सरकारी ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी (OMCs) ने एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतींमध्ये पुन्हा एकदा वाढ केली आहे.

सर्वसामान्य नागरिकांना मोठा झटका! पुन्हा वाढली LPG गॅस सिलेंडरची किंमत
Follow us
| Updated on: Feb 04, 2021 | 2:39 PM

नवी दिल्ली : अर्थसंकल्प (Budget 2021) नंतर सर्वसामान्य जनतेला मोठा झटका बसला आहे. सरकारी ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी (OMCs) ने एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतींमध्ये पुन्हा एकदा वाढ केली आहे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOC) च्या वेबसाईटनुसार, 4 फेब्रुवारी 2021 पासून विना सब्सिडी असणाऱ्या 14.2 किलोग्रॅम LPG गॅस सिलेंडरच्या किंमती 25 रुपयांनी वाढल्या आहेत. यासोबतच देशाची राजधानी दिल्लीमध्ये 14.2 किलोग्रॅम विना सब्सिडी गॅस सिलेंडरच्या किंमती 719 रुपयांनी वाढवल्या आहेत. (lpg gas cyliner price hiked per cylinder rs 25 here check the latest lpg cylinder rates)

लक्षात असूद्या की, दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजीच्या किंमती बदलल्या जातात. यावेळी 1 फेब्रुवारीला विना अनुदानित 14.2 किलो गॅस सिलिंडरच्या किंमतीत वाढ करण्यात आली नाही. मात्र, 19 किलो सिलिंडरच्या किंमतीत 191 रुपयांची वाढ करण्यात आली. पण यानंतर 4 फेब्रुवारीला घरगुती एलपीजीच्या किंमती पुन्हा वाढवण्यात आल्या आहेत. यामुळे सर्वसामान्य जनतेच्या खिशाला मोठी कात्री बसणार आहे.

दरम्यान, जानेवारीत 19 किलो व्यावसायिक सिलिंडर्सच्या किमतीही वाढविण्यात आल्या होत्या. जानेवारीत त्यात 56 रुपयांची वाढ करण्यात आली होती. नोव्हेंबरनंतर डिसेंबरमध्ये दोनदा किमती वाढवल्या गेल्या. नोव्हेंबरमध्ये व्यावसायिक सिलिंडर्सची किंमत 1241.50 रुपये होती. त्याचबरोबर त्याची किंमत 1 डिसेंबर रोजी 1296 रुपये करण्यात आली, तर 15 डिसेंबरला पुन्हा एकदा त्याची किंमत 1332 रुपये करण्यात आली.

जानेवारीमध्ये त्याची किंमत 1349 रुपये करण्यात आली. त्यामुळे 19 किलोचा व्यावसायिक सिलिंडर 1540 रुपयांत नागरिकांनी विकत घेतला. म्हणजेच एका महिन्यातच सुमारे 200 रुपयांची वाढ करण्यात आली होती. त्यांनतर पुन्हा 1 फेब्रुवारीला किंमती वाढवण्यात आल्या. त्यावर आज पुन्हा गॅसच्या किंमतींमध्ये वाढ करण्यात आली आहे.

एलपीजी किंमत कशी तपासाल?

एलपीजी सिलिंडरची किंमत तपासण्यासाठी तुम्हाला सरकारी तेल कंपनीच्या संकेतस्थळावर जावे लागेल. येथील कंपन्या दरमहा नवीन दर जारी करतात. (https://iocl.com/Products/IndaneGas.aspx) या संकेतस्थळावर आपण आपल्या शहरातील गॅस सिलिंडरची किंमत तपासू शकता. (lpg gas cyliner price hiked per cylinder rs 25 here check the latest lpg cylinder rates)

संबंधित बातम्या –

LPG Gas Cylinder Price: फेब्रुवारीत LPG सिलिंडरच्या किमतीत मोठे बदल; किती पैसे द्यावे लागणार?

Budget 2021 | अर्थसंकल्पादिवशीच सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री, LPG गॅस सिलिंडर महागला

31 जानेवारीपर्यंत फ्रीमध्ये बुक करा सिलेंडर, ‘हा’ आहे प्रोमो कोड

(lpg gas cyliner price hiked per cylinder rs 25 here check the latest lpg cylinder rates)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.