Muhurat Trading Updates: अखेर मुहूर्त ट्रेडिंगला सुरुवात, गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचा दिवस
अभिनेत्री भाग्यश्री हिच्या हस्ते मुहूर्त ट्रेडिंगचा शुभारंभ झाला असून, अनेक शेअर्स चांगलेच वधारलेत. आता ट्रेडिंग सुरू झाले आहे. पैसे गुंतवा आणि पैसे कमवा हेच मी या निमित्ताने सांगेन, असंही अभिनेत्री भाग्यश्री म्हणालीय. ही खूप चांगली सुरुवात झाली आहे. योग्य जागेवर पैसा गुंतवला पाहिजे, असे माझे मत असल्याचंही भाग्यश्रीनं अधोरेखित केलंय.
मुंबई: गुजराती आणि मारवाडी यांच्यासाठी हा खूप महत्त्वाचा दिवस आहे. आमच्यासाठी आज शेवटचे कॅलेंडर असते. पुढचं वर्ष असेच चांगले जावे, अशी इच्छा आहे. जेव्हापासून बीएसईची स्थापना झाली, तेव्हापासून हा कार्यक्रम सुरू झाला. मागचे वर्ष चांगले गेले हे वर्ष देखील चांगले जाईल, अशी अपेक्षा आहे, असा विश्वास शेअरमार्केट सीईओ आणि संचालक आशिष कुमार चौहान यांनी व्यक्त केलाय.
पैसे गुंतवा आणि पैसे कमवा हेच मी या निमित्ताने सांगेन
अभिनेत्री भाग्यश्री हिच्या हस्ते मुहूर्त ट्रेडिंगचा शुभारंभ झाला असून, अनेक शेअर्स चांगलेच वधारलेत. आता ट्रेडिंग सुरू झाले आहे. पैसे गुंतवा आणि पैसे कमवा हेच मी या निमित्ताने सांगेन, असंही अभिनेत्री भाग्यश्री म्हणालीय. ही खूप चांगली सुरुवात झाली आहे. योग्य जागेवर पैसा गुंतवला पाहिजे, असे माझे मत असल्याचंही भाग्यश्रीनं अधोरेखित केलंय.
मुहूर्त ट्रेडिंगच्या निमित्ताने शेअर बाजारात तेजी
मुहूर्त ट्रेडिंगच्या निमित्ताने शेअर बाजारात तेजी पाहायला मिळत आहे. आज बाजार 436 अंकांच्या वाढीसह 60207 च्या पातळीवर उघडला. सकाळी 6.15 वाजता सेन्सेक्स 436 अंकांच्या वाढीसह 60 हजारांच्या पुढे 60207 च्या पातळीवर व्यवहार करत होता. दिवाळीच्या शुभमुहूर्तावर शेअर बाजार एक तास उघडतो, याला मुहूर्त ट्रेडिंग म्हणतात.
शेअर बाजारातील टॉप 30 मधील शेअर्सचा वेगवान व्यवहार
सध्या शेअर बाजारातील टॉप 30 मधील सर्व शेअर्स वेगाने व्यवहार करत आहेत. बजाज फायनान्शिअल सर्व्हिसेस, महिंद्रा अँड महिंद्रा, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि इंडसइंड बँक या क्षणी सर्वाधिक लाभधारक आहेत. आयसीआयसीआय बँक, डॉ. रेड्डी आणि एचडीएफसी हे सर्वात कमी नफा मिळवणारे आहेत.
गुंतवणूकदार या दिवशी खरेदी करणं शुभ मानतात
आजपासून हिंदी दिनदर्शिका सुरू होत आहे. आज हिंदी संवत 2078 सुरू झाले. गुंतवणूकदार या दिवशी खरेदी करणं शुभ मानतात. प्री-ओपन सत्रात बाजारात प्रचंड वाढ दिसून येत आहे. यावेळी सेन्सेक्स 429 अंकांच्या वाढीसह 60 हजारांच्या वर 60201 च्या पातळीवर व्यवहार करत होता. निफ्टी 103 अंकांच्या वाढीसह 17933 च्या पातळीवर व्यवहार करत होता.
संबंधित बातम्या
Muhurat Trading Updates: मुहूर्त ट्रेडिंगमुळे बाजारात तेजी, सेन्सेक्सने 60 हजारांचा टप्पा ओलांडला
दिवाळीनिमित्त PNBच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी; कर्जावरील व्याजदर 6.50% पर्यंत कमी