राजस्थानमधील या इतिहासकालीन मंदिरामध्ये अनंत अंबानी याचा साखरपुडा पडला पार
इतकेच नाहीतर दोघे लवकरच लग्न बंधणात अडकणार असल्याची देखील एक चर्चा आहे.
मुंबई : मुकेश अंबानी यांचा धाकडा मुलगा आणि आयपीएल मॅचदरम्यानचा फेमस चेहरा अनंत अंबानी याचा साखरपुडा नुकताच पार पडलाय. या साखरपुड्यामधील काही खास फोटो सोशल मीडियावर आता तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. इतकेच नाहीतर अंबानी कुटुंबाच्या लहाण्या सुनेचे फोटो बघण्यासाठी सर्वचजण इच्छुक आहेत. अनंत अंबानी याचा साखरपुडा राधिका मर्चेंट हिच्यासोबत झालाय. इतकेच नाहीतर दोघे लवकरच लग्न बंधणात अडकणार असल्याची देखील एक चर्चा आहे.
राधिका मर्चेंट आणि अनंत अंबानी यांचा साखरपुडा हा राजस्थान येथील राजसमंद जिल्ह्यातील प्रसिध्द नाथद्वारा येथील श्रीनाथजी मंदिरामध्ये झालाय. या साखरपुड्यामधील फोटो आता व्हायरल होताना दिसत आहेत.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांचा साखरपुडा राजस्थानमधील ज्या श्रीनाथजी मंदिरामध्ये झालाय ते मंदिर राजस्थानमध्ये अत्यंत प्रसिध्द असून भाविक या मंदिरात दर्शन घेण्यासाठी लांबून येतात.
नाथद्वारा येथील श्रीनाथजी मंदिर 1672 मध्ये बांधले गेले आहे. या मंदिराचा अत्यंत जुना इतिहास आहे. असे म्हटले जाते की, मुगल बादशाह औरंगजेब देखील हे मंदिर तोडू शकला नव्हता. या मंदिराचा प्राचीन इतिसाह आहे.
राधिका मर्चेंट ही अनंत अंबानी याची लहानपणापासूनची मैत्रिण आहे. दोघांचे बालपणसोबतच गेले आहे. राधिका ही एक क्लासिकल डान्सर आहे. काही दिवसांपूर्वीच राधिका मर्चेंट हिचा क्लासिकल डान्सचा एक कार्यक्रम मुंबईमध्ये पार पडला आहे.
राधिका मर्चेंट औषध कंपनी एनकोर हेल्थकेयरचे सीईओ उद्योगपती वीरेन मर्चेंट यांची लेक असून ही अंबानी कुटुंबीयांच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये हजर असायची. यापूर्वी अनंत आणि राधिका यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.