LPG Gas latest price : सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा कात्री, घरगुती गॅसच्या किंमती वाढल्या; वाचा ताजे दर

फेब्रुवारी महिन्यात गॅस सिलिंडरच्या किंमतीत 100 रुपयांची वाढ झाली. याआधीही 25 फेब्रुवारी रोजी किंमतीत वाढ झाली होती. याआधी 4 फेब्रुवारीला 25 रुपयांची वाढ होती.

LPG Gas latest price : सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा कात्री, घरगुती गॅसच्या किंमती वाढल्या; वाचा ताजे दर
Follow us
| Updated on: Mar 01, 2021 | 8:23 AM

LPG Gas latest price : मार्चच्या पहिल्या दिवशी एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमती पुन्हा वाढल्या आहेत. आज किंमतीत 25 रुपयांनी वाढ झाल्याचं समोर आलं आहे. फेब्रुवारी महिन्यात गॅस सिलिंडरच्या किंमतीत 100 रुपयांची वाढ झाली. याआधीही 25 फेब्रुवारी रोजी किंमतीत वाढ झाली होती. याआधी 4 फेब्रुवारीला 25 रुपयांची वाढ होती. तर 14 फेब्रुवारीला 50 रुपयांची वाढ होती. इतकंच नाहीतर 25 फेब्रुवारीला यामध्ये 25 रुपयांनी वाढ झाली होती. फेब्रुवारीमध्ये एलपीजीच्या किंमतीत 100 रुपयांची वाढ झाली. (lpg gas price hiked by 25 rupees here is the latest price of lpg gas)

खरंतर, पुन्हा एकदा 14.2 किलो विना अनुदानित गॅस सिलिंडर 25 रुपयांनी महागला आहे. किंमती वाढल्यामुळे दिल्लीत घरगुती गॅसचा दर 794 रुपयांवरून 819 रुपयांवर आला आहे. नवी किंमत मुंबईत 819 रुपये, कोलकातामध्ये 845.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 835 रुपये करण्यात आला आहे.

जानेवारी महिन्यात तेल मार्केटिंग कंपन्यांनी एलपीजी गॅसच्या दरात वाढ केली नाही. तर त्यापूर्वी डिसेंबर महिन्यात दोनदा 50-50 रुपयांची वाढ झाली होती. फेब्रुवारी महिन्यात किंमती वेगवेगळ्या तीन प्रसंगी वाढल्या आणि एकूण वाढ 100 रुपये होती.

दरम्यान, येत्या दोन वर्षात एक कोटीहून अधिक मोफत एलपीजी कनेक्शन (Free LPG Connection) देण्याची आणि लोकांना एलपीजी सहज मिळावा यासाठी सरकारने एक योजना तयार केली आहे. देशातील 100 टक्के लोकांना स्वच्छ इंधन पोहोचवण्याचं उद्दीष्ट साध्य करण्यासाठी ही योजना तयार केली गेली आहे. यामुळे ग्राहकांना फायदा होणार आहे. पेट्रोलियम सचिव तरुण कपूर म्हणाले की, कमी कागदपत्रं आणि स्थानिक रहिवासी पुरावा नसल्यासही कनेक्शन देण्याची योजना तयार आहे. इतकंच नाहीतर, ग्राहकांना तीन डीलर्सकडून पुन्हा एक रिफिल सिलिंडर मिळण्याचा पर्यायही देण्यात आला आहे. (lpg gas price hiked by 25 rupees here is the latest price of lpg gas)

संबंधित बातम्या – 

देशी की परदेशी,पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नेमकी कोणती लस घेतली?

सरकार वाटणार 1 कोटी मोफत LPG Connection, लवकरच सिलेंडरही होणार स्वस्त

Petrol Diesel Rate Today : महिन्याच्या पहिल्याच दिवशी काय आहेत इंधनाचे दर, वाचा तुमच्या शहरातील ताजे भाव

(lpg gas price hiked by 25 rupees here is the latest price of lpg gas)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.