Reliance Jio: मुकेश अंबानींची चाल, एअरटेल- आयडियासमोर संकट, केवळ 3 रुपयांत अनलिमिटेड कॉलिंग अन् इतर खूप काही

Mukesh Ambani Jio: जिओच्या प्लॅनची किंमत 75 रुपये आहे. त्यात 23 दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. म्हणजे 3.26 रुपयांमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, एसएमएस, डेटा यासारख्या सुविधा मिळतात. म्हणजे यूजरला एका दिवसाचा खर्च केवळ 3 रुपये येत आहे.

Reliance Jio: मुकेश अंबानींची चाल, एअरटेल- आयडियासमोर संकट, केवळ 3 रुपयांत अनलिमिटेड कॉलिंग अन् इतर खूप काही
Mukesh Ambani
Follow us
| Updated on: Sep 29, 2024 | 1:48 PM

Reliance Jio Recharge Plan: मोबाईल प्रत्येक घरात नाही तर प्रत्येकाच्या हातात आला आहे. मोबाईल ही प्रत्येकाची गरज झाली आहे. काही महिन्यांपूर्वी मोबाईल कंपन्यांनी प्रीपेडच्या दरात भरमसाठ वाढ केली. यामुळे अनेक मोबाईल वापरकर्ते स्वस्त प्लॅनच्या शोधात आहे. मुकेश अंबानी यांची रिलायन्स जिओ देशातील सर्वात प्रसिद्ध टेलिकॉम ऑपरेटर कंपनी आहे. या कंपनीचे देशभरात 48 कोटी युजर्स आहेत. जिओनेच देशात इंटरनेट स्वस्त केले होते. त्यामुळे घराघरात इंटरनेटसुद्धा पोहचली. कॉलिंग फ्रीचा फंडा जिओने सुरु केला. आता या जिओने असा प्लॅन आणला आहे की, त्यामुळे एअरटेल, व्होडाफोन- आयडियासमोर संकट उभे राहिले आहे.

केवळ 3 रुपयांमध्ये अनेक फायदे

जिओने आपल्या युजरसाठी अनेक वेगवेगळे प्लॅन आणले आहेत. या प्लॅनमध्ये फायदे वेगवेगळे आहेत. मोबाईल वापरणारे त्यांच्या गरजेनुसार या प्लॅनची निवड करु शकतात. तुम्ही जिओचा पोर्टफोलियो पाहिल्यावर तुम्हाला एक असा प्लॅन मिळणार आहे, तो पाहून आश्चर्य वाटेल. केवळ 3 रुपयांमध्ये अनेक फायदे या प्लॅनमध्ये आहे.

प्लॅनमध्ये युजरला 2.5 GB डेटा

जिओच्या प्लॅनची किंमत 75 रुपये आहे. त्यात 23 दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. म्हणजे 3.26 रुपयांमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, एसएमएस, डेटा यासारख्या सुविधा मिळतात. म्हणजे यूजरला एका दिवसाचा खर्च केवळ 3 रुपये येत आहे. या प्लॅनमध्ये युजरला 2.5 GB डेटा मिळत आहे. तसेच रोज 100 MB आणि 200MB एक्सट्रा डेटा मिळतो. संपूर्ण व्हॅलिडिटी दरम्यान अनलिमिटेड कॉलिंग आणि 50 SMS ची सुविधा मिळते. तसेच यूजर अन्य इतर फायदे मिळतात. त्यात जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जियो क्लाउडचे मोफत सब्सक्रिप्शन आहे. परंतु हा प्लॅन जिओ भारतच्या युजर्ससाठी आहे.

हे सुद्धा वाचा

काय आहे जिओ भारत?

जिओ भारत रिलायन्सचा फोन आहे. त्यात 4G नेटवर्क मिळते. त्यायी किंमत केवळ 999 रुपये आहे. 7 जुलै 2023 पासून हा फोन बाजारात आला. हा फोन रिलायन्स डिजिटल स्टोअर, जिओ रिटेल आउटलेट आणि इतर रिटेल स्टोर मिळतो.

उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे? शिवाजी पार्कवर कोणाची तोफ धडाडणार?
उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे? शिवाजी पार्कवर कोणाची तोफ धडाडणार?.
'रोहित पवारांच्या मेंदूची तपासणी केली तर 50 % शेण...', मिटकरींची टीका
'रोहित पवारांच्या मेंदूची तपासणी केली तर 50 % शेण...', मिटकरींची टीका.
जरांगे पाटील अमित शहांवर संतापले, मराठ्यांच्या नादी लागू नका नाहीतर..
जरांगे पाटील अमित शहांवर संतापले, मराठ्यांच्या नादी लागू नका नाहीतर...
तर शाळांवर कडक कारवाई होणार, शिक्षण विभागाकडून मोठा शासन निर्णय जारी
तर शाळांवर कडक कारवाई होणार, शिक्षण विभागाकडून मोठा शासन निर्णय जारी.
सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार होणार नाही? 'लाडकी बहीण'वरून राऊतांची टीका
सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार होणार नाही? 'लाडकी बहीण'वरून राऊतांची टीका.
'दादा गुलाबी झाले तरी...', अजित पवार यांच्यावर कोणाचा निशाणा?
'दादा गुलाबी झाले तरी...', अजित पवार यांच्यावर कोणाचा निशाणा?.
म्हणून ABVPचा सुपडासाफ, सिनेट निवडणुकीवरुन राऊतांकडून सरकारला लक्ष्य
म्हणून ABVPचा सुपडासाफ, सिनेट निवडणुकीवरुन राऊतांकडून सरकारला लक्ष्य.
अक्षय शिंदेचा एन्काऊंटर खरा की खोटा? जितेंद्र आव्हाडांकडून ऑडिओ ट्विट
अक्षय शिंदेचा एन्काऊंटर खरा की खोटा? जितेंद्र आव्हाडांकडून ऑडिओ ट्विट.
आनंद दिघेंच्या मृत्यूवरून पुन्हा सवाल, शिरसाटांचा मोठा दावा अन नवा वाद
आनंद दिघेंच्या मृत्यूवरून पुन्हा सवाल, शिरसाटांचा मोठा दावा अन नवा वाद.
लाडकी बहीण स्वार्थासाठी, ऑक्टोबरचा हफ्ता दिल्यानंतर..राज ठाकरेंची टीका
लाडकी बहीण स्वार्थासाठी, ऑक्टोबरचा हफ्ता दिल्यानंतर..राज ठाकरेंची टीका.