AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Investment tips : 1 लाख गुंतवले, 1.28 कोटी मिळाले, 20 वर्षात तगडे रिटर्न कसे मिळाले?

आज आम्ही तुम्हाला अशाच शेअरबद्दल सांगणार आहोत, ज्याने गेल्या 20 वर्षात गुंतवणूकदारांना तब्बल 13,000 टक्के परतावा दिला आहे. (MRF stock price update shares gives return of 13000 percent in 20 years)

Investment tips : 1 लाख गुंतवले, 1.28 कोटी मिळाले, 20 वर्षात तगडे रिटर्न कसे मिळाले?
money
Follow us
| Updated on: Jun 25, 2021 | 10:41 AM

मुंबई : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकीचे दररोज नवनवीन फंडे समोर येत असतात. यामुळे शेअर मार्केटमधील बहुतांश गुंतवणूकदार हे अशा एखाद्या शेअरच्या शोधात असतात, ज्यामुळे ते झटपट श्रीमंत होऊ शकतात. पण गुंतवणूकीचा सर्वात पहिला आणि महत्त्वाचा नियम म्हणजे तुम्हाला चांगला परतावा मिळण्यासाठी बरीच प्रतीक्षा करावी लागते. अनेकदा जे शेअर तुम्हाला कमी कालावधीत मोठ्या प्रमाणात पैसे कमवण्याची संधी देतात, त्यात जोखीम असते. पण दीर्घ कालावधीत कमी जोखीम घेऊन उच्च उत्पन्न मिळविणे तुलनात्मकदृष्ट्या सोपे आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच शेअरबद्दल सांगणार आहोत, ज्याने गेल्या 20 वर्षात गुंतवणूकदारांना तब्बल 13,000 टक्के परतावा दिला आहे. (MRF stock price update shares gives return of 13000 percent in 20 years )

सध्या भारतीय शेअर बाजारामध्ये हा शेअर सर्वात महाग आहे. मद्रास रबर फॅक्टरी (MRF) असे या शेअरचे नाव आहे. गेल्या दोन दशकांपासून शेअर मार्केटमध्ये या शेअरचे वर्चस्व कायम राहिले आहे. याचे मुख्य कारण म्हणजे गेल्या 20 वर्षांत या शेअरने गुंतवणूकदारांना प्रचंड परतावा दिला आहे.

20 वर्षात 12,800 टक्के परतावा

जून 2001 मध्ये MRF शेअरची किंमत प्रति शेअर 640.65 रुपये इतकी होती. आता 15 जून 2021 रोजी या कंपनीच्या शेअर्सची किंमत वाढून ती तब्बल 82,638 रुपये इतकी झाली आहे. म्हणजेच या शेअरने सुमारे 12, 800 टक्के परतावा दिला आहे.

याचा अर्थ जर एखाद्या व्यक्तीने जून 2001 मध्ये या कंपनीचे एक लाख शेअर घेतले असतील आणि ते अद्याप विकले नसतील. तर त्याला आता 1.28 कोटींचा परतावा मिळेल.

MRF कंपनीची काही माहिती

MRF कंपनी चेन्नईतील तामिळनाडू येथे असणारी एक टायर कंपनी आहे. ही कंपनी भारतातील सर्वात मोठी टायर उत्पादक कंपनी आहे. भारतीय टायर बाजारामध्ये अजूनही त्याची चांगली पकड आहे. या कंपनीचे टायर सर्वाधिक दुचाकी वाहनांना विकले जातात. तर ट्रक आणि बसच्या टायर्सपासून प्रवाशांच्या वाहनांच्या टायर्सपर्यंत असलेल्या विविध कंपन्यांमध्ये याचा समावेश टॉप 3 कंपन्यांमध्ये होतो.

या कंपनीच्या कमाईचा मोठा भाग ट्रक आणि बसच्या टायर्सच्या विक्रीतून येतो. याशिवाय प्रवासी वाहनांच्या टायर आणि दुचाकींच्या टायर्सचा महसुलात चांगला वाटा मिळतो.

निव्वळ नफा किती?

गेल्या 20 वर्षात MRF चा वर्षाचा निव्वळ नफा हा 20 टक्के दराने वाढला आहे. आर्थिक वर्ष 2001 मध्ये या कंपनीचा निव्वळ नफा 31.74 कोटी होता, जो आर्थिक वर्ष 2021 मध्ये वाढून 1,277 कोटींवर पोचला आहे. अशाप्रकारे, गेल्या 20 वर्षांत कंपनीच्या उत्पादनांची वार्षिक विक्री वाढून 11 टक्के इतकी वाढली आहे.

(MRF stock price update shares gives return of 13000 percent in 20 years )

संबंधित बातम्या :

Reliance AGM 2021: मुकेश अंबानींची मोठी घोषणा; रिलायन्स जिओ भारताला 2G मुक्त करणार

Share Market: रिलायन्सच्या समभागधारकांना तीन वर्षांत 117 टक्के रिटर्न्स; AGM मध्ये मोठ्या घोषणेची शक्यता

आजपासून 10, 20, 25, 30 वर्षांनंतर 1 कोटींची किंमत किती असेल? जाणून घ्या

'मोदी, फक्त 1 तास...', पहलगाम हल्ल्यावरून बांगर भडकले अन् जीभही घसरली
'मोदी, फक्त 1 तास...', पहलगाम हल्ल्यावरून बांगर भडकले अन् जीभही घसरली.
राजस्थानजवळ पाकने जैश-ए-मोहम्मदचे 4 दहशतवादी तळ बांधले
राजस्थानजवळ पाकने जैश-ए-मोहम्मदचे 4 दहशतवादी तळ बांधले.
अतिरेक्यांची बंदूक हिसकवण्याच्या प्रयत्नात आदिलनं गमावला जीव, घडलं काय
अतिरेक्यांची बंदूक हिसकवण्याच्या प्रयत्नात आदिलनं गमावला जीव, घडलं काय.
'त्यानं जीवाची बाजी लावली अन्', भाजप नेत्याची नजाकत भाईंसाठी खास पोस्ट
'त्यानं जीवाची बाजी लावली अन्', भाजप नेत्याची नजाकत भाईंसाठी खास पोस्ट.
उधमपूरमध्ये दहशतवाद्यांशी चकमक; अली शेख यांना वीरमरण
उधमपूरमध्ये दहशतवाद्यांशी चकमक; अली शेख यांना वीरमरण.
'उर्दूही पहिलीपासून शिकवली पाहिजे', शिंदेंच्या नेत्यानं काय म्हटलं?
'उर्दूही पहिलीपासून शिकवली पाहिजे', शिंदेंच्या नेत्यानं काय म्हटलं?.
खळबळजनक! मालेगावमध्ये 9 ठिकाणी ईडीचे छापे
खळबळजनक! मालेगावमध्ये 9 ठिकाणी ईडीचे छापे.
पहलगाममध्ये गोळ्या झाडल्या तिथे 25-30 सिलेंडर? अतिरेक्यांचा मोठा डाव?
पहलगाममध्ये गोळ्या झाडल्या तिथे 25-30 सिलेंडर? अतिरेक्यांचा मोठा डाव?.
पाणी थांबवाल तर श्वास थांबवू म्हणणारा दहशतवादी हाफिज सईद घाबरला
पाणी थांबवाल तर श्वास थांबवू म्हणणारा दहशतवादी हाफिज सईद घाबरला.
पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलाची मोठी कारवाई
पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलाची मोठी कारवाई.