AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इंधनाचे नवे दर जाहीर; जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल, डिझेलचे भाव

दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर प्रति लिटर 95.41 तर डिझेलचे दर 86.67 रुपये इतके आहेत.  मुंबईमध्ये पेट्रोलचे दर प्रति लिटर 109.98 व डिझेलचे दर हे 94.14 रुपये आहेत. गेल्याच आठवड्यात केजरीवाल सरकारने व्हॅट कपातीचा निर्णय घेतल्याने, दिल्लीमध्ये इंधनाच्या किमती काहीप्रमाणात कमी झाल्या आहेत.

इंधनाचे नवे दर जाहीर; जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल, डिझेलचे भाव
झारखंडमध्ये पेट्रोलचे दर 25 रुपयांनी घटवले
| Edited By: | Updated on: Dec 10, 2021 | 9:22 AM
Share

नवी दिल्ली : गेल्या महिन्याभरापासून पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आज पेट्रोल कंपन्यांनी जाहीर केलेल्या नव्या दरानुसार दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर प्रति लिटर 95.41 तर डिझेलचे दर 86.67 रुपये इतके आहेत.  मुंबईमध्ये पेट्रोलचे दर प्रति लिटर 109.98 व डिझेलचे दर हे 94.14 रुपये आहेत. गेल्याच आठवड्यात केजरीवाल सरकारने व्हॅट कपातीचा निर्णय घेतल्याने दिल्लीमध्ये इंधनाच्या किमती काहीप्रमाणात कमी झाल्या आहेत. त्यामुळे दिल्लीकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

प्रमुख शहरातील इंधनाचे दर

पेट्रोल कंपन्यांनी आज जाहीर केलेल्या नव्या दरानुसार पेट्रोल, डिझेलच्या किमतीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. महिनाभरापासून दर स्थिर आहेत. दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर प्रति लिटर 95.41 तर डिझेलचे दर 86.67 रुपये इतके आहेत. तर मुंबईमध्ये पेट्रोलचे दर प्रति लिटर 109.98 तर डिझेलचे दर हे 94.14 रुपये आहेत. कोलकातामध्ये पेट्रोल प्रति लिटर 104.67 आणि डिझेल 89.79 रुपये लिटर आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल आणि डिझेल अनुक्रमे 101.40 आणि 91. 43 रुपये इतके आहे.

दररोज 6 वाजता बदलतात किमती

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल होत असतो. सकाळी सहा वाजता नवे दर लागू केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती एक्साइज ड्युटी, डिलर कमिशन आणि अन्य गोष्टी जोडल्यानंतर त्याचा भाव जवळपास दुप्पट होतो.

असे तपासा पेट्रोल आणि डिझेलचे भाव

आपण एसएमएसच्या माध्यमातून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाणून घेऊ शकता. पेट्रोल-डिझेलच्या किमती दररोज सकाळी 6 वाजता बदलतात. इंडियन ऑइलच्या वेबासाइटनुसार, RSP बरोबर आपल्या शहराचा कोड टाइप करून 9224992249 नंबरवर SMS पाठवावा लागणार आहे. या शहराचा कोड वेगवेगळा असतो. बीपीसीएल ग्राहक RSP लिहून 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक HPPrice लिहून 9222201122 या नंबरवर मेसेज पाठवून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाणून घेऊ शकतात.

संबंधित बातम्या

‘एससीएसएस’मध्ये गुंतवणूक केल्यास होईल मोठा फायदा; जाणून घ्या काय आहे योजना?

‘या’ तीन बँकांकडून ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर मिळतोय चांगला परतावा; पहा किती आहे व्याजदर

क्रिप्टो करन्सीच्या दरात घसरण; गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.