मोदी सरकारचं दिवाळी गिफ्ट, पेट्रोल अन् डिझेल स्वस्त, मुंबईत आता किंमत काय?
ऑक्टोबर हा इंधनाच्या किमती वाढण्याचा महिना होता. गेल्या महिन्यात दररोज 30 आणि 35 पैशांनी पेट्रोल वाढून 7.45 रुपयांनी महागले, तर डिझेल 7.90 रुपयांनी महाग झाले. मात्र, आजच्या कपातीमुळे डिझेलमधील सर्व ऑक्टोबरमधील दर पुन्हा पाहायला मिळणार आहेत. त्याचवेळी पेट्रोलमध्ये जेमतेम अडीच रुपये कमी होणार आहेत.
नवी दिल्ली : दिवाळीनिमित्त केंद्रातील मोदी सरकारने देशातील जनतेला मोठं गिफ्ट दिलंय. केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात मोठी कपात केलीय. या कपातीनंतर आता देशात पेट्रोलचे दर प्रतिलिटर 5 रुपयांनी तर डिझेलचे दर 10 रुपयांनी कमी होणार आहेत. उद्या सकाळपासून नवीन दर लागू होतील. सध्या देशात अनेक ठिकाणी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी 100 रुपयांचा टप्पा ओलांडलाय. या कपातीनंतर ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार असून, महागाईचा प्रभावही कमी होणार आहे.
? तुमच्या राज्यात किती रुपयांना पेट्रोल अन् डिझेल मिळणार?
? दिल्लीत पेट्रोल 105 रुपये आणि डिझेल सुमारे 89 रुपये प्रति लिटरने उपलब्ध होणार आहे. ? मुंबईत पेट्रोल 110 रुपयांच्या आसपास आणि डिझेल 97 रुपये प्रतिलिटरने मिळणार आहे. ? चेन्नईमध्ये पेट्रोल 101 रुपये प्रतिलिटर आणि डिझेल 93 रुपये प्रतिलिटरच्या आसपास असेल. ? कोलकात्यात पेट्रोल 105 रुपये प्रतिलिटर आणि डिझेल 92 रुपये प्रतिलिटर असेल. ? लखनऊमध्ये पेट्रोल 102 रुपये प्रतिलिटर आणि डिझेल 89 रुपये प्रतिलिटर उपलब्ध असेल. ? जयपूरमध्ये पेट्रोल 114 रुपये प्रतिलिटर आणि डिझेल सुमारे 99 रुपये प्रतिलिटरने उपलब्ध होईल. ? शिमल्यात पेट्रोल सुमारे 103 रुपये प्रति लिटर आणि डिझेल सुमारे 88 रुपये प्रति लिटर दराने उपलब्ध आहे. ? डेहराडूनमध्ये पेट्रोल सुमारे 101 रुपये प्रति लिटर आणि डिझेल सुमारे 90 रुपये प्रति लिटरने उपलब्ध होईल.
? पेट्रोलवरील उत्पादन शुल्क 27.90 रुपये आणि डिझेलवर 21.80 रुपये होणार
केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात करण्याची घोषणा केलीय. उद्यापासून म्हणजेच 4 नोव्हेंबरपासून पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क अनुक्रमे 5 आणि 10 रुपयांनी कमी करण्यात आलेय. सध्या केंद्र सरकार पेट्रोलवर 32.90 रुपये प्रतिलिटर आणि डिझेलवर 31.80 रुपये उत्पादन शुल्क आकारते. मोदी सरकारच्या या निर्णयानंतर पेट्रोलवरील उत्पादन शुल्क 27.90 रुपये आणि डिझेलवर 21.80 रुपये होणार आहे.
? व्हॅट कमी करण्याचे राज्यांना आवाहन
उत्पादन शुल्कात कपात केल्यानंतर केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन राज्यांना केलेय, जेणेकरून जनतेची महागाईपासून सुटका होईल. विविध राज्य सरकारे 20 ते 35 टक्के व्हॅट आकारतात. केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार, डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपातीचा सर्वाधिक फायदा शेतकऱ्यांना होणार आहे, कारण शेतकरी लवकरच रब्बी पिकाची पेरणी करणार आहेत.
? डिझेलची किंमत ऑक्टोबरच्या पातळीवर येणार
ऑक्टोबर हा इंधनाच्या किमती वाढण्याचा महिना होता. गेल्या महिन्यात दररोज 30 आणि 35 पैशांनी पेट्रोल वाढून 7.45 रुपयांनी महागले, तर डिझेल 7.90 रुपयांनी महाग झाले. मात्र, आजच्या कपातीमुळे डिझेलमधील सर्व ऑक्टोबरमधील दर पुन्हा पाहायला मिळणार आहेत. त्याचवेळी पेट्रोलमध्ये जेमतेम अडीच रुपये कमी होणार आहेत.
? अर्थव्यवस्थेच्या संकेतानंतर उचलली महत्त्वाची पावले
अर्थव्यवस्थेत सुधारणा होण्याची चिन्हे दिल्यानंतर तेलाच्या किमतीत दिलासा दिला जाऊ शकतो, असे सरकारने आधीच सूचित केले होते. ऑक्टोबर महिन्यातील जीएसटी संकलनाचे आकडे उत्साहवर्धक आहेत. संकलन 1.3 लाख कोटींच्या पुढे गेले. जीएसटी लागू झाल्यानंतरचा हा दुसरा उच्चांक आहे. त्याच वेळी, गेल्या 4 महिन्यांत संकलन सातत्याने 1 लाख कोटी रुपयांच्या पुढे जात आहे. यासोबतच अर्थव्यवस्थेचे इतर अनेक संकेतकही वेगाने रिकव्हर होण्याची चिन्हे दाखवत आहेत. चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा लक्षात घेऊन सरकारने उत्पादन शुल्कात मोठी कपात केली आहे.
संबंधित बातम्या
खूशखबर! पेट्रोल डिझेल स्वस्त होणार; आज मध्यरात्रीपासून नवे दर लागू
दिवाळीच्या काळामध्ये एक लाख कोटींच्या उलाढालीचा अंदाज; व्यापाऱ्यांना दिलासा