आनंदाची बातमी! खाद्यतेल स्वस्त होणार, मोदी सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
Edible Oil | गेल्या वर्षभरात भारतीय बाजारपेठेत खाद्यतेलाचे दर जवळपास दुपटीने वाढले आहेत. त्यामुळे सामान्यांची चिंता वाढली होती. यानंतर केंद्र सरकारने तातडीच्या आणि दीर्घकालीन उपाययोजना करुन खाद्यतेलाचे दर नियंत्रणात आणले जातील, असे आश्वासन दिले होते.
मुंबई: मोदी सरकारने पाम तेलासह (Palm Oil) विविध खाद्यतेलावरील आयात शुल्कात प्रती टन 8000 रुपयांची (112 डॉलर्स) कपात केल्याने सामान्य लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे. गेल्या काही दिवसांमध्ये खाद्यतेलाचे (Edible Oils) भाव प्रचंड वाढले होते. खाद्यतेलाच्या किमतीतील वाढीने सामान्यांच्या मासिक खर्चाचा ताळमेळ बिघडला होता. भारताकडून 70 टक्के खाद्यतेल आयात केले जाते. आंतरराष्ट्रीय स्तरावर खाद्यतेलाच्या वाढलेल्या किंमतीचा परिणाम भारतीय बाजारपेठेत पाहायला मिळत होता. मात्र, मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे लवकरच खाद्यतेलाचे भाव सामान्य पातळीवर येईल, असा अंदाज आहे. (Good news government slashes tariff value for edible oil import )
खाद्यतेलाच्या किमतीत मोठी वाढ, गृहिणींचं बजेट कोलमडलं
केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क विभागाने शुल्क कपातीची अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार क्रूड पाम तेलाचे आयात शुल्क प्रती टनामागे 86 डॉलर्सनी कमी करण्यात आले आहे. क्रूड सोयाबीन तेलाच्या आयात शुल्कात देखील सरकारने प्रती टन 37 डॉलरची कपात केली आहे. तर पाम तेलावरील आयात शुल्क प्रती टनामागे 112 डॉलर्सनी घटवण्यात आले आहे.
गेल्या वर्षभरात भारतीय बाजारपेठेत खाद्यतेलाचे दर जवळपास दुपटीने वाढले आहेत. त्यामुळे सामान्यांची चिंता वाढली होती. यानंतर केंद्र सरकारने तातडीच्या आणि दीर्घकालीन उपाययोजना करुन खाद्यतेलाचे दर नियंत्रणात आणले जातील, असे आश्वासन दिले होते.
महागाईने तोडला आजवरचा रेकॉर्ड
गेल्या काही दिवसांपासून देशातील इंधन दरवाढ हा चर्चेचा मुद्दा असताना आता सामान्य लोकांच्या चिंतेत भर टाकणारी आणखी एक गोष्ट समोर आली आहे. देशातील महागाईने (Inflation Index) आजवरचे सर्व विक्रम मोडीत काढत नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून कोरोना (Coronavirus) आणि लॉकडाऊनमुळे अगोदरच मेटाकुटीस आलेल्या सामान्य लोकांचे कंबरडे आणखी मोडणार आहे.
घाऊक मूल्यावर आधारित महागाई दर मे महिन्यात 12.14 टक्के इतका रेकॉर्ड स्तरावर गेला आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षी याच महिन्यात महागाई दर उणे 3.37 टक्के होता. मे महिन्यातील घाऊक तसेच किरकोळ असे दोन्ही प्रमुख निर्देशांक विक्रमी टप्प्यावर पोहोचले आहेत. यंदा इंधन दरवाढ हे महागाईचे प्रमुख कारण ठरले आहे. घाऊक निर्देशंकात इंधन दरवाढीचा वाटा गेल्यावर्षीच्या तुलनेत दुप्पट म्हणजे 37.61 इतका आहे. तर अन्नधान्याच्या महागाईचा दरही 4.31 टक्के इतका झाला आहे. जून महिन्यात महागाईचा दर किंचित घसरुन 12 टक्क्यांच्या आसपास स्थिरावेल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
संबंधित बातम्या:
Inflation: ‘कॉमन मॅन’चा खिसा कापला जाणार; महागाईने तोडला आजवरचा रेकॉर्ड
मोहरीचे विक्रमी उत्पादन होऊनही खाद्यतेल महागच, आणखी वाढ होण्याची शक्यता
पेट्रोल-डिझेलचं ‘शतक’, मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणतात सरकारला अधिकचे पैसे पाहिजे म्हणून जास्तीचा कर
(Good news government slashes tariff value for edible oil import )