कोण आहे माया अन् लीह टाटा, 34 आणि 37 वर्षीय दोन मुली टाटा बोर्डमध्ये, रतन टाटासोबत कनेक्शन काय?
TATA Group: माया आणि लीह दोन्ही रतन टाटा यांच्या पुतण्या आहेत. त्यांनी रतन टाटांसोबत कंपनीचे काम केले आहे. टाटा निओ अॅपच्या लॉन्चिंगमध्ये माया यांचा मोठा रोल आहे. माध्यमांपासून माया आणि लीहा नेहमी लांब असतात. परंतु कंपनीत आता त्यांचे प्रभुत्व निर्माण होत आहे.
TATA Group: ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचे निधन झाल्यानंतर टाटा समूहात मोठे बदल होत आहे. रतन टाटा यांचे सावत्र भाऊ नोएल टाटा यांच्याकडे टाटा ट्रस्टची सूत्र आली. आता त्यांच्या दोन्ही मुलींना मोठी जबाबदारी मिळाली आहे. नोएल टाटा यांच्या मुली माया टाटा आणि लीह टाटा यांना सर रतन टाटा इंडस्ट्रियल इंस्टीट्यूट (SRTII) बोर्ड ऑफ ट्रस्टीजमध्ये घेतले आहे. नोएल टाटा यांची तिन्ही मुले आता टाटा ग्रुपमध्ये आले आहेत.
ही लोक झाली नाराज
37 वर्षीय लीह टाटा, 34 वर्षीय माया टाटा आणि 32 वर्षीय नेविल टाटा ते तिघे जण टाटा ग्रुपच्या लहान ट्रस्ट्समध्ये दाखल झाले आहेत. माया आणि लीह टाटा यांनी सर रतन टाटा इंडस्ट्रियल इंस्टीट्यूट (SRTII) मध्ये अरनाज कोटवाल आणि फ्रेडी तलाटी यांची जागा घेतली आहे. अरनाज आणि फ्रेडी यांनी राजीनामा दिल्यानंतर नोएल टाटाच्या दोन्ही मुलांना ट्रस्टमध्ये घेतले आहे. परंतु यानंतर कंपनीत खळबळ उडाली आहे. अरनाज यांनी एसआरटीआयआयच्या बोर्ड ऑफ ट्रस्टीजला राजीनामा दिल्यानंतर पत्र लिहिले आहे. त्यात म्हटले की, त्यांनी राजीनामा देण्यास सांगितले गेले, ती पद्धत चुकीची आहे. त्यामुळे आपण दु:खी झालो आहोत. माझ्याशी सरळ संपर्क केला गेला नाही. दोन अनोळख्या व्यक्तींनी मला राजीनामा देण्याचा संदेश दिला. अरनाज यांच्या पत्रावर टाटा ट्रस्टकडून काहीच प्रतिक्रिया आली नाही.
कोण आहे माया आणि लीह?
रतन टाटा यांचे सावत्र भाऊ नोएल टाटा ऑक्टोंबर 2024 मध्ये टाटा ट्रस्टचे चेअरमन झाले. त्यानंतर माया आणि लीह टाटा यांना टाटा ग्रुपच्या कंपनीत मॅनेजर रोल्सवर काम पाहत आहे. माया टाटा डिजिटल उद्योगाची सूत्र सांभाळत आहे तर लीह इंडियन हॉटेल्सची जबाबदारी पाहत आहे. लीह टाटा यांनी IE बिजनेस स्कूलमधून मार्केटिंगमध्ये पदवीत्तर पदवी घेतली आहे. त्या इंडियन हॉटेल्सच्या व्हाईस प्रेजिडेंट आहे. माया टाटा या टाटा कॅपिटल, टाटा न्यू अॅपचे काम पाहत आहे.
माया आणि लीह दोन्ही रतन टाटा यांच्या पुतण्या आहेत. त्यांनी रतन टाटांसोबत कंपनीचे काम केले आहे. टाटा निओ अॅपच्या लॉन्चिंगमध्ये माया यांचा मोठा रोल आहे. माध्यमांपासून माया आणि लीहा नेहमी लांब असतात. परंतु कंपनीत आता त्यांचे प्रभुत्व निर्माण होत आहे.