मारुती सुझुकीला मिळाले नवीन सीईओ; हिसाशी ताकेऊची एप्रिलपासून पदभार स्विकारणार, तीन वर्षासाठी नियुक्ती
जपानमधील ओसाका विद्यापीठातून कायद्यातून पदवी घेतलेले ताकेऊ हे येत्या 1 एप्रिलपासून आपला पदभार स्वीकारणार आहेत. कंपनीतील संक्रमण प्रक्रिया सोपी करण्यासाठी म्हणून आयुकावा हे पुढील सहा महिने कंपनीच्या कार्यकारी उपाध्यक्षपदावर काम करणार आहेत.
मुंबईः भारतातील सर्वात मोठी कंपनी म्हणून ओळख असलेली मारुती सुझुकी इंडिया कंपनीने (Maruti Suzuki India Company) गुरुवारी महत्वाची घोषणा केली आहे. मारुती सुझुकी इंडिया कंपनीचे व्यवस्थापकीय संचालकपदी आणि (CEO) सीईओ हिसाशी ताकेउची यांची निवड करण्यात आली आहे. कंपनीच्या बोर्डाकडून ही अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. ताकेउची यांची निवड ही तीन वर्षासाठी असून त्यांचा कार्यकाळ हा 1 एप्रिल 2022 पासून सुरू होऊन 31 मार्च 2025 पर्यंत असणार आहे.
मारुती सुझुकी इंडिया कंपनीचे व्यवस्थापकीय संचालकपदी आणि सीईओ हिसाशी ताकेउ (Hisashi Takeuchi) यांनी जपानमधील ओसाका विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली आहे. ताकेऊ यांची निवड केल्यानंतर कंपनीकडून पूर्णवेळ असलेले एमडी केनिची आयुकावा हे पूर्णवेळ संचालक म्हणूनच कार्यरत असणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
Maruti Suzuki appoints Hisashi Takeuchi as the new Managing Director and CEO with effect from April 1, 2022: Company statement
— Press Trust of India (@PTI_News) March 24, 2022
जपानमधील ओसाका विद्यापीठाचे पदवीधर
जपानमधील ओसाका विद्यापीठातून कायद्यातून पदवी घेतलेले ताकेऊ हे येत्या 1 एप्रिलपासून आपला पदभार स्वीकारणार आहेत. कंपनीतील संक्रमण प्रक्रिया सोपी करण्यासाठी म्हणून आयुकावा हे पुढील सहा महिने कंपनीच्या कार्यकारी उपाध्यक्षपदावर काम करणार आहेत.
व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत
कंपनीच्या संचालक मंडळाकडून टेकुचीच्या नियुक्तीला पूर्णपणे मान्यता देण्यात आली असली तरी अद्याप कंपनीच्या भागधारकांकडून या निवडीसाठी मान्यता मिळणे बाकी आहे. सुझुकी मोटर कॉर्पोरेशन (SMC) बरोबर ताकेऊची यांच्या बरोबर कंपनी संबंधित होती. तर जुलै, 2019 पासून ते MSI च्या संचालक मंडळाचा भाग होते आणि एप्रिल, 2021 पासून ते सह व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत आहेत.
जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न
या निवडीनंतर ताकेऊ यांनी सांगितले की, मारुती सुझुकी ही कंपनीला मोठा वारसा असून ती जगातील एक नामांकित कंपनी आहे. मी भारतात आणि परदेशातील जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितेल.
संबंधित बातम्या
Gold Price Today : चांदी 68 हजारच्या पार, तर सोनंही महागलं! जाणून घ्या आजचा दर