मुकेश अंबानींची मागणी मोदी सरकारकडून अमान्य, एलन मस्कचा मार्ग सुकर, आता मिळणार स्वस्त इंटरनेट
mukesh ambani elon musk: एलन मस्क यांची सॅटेलाईट इंटरनेट सर्व्हिस स्टारलिंकला भारतात गुंतवणूक करायची आहे. सरकारच्या निर्णयानंतर एलन मस्क यांनी सोशल मीडियावर मोदी सरकारच्या निर्णयाचे कौतूक केले आहे. भारतातील लोकांना सर्वात चांगली इंटरनेट सेवा देण्यासाठी आम्ही कटीबद्ध असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
Satellite Internet India: रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांची मागणी मोदी सरकारने अमान्य केली आहे. त्यामुळे टेसला मोटर्सचे संचालक एलन मस्क यांच्या कंपनीचा भारतातील प्रवेशाचा मार्ग सुकर झाला आहे. या निर्णयामुळे देशातील लोकांना स्वस्त इंटरनेट मिळण्याचा मार्गही मोकळा झाला आहे. एलन मस्क यांना भारतातील इंटरनेट क्षेत्रात गुंतवणूक करायची आहे. त्यासाठी त्यांनी इंटरनेटसाठी स्पेक्ट्रमचा लिलाव न करण्याची मागणी केली होती. त्यानुसार सॅटेलाइट स्पेक्ट्रमचे वाटप प्रशासकीय पद्धतीने केले जाणार आहे. दुसरकडे मुकेश अंबानी यांनी सॅटेलाइट स्पेक्ट्रमचे वाटप लिलावाच्या पद्धतीने करण्याची मागणी मुकेश अंबानी यांनी केली होती. परंतु सरकारने मुकेश अंबानी यांची मागणी नाकारत प्रशासकीय पद्धतीने स्पेक्ट्रम देण्याचा निर्णय घेतला आहे. भारत इंटरनेटच्या वापरात जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. चीननंतर भारताचे मार्केट सर्वाधिक आहे. तसेच 2030 पर्यंत हे मार्केट 16000 कोटींवर जाणार आहे. यामुळे भारतातील सॅटेलाइट इंटरनेटवर वर्चस्व मिळवण्यासाठी जिओचे मुकेश अंबानी, भारत एअरटेलचे मित्तल आणि एलन मस्क यांच्यात स्पर्धा होती.
मुकेश अंबानी यांनी लिहिले होते पत्र
एलन मस्क यांची सॅटेलाईट इंटरनेट सर्व्हिस स्टारलिंकला भारतात गुंतवणूक करायची आहे. सरकारच्या निर्णयानंतर एलन मस्क यांनी सोशल मीडियावर मोदी सरकारच्या निर्णयाचे कौतूक केले आहे. भारतातील लोकांना सर्वात चांगली इंटरनेट सेवा देण्यासाठी आम्ही कटीबद्ध असल्याचे त्यांनी म्हटले आहे. रॉयटर्सने दिलेल्या बातमीनुसार, टेलिकॉम रेग्यूलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (ट्राय) कडे जिओ आणि एअरटेलने प्रशासकीय पद्धतीने स्पेक्ट्रम देण्याचा मागणीला विरोध केला होता. रिलायन्स समुहाचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी त्यासाठी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी पत्रसुद्धा लिहिले होते.
एलन मस्कची मागणी का झाली मान्य?
आंतरराष्ट्रीय टेलिकॉम्यूनिकेशन युनियन (आयटीयू) जगभरातील टेलिकम्यूनिकेशन क्षेत्रा संदर्भात नियम तयार करते. एलन मस्क यांनी याच नियमांचा आधार घेत भारत सरकारकडे सॅटेलाइट स्पेक्ट्रमचे वाटप करण्याची मागणी केली होती. भारतही आयटीयूचा सदस्य आहे. यामुळे एलन मस्कची मागमी मान्य करण्यात आली.
मुकेश अंबानी यांची चिंता वाढली
एलन मस्क यांची कंपनी स्टारलिंकने भारतात इंटरनेट क्षेत्रात गुंतवणुकीसाठी यापूर्वी अर्ज केला होता. परंतु त्यावेळी दीर्घकाळानंतर काहीच निर्णय झाला नव्हता. त्यामुळे त्यांच्या कंपनीने माघार घेतली होती. आता त्यांची कंपनी उपग्रहामार्फेत इंटरनेट उपलब्ध करुन देणार आहे. त्यामुळे केबलशिवाय जलद इंटरनेट शक्य होणार आहे. त्याचा फायदा भारतातील अनेक युजरला होणार आहे.