Mukesh Ambani : मुकेश अंबानी यांची कमाल, 5G मध्ये ब्रिटनलाही टाकले मागे, असा गाठला टप्पा
Mukesh Ambani and 5G in India: भारताने आज युरोपमधील अनेक देश या बाबतीत मागे टाकले आहे. एवढेच नाही तर भारतात मोबाईल इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या 93.61 कोटींवर पोहोचली आहे.
India 5G Growth Story: भारतात आता 5G तंत्रज्ञान येऊन बराच कालावधी लोटला. मोठ्या शहरांनंतर छोट्य शहरातही 5G तंत्रज्ञान येत आहे. त्याचवेळी ब्रिटनसारखा देशात अजून 5G तंत्रज्ञान पूर्णपणे विकसीत झाले नाही. ब्रिटन 5G तंत्रज्ञानाची तयारी करत असताना भारत 6G तंत्रज्ञानकडे वाटचाल करत आहे. ग्लोबल स्पीडटेस्ट इंडेक्समध्ये भारताचे रँकिंग ब्रिटन तसेच अनेक युरोपीय देशांपेक्षा चांगले आहे.
ब्रिटनसारख्या देशात व्होडाफोन आणि Three या दोन कंपन्यांचे विलीनीकरण झाले. त्यासाठी एक अटी होती. त्या अटीनुसार व्होडाफोन 5G तंत्रज्ञानावर अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक करतील. ब्रिटन सध्या 5G तंत्रज्ञानासाठी स्वतःला अपडेट करत असताना भारतातही 6G ची तयारी सुरू झाली आहे.
सप्टेंबर 2016 मध्ये जेव्हा रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी जिओ लाँच केले. तेव्हा त्यांनी एक गोष्ट सांगितली होती की, भविष्यात ‘डेटा इज द न्यू ऑइल’ असा असेल, असे त्यांनी म्हटले होते. त्यांच्या या विधानाचे दोन अर्थ होते. एक म्हणजे जगातील मोठ्या टेक कंपन्यांना लाईक्स, कमेंट्स, शेअर्स, चॅट्स आणि पोस्ट्सद्वारे डेटा देत आहोत. मुकेश अंबानी यांच्या रिलायन्सने 5G टेक्नोलॉजीत ब्रिटनला मागे सोडले आहे. भारत आज 5G टेक्नोलॉजी बनला असताना युरोपात अनेक देशात 5G नाही.
डेटाचा वेग भारी
भारतात डेटाचा वेग म्हणजे 4G आणि 5G चे जग आहे. भारताच्या रिलायन्स जिओने आज 5G सारख्या तंत्रज्ञानात ब्रिटनला मागे टाकले आहे. मोबाईल इंटरनेट स्पीडच्या बाबतीत ओकलाच्या रॅकींगनुसार, भारताने आज युरोपमधील अनेक देश या बाबतीत मागे टाकले आहे. एवढेच नाही तर भारतात मोबाईल इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या 93.61 कोटींवर पोहोचली आहे.
मुकेश अंबानी यांनी असा गाठला पल्ला
मोबाईल ग्राहकांच्या बाबतीत रिलायन्स जिओ ही देशातील सर्वात मोठी कंपनी आहे. त्याच्या ग्राहकांची संख्या 46.37 कोटी आहे. तर भारती एअरटेल 38.34 कोटी ग्राहकांसह दुसऱ्या स्थानावर आहे. जेव्हा मुकेश अंबानी यांनी रिलायन्स जिओ लाँच केले तेव्हा देशातील 4G ची तयारी करणारी ती एकमेव कंपनी होती. सुरुवातीला कंपनीने 6 महिन्यांसाठी मोफत इंटरनेट पुरवले. त्यामुळे जिओ ग्राहकांची संख्या वाढली. तसेच देशात 4G चा वापर झपाट्याने झाला. इतकेच नाही तर रिलायन्स जिओने बाजारात अतिशय स्पर्धात्मक किमतीत इंटरनेट प्लॅन लाँच केले. ज्यामुळे देशात इंटरनेटची किंमत स्वस्त झाली.