मिलाप लाँच करत आहे भारतातील क्राउडफंडिंग;गॅरंटीड रिफंड धोरणाच्या माध्यमातून ‘मिलाप’ वापरकर्त्यांना पुरवली जाणार सुरक्षा
Milaap.org चे अध्यक्ष आणि संस्थापक अनोज विश्वनाथन म्हणाले, “मिलापच्या माध्यमातून चांगले कार्य करणाऱ्यांचा समुदाय खूप मोठा आहे. या कामाचा आवाका प्रचंड आहे. त्या तुलनेत फसवणुकींचे प्रमाण अगदीच अल्प आहे. निधी मागणाऱ्यांची पार्श्वभूमी सातत्याने तपासत राहण्यावर आम्ही अविश्रांतपणे लक्ष केंद्रित करून असतो, त्यामुळेच एक विश्वासार्ह देणगी प्लॅटफॉर्म उभा करणे शक्य झाले आहे.
मुंबई: भारतातील आघाडीच्या क्राउडफंडिंग प्लॅटफॉर्म, (Crowdfunding platforms) ऑनलाइन रक्कम देण्याला अधिक सुरक्षा देण्याच्या हेतूने Milaap.org हा ‘मिलाप गॅरंटी’ (Milaap Guarantee) सादर करत आहे. हे भारतातील अशा प्रकारचे पहिलेच धोरण असून, ज्याच्यासाठी निधी (Funds) उभा केला गेला त्याने काही फसवणूक केल्यास, अशा अपवादात्मक परिस्थितीत, निधी देणाऱ्यांना संपूर्ण रक्कम परत करण्याची हमी याद्वारे दिली जात आहे. त्याचबरोबर या देणग्या दरवेळी योग्य लाभार्थींपर्यंत पोहोचतील याची निश्चितीही केली जाणार आहे.
फसवणुकींचे प्रमाण अगदीच अल्प
Milaap.org चे अध्यक्ष आणि संस्थापक अनोज विश्वनाथन म्हणाले, “मिलापच्या माध्यमातून चांगले कार्य करणाऱ्यांचा समुदाय खूप मोठा आहे. या कामाचा आवाका प्रचंड आहे. त्या तुलनेत फसवणुकींचे प्रमाण अगदीच अल्प आहे. निधी मागणाऱ्यांची पार्श्वभूमी सातत्याने तपासत राहण्यावर आम्ही अविश्रांतपणे लक्ष केंद्रित करून असतो, त्यामुळेच एक विश्वासार्ह देणगी प्लॅटफॉर्म उभा करणे शक्य झाले आहे. देणगीदाराने दिलेला प्रत्येक पैसा योग्य व्यक्तीकडे जात आहे व योग्य कारणासाठी वापरला जात आहे अशी खात्री आम्हाला मिलाप गॅरंटीच्या माध्यमातून द्यायची आहे.”
त्रुटी राहिल्या तरीही पैसे परत मिळण्याची पूर्ण हमी
मिलाप हा देणगी देण्यासाठी सर्वांत सुरक्षित व सर्वाधिक संरक्षित प्लॅटफॉर्म आहे हे ७ दशलक्ष वापरकर्त्यांना यापूर्वीच माहीत आहे. एकूण उभारलेल्या निधीमध्ये फसवणुकीचे प्रमाण ०.१ टक्क्यांहून कमी आहे. या धोरणाखाली, फसवणुकीचा प्रकार आढळल्यास त्या निधी मागणाऱ्याला निधीची संपूर्ण रक्कम संबंधित देणगीदारांना परत करावी लागेल. या अभियानात आयोजकांकडून काही त्रुटी राहिल्या तरीही पैसे परत मिळण्याची पूर्ण हमी मिलाप देते. याशिवाय, कोणत्याही अभियानात फसवणूक किंवा देणगीचा गैरवापर यांसारखे प्रकार आढळल्यास संबंधितांवर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करण्याची जबाबदारी मिलापच्या विश्वास व पडताळणी तज्ज्ञांवर राहील.
“आमच्या फसवणूक प्रतिबंधक अल्गोरिदम्स आणि विश्वास व पडताळणी तज्ज्ञांच्या टीम्सच्या आणखी पुढे जाऊन, आम्ही मिलाप गॅरंटी हा संरक्षणाचा आणखी एक स्तर, आमच्या वापरकर्त्यांच्या संरक्षणासाठी आणला आहे,” असे मिलापमधील ट्रस्ट अँड सेफ्टी विभागाचे प्रमुख चैतन्य तल्लापाका म्हणाले. “तुमची देणगी प्रत्येक वेळी योग्य ठिकाणीच पोहोचेल याची निश्चिती यामुळे होईल.”
मिलाप गॅरंटी प्रथम वैद्यकीय कारणांसाठी निधी उभारण्याची मागणी करणाऱ्यांसाठी सुरू केली जाईल. त्यानंतर शिक्षण व अन्य सामाजिक कामांसाठी हे धोरण लागू केले जाईल.
Milaap.orgविषयी…
मिलाप हा व्यक्तिगत तसेच सामाजिक कामांसाठी, विशेषत: आरोग्यसेवा व संबंधित गरजांसाठी, निधी उभारून देणारा (क्राउडफंडिंग) भारतातील सर्वांत मोठा प्लॅटफॉर्म आहे. कोणाही गरजू व्यक्तीला काही सामान्य माणसाच्या आर्थिक कुवती पलीकडील कामांसाठी, उदाहरणार्थ कॅन्सर केअर, अवयव प्रत्यारोपण यांसारखे वैद्यकीय उपचार किंवा अपघातामुळे निर्माण झालेल्या आवश्यकता किंवा शिक्षण किंवा समुदायाशी निगडित अन्य बाबी, निधी उभा करून देण्याची क्षमता हा प्लॅटफॉर्म पुरवतो.
जगभरातील 130 देशांतील नागरिकांचा समावेश
मिलापच्या देणगीदार समुदायामध्ये जगभरातील 130 देशांतील नागरिकांचा समावेश आहे आणि भारतभरातील 6,23,000 हून अधिक उपक्रमांसाठी 1860 कोटींहून अधिक रक्कम प्लॅटफॉर्ममार्फत उभी करण्यात आली आहे. गेल्या 11 वर्षांत मिलाप हा लोकांसाठी, निधी उभा करण्याच्या दृष्टीने तसेच भारतातील उत्तम कार्यांसाठी देणगी देण्याच्या दृष्टीने, पसंतीचा प्लॅटफॉर्म झाला आहे.
संबंधित बातम्या
Pregnancy Diet : गरोदर आहात, सिजर टाळायचे आहे? मग ‘या’ फळांचा आहारात समावेश नक्की करा!
Aurangabad: घाटी रुग्णालयात औषध तुटवडा झाल्यास हाफकिनवर कारवाई, हायकोर्टाने काय दिले आदेश?