Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Petrol Diesel price: मोदी सरकार नागरिकांना दिवाळी गिफ्ट देणार, पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत घट होणार?

Petrol Diesel | जानेवारी महिन्यापासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात तब्बल 35 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर मोदी सरकारकडून इंधन दरकपात करुन नागरिकांना दिलासा दिला जाऊ शकतो.

Petrol Diesel price: मोदी सरकार नागरिकांना दिवाळी गिफ्ट देणार, पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत घट होणार?
पेट्रोल-डिझेल
Follow us
| Updated on: Oct 21, 2021 | 12:16 PM

मुंबई: इंधनाच्या दरवाढीमुळे सध्या देशातील नागरिकांच्या चिंता वाढल्या आहेत. मात्र, दिवाळीच्या काळात मोदी सरकारकडून याबाबत दिलासा मिळण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, दिवाळीच्या काळात इंधनाच्या दरात कपात केली जाऊ शकते. मोदी सरकार पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी करण्याचा विचार करत आहे. तसे घडल्यास इंधनाच्या किंमतीत किमान दोन ते तीन रुपयांनी घट होऊ शकते.

जानेवारी महिन्यापासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात तब्बल 35 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर मोदी सरकारकडून इंधन दरकपात करुन नागरिकांना दिलासा दिला जाऊ शकतो.

मात्र, उत्पादन शुल्कात कपात केल्यास मोदी सरकारला मोठा आर्थिक फटका बसेल. उत्पादन शुल्कात दोन-तीन रुपयांची कपात झाल्यास केंद्र सरकारला मिळणाऱ्या महसूलात 25 हजार कोटींची घट होईल. त्यामुळे केंद्र सरकारकडून या तोट्याचा काही भार पेट्रोलियम कंपन्यांवर टाकला जाऊ शकतो.

पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा वाढ

देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती दररोज नवनवे उच्चांक प्रस्थापित करत आहेत. यामध्ये आता आणखी भर पडली आहे कारण गुरुवारी भारतीय पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाच्या दरात पुन्हा एकदा वाढ करण्यात आली. त्यानुसार पेट्रोल आणि डिझेलच्या प्रतिलीटर दरात प्रत्येकी 35 पैशांची वाढ झाली आहे. हे दर आज दिवसभरासाठी लागू राहतील.

पेट्रोलियम कंपन्यांनी गुरुवारी जाहीर केलेल्या दरांनुसार मुंबईत पेट्रोलचा प्रतिलीटर दर 112.44 रुपये इतका आहे. तर एका लीटर डिझेलसाठी 103.26 रुपये मोजावे लागत आहेत. तर दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे 106.54 आणि 96.27 रुपये इतका आहे. इंधनाची दरवाढ अशीच सुरु राहिल्यास पेट्रोल लवकरच 120 रुपये प्रतिलीटरचा टप्पा गाठेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

कच्च्या तेलाचे दर सात वर्षांतील उच्चांकी पातळीवर

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सध्या NYME क्रूडचा दर 80 डॉलर्स प्रतिबॅरलच्या आसपास आहे. हा गेल्या सात वर्षांतील उच्चांकी दर आहे. कोरोनामुळे खनिज तेलाचे कमी झालेले उत्पादन तातडीने वाढवणे शक्य नाही. त्यामुळे डिसेंबर महिन्यापर्यंत ब्रेंट क्रूड 90 डॉलर्स प्रतिबॅरलची पातळी गाठेल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

दररोज 6 वाजता बदलतात किंमती

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल होत असतो. सकाळी सहा वाजता नवे दर लागू केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती एक्साइज ड्युटी, डिलर कमिशन आणि अन्य गोष्टी जोडल्यानंतर त्याचा भाव जवळपास दुप्पट होतो.

असे तपासा पेट्रोल आणि डिझेलचे भाव

आपण एसएमएसच्या माध्यमातून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाणून घेऊ शकता. पेट्रोल-डिझेलच्या किमती दररोज सकाळी 6 वाजता बदलतात. इंडियन ऑइलच्या वेबासाइटनुसार, RSP बरोबर आपल्या शहराचा कोड टाइप करून 9224992249 नंबरवर SMS पाठवावा लागणार आहे. या शहराचा कोड वेगवेगळा असतो. बीपीसीएल ग्राहक RSP लिहून 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक HPPrice लिहून 9222201122 या नंबरवर मेसेज पाठवून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाणून घेऊ शकतात.

इतर बातम्या:

कच्च्या तेलाचे दर तीन वर्षांतील उच्चांकी पातळीवर, भारतात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठी वाढ अटळ?

दसरा-दिवाळीपर्यंत ‘ही’ गोष्टही महागण्याची शक्यता; पेट्रोल, डिझेलनंतर ‘कॉमन मॅन’ला आणखी एक झटका

खनिज तेलाचा दर घसरल्यानंतही भारतात पेट्रोल-डिझेल अजूनही महाग का?

सावकाराच्या जाचाला कंटाळून तरुणाने उचललं टोकाचं पाऊल
सावकाराच्या जाचाला कंटाळून तरुणाने उचललं टोकाचं पाऊल.
'त्या' जखमा नेमक्या कोणत्या? रिपोर्टनंतर आरोपांची 'दिशा' बदलली?
'त्या' जखमा नेमक्या कोणत्या? रिपोर्टनंतर आरोपांची 'दिशा' बदलली?.
एखादा मंत्री असं म्हणतो म्हणजे तालिबानी राज्य आहे..; राऊतांची टीका
एखादा मंत्री असं म्हणतो म्हणजे तालिबानी राज्य आहे..; राऊतांची टीका.
विधिमंडळाच्या समितीत भुजबळ अन् मुंडेंना स्थान नाही, दादांनी का डावललं?
विधिमंडळाच्या समितीत भुजबळ अन् मुंडेंना स्थान नाही, दादांनी का डावललं?.
'हीच ती वेळ... एका पराभवाने खचणार नाही', शरद पवारांचं मोठं वक्तव्य
'हीच ती वेळ... एका पराभवाने खचणार नाही', शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
लंडनच्या मित्राचा फोन अन् दिशाने सगळंच संपवलं..
लंडनच्या मित्राचा फोन अन् दिशाने सगळंच संपवलं...
त्यानं सांगितलं की, देशमुखांना असं मारा की.., पोलिसांसमोर घुलेची कबुली
त्यानं सांगितलं की, देशमुखांना असं मारा की.., पोलिसांसमोर घुलेची कबुली.
'वाघ्या'ला ऐतिहासिक महत्त्व की दंतकथा? संभाजी भिडेंवर ठाकरेंचा घणाघात
'वाघ्या'ला ऐतिहासिक महत्त्व की दंतकथा? संभाजी भिडेंवर ठाकरेंचा घणाघात.
देशमुखांच्या छातीवर उडी अन् रक्ताची उलटी; आरोपींचा थरकाप उडवणारा जबाब
देशमुखांच्या छातीवर उडी अन् रक्ताची उलटी; आरोपींचा थरकाप उडवणारा जबाब.
संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार
संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार.