सीएनजी पंप उघडून करा भरघोस कमाई, कंपनी ‘या’ शहरांमध्ये देतेय संधी

सीएनजीची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी आणि पुरेशी सीएनजी पायाभूत सुविधा सुनिश्चित करण्यासाठी एजीएल सीएनजी स्टेशन विकसित करीत आहे आणि सीएनजी स्टेशन डीलरशिपची नियुक्ती करीत आहे, असे कंपनीने म्हटले आहे.

सीएनजी पंप उघडून करा भरघोस कमाई, कंपनी 'या' शहरांमध्ये देतेय संधी
Follow us
| Updated on: Aug 06, 2021 | 11:45 AM

नवी दिल्लीः जर तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला सुवर्णसंधी आहे. अवंतिका गॅस लिमिटेड ही गेल आणि एचपीसीएल यांच्या संयुक्त विद्यमाने सीएनजी पंप उघडण्याची संधी देत ​​आहे. पेट्रोलच्या वाढत्या किमतींमध्ये सीएनजी कारची मागणी खूप वाढलीय. अशा परिस्थितीत अवंतिका गॅस 5 शहरांमध्ये नवीन सीएनजी पंप उघडण्याची योजना आखत आहे, यासाठी कंपनीकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. सीएनजीची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी आणि पुरेशी सीएनजी पायाभूत सुविधा सुनिश्चित करण्यासाठी एजीएल सीएनजी स्टेशन विकसित करीत आहे आणि सीएनजी स्टेशन डीलरशिपची नियुक्ती करीत आहे, असे कंपनीने म्हटले आहे.

‘या’ पाच शहरांमध्ये नवीन सीएनजी स्टेशन उघडणार

AGL नुसार, मध्य प्रदेशातील पाच शहरांमध्ये नवीन CNG स्टेशन उघडण्यात येतील. इंदूर, उज्जैन, पीथमपूर, महू आणि ग्वाल्हेर येथे सीएनजी स्टेशन डीलरशिपसाठी व्यक्तींकडून एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट (ईओआय) आमंत्रित केले जाते.

सीएनजी स्टेशन उघडण्यासाठी प्लॉट आवश्यक

सीएनजी स्टेशन उघडण्यासाठी आपल्याकडे प्लॉट असणे सर्वात महत्वाचे आहे. त्याचा आकार 400 ते 1225 चौरस मीटर असावा. प्लॉट मुख्य रस्त्याला जोडलेला असावा. प्लॉटची खोली 20 मीटर (शहरात) आणि 35 मीटर (महामार्गावर) असावी. जर तुमची स्वतःची जमीन नसेल तर तुम्ही जमीन भाडेतत्वावर देखील घेऊ शकता. परंतु यासाठी तुम्हाला जमीन मालकाकडून एनओसी घेणे आवश्यक आहे. तुम्ही कुटुंबातील सदस्याची जमीन लीजवर देखील घेऊ शकता. भाडेपट्टीवर लीज करार घेणे आवश्यक आहे.

डीलरशिपसाठी अर्जाचा फॉर्ममध्ये जमिनीशी संबंधित तपशीलवार माहिती द्यावी लागणार

डीलरशिपसाठी अर्जाचा फॉर्ममध्ये जमिनीशी संबंधित तपशीलवार माहिती द्यावी लागणार आहे. सीएनजी आउटलेट आणि विविध प्रतिज्ञापत्रांचे स्वरूप आणि अटी शर्थी एजीएल पॉलिसी आणि एलएनजी स्टेशनवर उपलब्ध आहेत आणि www.aglonline.net वेबसाईटवरून डाऊनलोड केल्या जाऊ शकतात.

वय आणि पात्रता

सीएनजी स्टेशन उघडण्यासाठी कोणतीही विशेष पात्रता असणे आवश्यक नाही. अर्जदाराने किमान 10 वी पास केलेली असावी. तसेच त्याचे वय 21 ते 60 वर्षांच्या दरम्यान असावे. अर्जदार अवंतिकाच्या कोणत्याही कर्मचाऱ्याच्या कुटुंबातील सदस्य नसावा, अशी कंपनीची अट आहे.

ही कागदपत्रे आवश्यक

सीएनजी स्टेशनसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीच्या आधार आणि पॅन कार्डची प्रत, 10 वी पास प्रमाणपत्र/मार्कशीटची सेल्फ अटेस्टेड कॉपी, कोणत्याही संपर्कासाठी संपर्क पत्ता, फोन/मोबाईल नंबर आणि त्यासाठी आवश्यक ईमेल आयडी आवश्यक आहे.

संबंधित बातम्या

मुकेश अंबानींना SC चा धक्का; Amazon-Future करारात मोठा निर्णय

RBI Monetary Policy Updates: RBIकडून सातव्यांदा रेपो रेट जैसे थेच, रिव्हर्स रेपो रेटमध्ये बदल नाही

Make a lot of money by opening CNG pump stations, Aavantika Gas company offers opportunities in these cities

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.