Share Market | शेअर बाजारात शुगर स्टॉक्सचा गोडवा, 20 टक्क्यांची तेजी! गुंतवणूकदारांच्या खरेदीसाठी उड्या
भारतीय शेअर बाजारात साखर उद्योगांच्या कामगिरीवर थेट परिणाम जाणवला. साखर उद्योगांच्या (sugar companies) शेअर्समध्ये 19 टक्क्यांपर्यंतची वाढ दिसून आली. यंदाच्या वर्षी साखर निर्यातीत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची अपेक्षा तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
नवी दिल्ली : शेअर बाजारात (stock market) आज (मंगळवार) घसरणीनंतर तेजीचं चित्र पाहायला मिळालं. रिकव्हरी सह अनेक स्टॉक्स मध्ये (stocks) खरेदीचं वातावरण होतं. आयटी, फायनान्शियल्स क्षेत्रासोबत साखर उद्योगाच्या शेअर्समध्ये मोठी तेजी नोंदविली गेली. गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय साखर जगतात सकारात्मक घडामोडी दिसून येत आहे. भारतीय शेअर बाजारात साखर उद्योगांच्या कामगिरीवर थेट परिणाम जाणवला. साखर उद्योगांच्या (sugar companies) शेअर्समध्ये 19 टक्क्यांपर्यंतची वाढ दिसून आली. यंदाच्या वर्षी साखर निर्यातीत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची अपेक्षा तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारात वाढत्या भावामुळं साखर बाजारात गोडवा निर्माण झाला आहे. अधिक किंमतीवर निर्यात आणि इथेनॉलच्या वाढत्या मागणीमुळे साखर कंपन्यांच्या नफ्यात भर पडत आहे.
साखर उद्यागोची कामगिरी:
आज (मंगळवार) साखर कंपन्यांच्या शेअर मध्ये 20 टक्क्यांपर्यंत वाढ झाली. भविष्यात अधिकाधिक नफा मिळविण्याच्या हेतूने गुंतवणुकदारांनी साखर उद्योग संबंधित शेअर्सकडं आपला मोर्चा वळविला आहे.
- • मवाना शुगर्सच्या स्टॉकमध्ये 20 टक्क्यांची वाढ
- • द्वारिकेश शुगरच्या स्टॉक मध्ये 11 टक्के वाढ
- • धामपुर शुगरच्या स्टॉक मध्ये 6 टक्के वाढ
- • धामपुर शुगर आणि द्वारिकेश शुगर ट्रेडिंग दरम्यान सर्वोच्च उच्चांकावर
- • त्रिवेणी इंजिनियरिंग, डालमिया भारत, डीसीएम श्रीराम वाढीसह बंद
महाराष्ट्राची उत्पादनात बाजी:
साखर उत्पादनात (Maharashtra) महाराष्ट्राने आपले पहिल्या क्रमांकाचे स्थान कायम ठेवलेले आहे. फेब्रुवारी अखेरपर्यंत देशात 250 लाख टन (Sugar Production) साखरेचे उत्पादन झालेले आहे. हंगामाच्या सुरवातीपासूनच महाराष्ट्राने पहिला क्रमांक कायम ठेवला आहे. फेब्रुवारी महिन्याच्या अंतिम टप्प्यात 97 लाख टन साखरेचे उत्पादन हे एकट्या महाराष्ट्रातून झाले होते. तर आता मार्चमध्ये 100 लाख टन होईल असा अंदाज आहे.
इंडियन शुगर मिल्स असोसिएशने यंदा महाराष्ट्रात 126 लाख टन साखरेचे उत्पादन होईल असा अंदाज व्यक्त केला होता. यापूर्वी तर 117 लाख टन होईल असेच सांगण्यात आले होते. पण यंदा विक्रमी असे साखरेचे उत्पादन राज्यातून झाले आहे. तर उत्तरप्रदेशात 68 लाख टन साखर तयार झाली आहे.
संबंधित बातम्या :
आता इंटरनेटशिवायही वापरता येणार UPI सेवा! RBI कडून फीचर फोनसाठी यूपीआय सेवा सुरु
दुचाकीचे चाक ‘रुतले’! विक्री प्रचंड घटली, काय कारणं? वाचा सविस्तर
…तर, अख्खा युरोप ‘गॅस’वर, कच्च्या तेलाचा भाव 300 डॉलर; रशियाची आगपाखड!