मुकेश अंबानी यांच्याकडून नीता अंबानी यांना जगातील सर्वात महागडं गिफ्ट; किंमत ऐकून डोळे विस्फारतील
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांची पत्नी नीता अंबानी यांची यंदाची दिवाळी अविस्मरणीय ठरली आहे. मुकेश अंबानी यांनी नीता यांना जगातील सर्वात मोठं आणि महागडं गिफ्ट दिलं आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी आजचा दिवस खास ठरला आहे. विशेष म्हणजे नीता अंबानी यांना देण्यात आलेलं हे जगातील सर्वात महागडं आणि देशातील ही सर्वात महागडं गिफ्ट असून सध्या या गिफ्टचीच जोरदार चर्चा सुरू आहे.
मुंबई | 12 नोव्हेंबर 2023 : रिलायन्स इंडस्ट्रिचे चेअरमन आणि देशातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांना झेड प्लस सुरक्षा आहे. जेव्हा त्यांचा ताफा निघतो तेव्हा लग्झरी कार दिसतात. अंबानी यांच्या कार कलेक्शनमध्ये अल्ट्रा लग्झरी कारचा समावेश आहे. या कारचा ताफा जेव्हा निघतो, तेव्हा अनेकांचे डोळे दिपून जातात. जगातील सर्वात महागडी कार रोल्स रॉयसचाही अंबानी यांच्या ताफ्यात समावेश आहे. आता अंबानी यांच्या घरी आणखी एका रोल्स रॉयस कारचा समावेश झाला आहे. मुकेश अंबानी यांनी त्यांची पत्नी नीता अंबानी यांना दिवाळी निमित्ताने Rolls Royce Cullinan SUV ही कार गिफ्ट म्हणून दिली आहे. आजवरचं हे दिवाळीतील सर्वात महागडं गिफ्ट तर आहेच, पण देशातीलही हे सर्वात महागडं गिफ्ट आहे.
दिवाळी निमित्त देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या सर्वात श्रीमंत पत्नीला सर्वात महागडी कार मिळाली आहे. मुकेश अंबानी यांनी पत्नी नीता अंबानी यांना रोल्स रॉयस कलिनन कारचा ब्लॅक बॅज एडिशन एसयूव्ही गिफ्ट म्हणून दिला आहे. ही सर्वात महागडी आणि यूनिक कार मानली जाते. मुकेश अंबानी यांनी नीता यांना दिलेली ही कार एक दोन कोटींची नाहीये. रोल्स रॉयस कार तिच्या किंमतीसाठीही प्रसिद्ध आहे. नीता यांना गिफ्ट मिळालेल्या या कारची किंमत 10 कोटी एवढी आहे.
कारचे पाच खास फिचर्स
रोल्स रॉयस कस्टमर्सला कस्टमायजेशनची सुविधा आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार या कारमध्ये अनेक बदल करू शकता. अल्ट्रा लग्झरी एसयूव्ही कार 6.75 लीटर ट्विन टर्बो V12 इंजिन पॉवर लेन्स आहे. या कारचा 8 स्पीड ऑटोमैटिक गिअरबॉक्स चारही चाकांपर्यंत पॉवर देते.
सामान्य कलिनन कारच्या तुलनेत ब्लॅक बॅज एडिशनचे एक्स्टीरिअर ग्लॉस ब्लॅक हायलाईट्सह मिळतो. यात आयकॉनिक ‘Spirit of Ecstasy’ सुद्धा आहे. त्यामुळे कारला अधिक चांगला ग्रँड प्रिंजेस मिळतो.
स्टँडर्ड कलिननमध्ये 571 PSच्या मॅक्सिमम पॉवरचा दावा केला जातो. तर कलिनन ब्लॅक बॅजचा मॅक्सिमम पॉवर आऊटपूट 600 PS आहे. एवढेच नव्हे तर मॅक्सिमम टॉर्क आऊटपूट सुद्धा स्टँडर्ड 850 Nm वरून कलिनन ब्लॅक बॅजमध्ये 900 Nm देण्यात आला आहे. तसा दावाच करण्यात आला आहे.
कलिनन ब्लॅक बॅज प्रचंड वेगाने धावते. या अल्ट्रा लग्झरी कारची टॉप स्पीड ताशी 250 किलोमीटर इतका आहे.
जगातील सर्वात बेस्ट कारमध्ये प्रीमियम एसयूव्ही असल्याचं मानलं जातं. कलिनन ब्लॅक बॅजमध्ये इंटेरियरमध्ये काही एलिमेंट्स कार्बन फायबरमध्ये तयार करण्यात आले आहेत. लेदर अपहोल्स्ट्री ब्लॅक कलर स्कीमवर आधारीत आहे.
अंबानी कुटुंब भारतातील सर्वात श्रीमंत कुटुंब आहे. त्यांचं अंटालिया हे अलिशान घर 15000 कोटींचं असून या घरात गॅरेजही आहे. या गॅरेजमध्ये जगभरातील कारचा समावेश आहे.