Road Ministry New Navigation App : अपघाताचा धोका होणार कमी! रस्ते मंत्रालयानं लाँच केलं नेव्हिगेशन अॅप

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी वारंवार रस्ता सुरक्षेच्या गरजांवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितलंय. रस्ते मंत्रालया(MoRTH)नं IIT मद्रास आणि डिजिटल टेक कंपनी MapmyIndiaसोबत देशातल्या ड्रायव्हर आणि रस्ता सुरक्षा तंत्रज्ञानासाठी सहकार्य केलंय.

Road Ministry New Navigation App : अपघाताचा धोका होणार कमी! रस्ते मंत्रालयानं लाँच केलं नेव्हिगेशन अॅप
अॅप
Follow us
| Updated on: Dec 19, 2021 | 4:16 PM

मुंबई : केंद्र आणि राज्य सरकार रस्त्यावरची लोकांची सुरक्षा वाढवण्यासाठी अनेक उपाय करत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी वारंवार रस्ता सुरक्षेच्या गरजांवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितलंय. त्याचबरोबर, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालया((MoRTH)नं IIT मद्रास आणि डिजिटल टेक कंपनी MapmyIndiaसोबत देशातल्या ड्रायव्हर आणि रस्ता सुरक्षा तंत्रज्ञानासाठी सहकार्य केलंय.

धोक्यांबद्दल करणार सतर्क या तिघांनी नागरिकांसाठी मोफत वापरता येण्याजोगं नेव्हिगेशन अॅप लाँच केलंय. हे अॅप लोकांना रस्त्यावरच्या अपघातांच्या धोक्यांबद्दल सतर्क करेल. सुरक्षेसंबंधीची इतरही अनेक वैशिष्ट्ये आणि फिचर्स यात आहेत.

कसं काम करेल अॅप? नेव्हिगेशन अॅप सेवा चालकांना येणारी अपघात प्रवण क्षेत्रे, स्पीड ब्रेकर्स, तीक्ष्ण वळणं आणि खड्डे यांसह इतर धोक्यांबद्दल व्हॉइस आणि व्हिज्युअल अलर्ट देईल. हा उपक्रम देशातल्या रस्ते अपघातांमुळे होणारे मृत्यू आणि मृत्यूचं प्रमाण कमी करण्यासाठी रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या नियोजनाचा एक भाग आहे.

भविष्यात उपयोगी MapmyIndiaनं विकसित केलेल्‍या ‘MOVE’ नावाच्या या नेव्हिगेशन सेवा अॅपनं 2020मध्ये सरकारचं आत्मनिर्भर अॅप इनोव्हेशन चॅलेंज जिंकलं. या सेवेचा वापर नागरिक आणि अधिकारी अपघात, असुरक्षित क्षेत्र, रस्ता आणि रहदारी समस्या नोंदवण्यासाठी आणि प्रसारित करण्यासाठी आणि इतर वापरकर्त्यांना मदत करण्यासाठी करू शकतात. IIT मद्रास आणि MapmyIndiaद्वारे डेटाचं विश्लेषण केलं जाणाराय, त्यानंतर भविष्यात रस्त्यांची स्थिती सुधारण्यासाठी सरकार याचा वापर करेल.

IIT मद्रासची रस्ता सुरक्षेसाठी नवीन योजना गेल्या महिन्यात, रस्ते मंत्रालयानं अधिकृतपणे IIT मद्रास इथल्या संशोधकांनी जागतिक बँकेच्या निधीतून तयार केलेलं रस्ता सुरक्षा मॉडेल स्वीकारलं. 32पेक्षा जास्त राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश रस्ते सुरक्षित करण्यासाठी आणि आपत्कालीन परिस्थिती सुधारण्यासाठी संस्थेच्या विकसित इंटिग्रेटेड रोड अपघात डेटाबेस (IRAD) मॉडेलचा वापर करतील.

शून्य मृत्यूचं लक्ष्य IIT टीमनं 2030पर्यंत रस्ते अपघातातले मृत्यू 50 टक्क्यांनी कमी करण्यासाठी रोडमॅप विकसित करण्यात मदत करण्यासाठी विविध राज्य सरकारांशी करार केले आहेत आणि रस्ते वाहतूक अपघातांमध्ये 0 मृत्यूचं लक्ष्य ठेवलंय.

Akola | झोका घेताना झोपाळ्याचा दोर गळ्यात अडकला, तरुणीचा जागीच अंत!

रिस्क है तो इश्क है, चांगल्या परताव्यासाठी FD ला बायपास हवा, एफडीपेक्षाही अधिकची कमाई देणारे पर्याय

Narayan Rane | मागे सूर्य, समुद्र आणि हार्टशेपमध्ये नारायण राणे सपत्नीक! पवनचक्की गार्डनमधून पॉवरफूल फ्रेम

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.