या ऑफर अंतर्गत, जर ग्राहकाने 24 कॅरेट सोने जिंकले असेल, तर त्याला पेटीएम अॅपवरून गॅस सिलेंडर (lpg cylinder) बुक करावे लागेल. सध्या ही ऑफर सुरू आहे आणि 7 ऑक्टोबरपासून सुरु झालेली ही ऑफर ग्राहकांसाठी 16 ऑक्टोबरपर्यंत चालेल. जर तुम्ही 7 तारखेपूर्वी सिलिंडर बुक केले असेल पण ते भरले नसेल तर तुम्हीही या ऑफरचा लाभ घेऊ शकता. आपल्याला फक्त पेटीएमद्वारे गॅस एजन्सी किंवा विक्रेत्याला पैसे द्यावे लागतील.
उज्ज्वला योजनेअंतर्गत अशा प्रकारचे गॅस कनेक्शन बुक केले जाऊ शकतात. आपल्याला फक्त आपले आधार कार्ड आणि जुन्या गॅस कनेक्शनशी संबंधित कागदपत्रांची प्रत गॅस एजन्सीला द्यावी लागेल आणि नवीन गॅस कनेक्शनसाठी अर्ज करावा लागेल.
एकाच पत्त्यावर अनेक गॅस कनेक्शन घेतले जाऊ शकतात. सर्व गॅस कनेक्शन आधारशी जोडलेले असल्याने कोणत्याही प्रकारच्या फसवणुकीला वाव नाही. सरकार एकाच पत्त्यावर अनेक गॅस कनेक्शनची सुविधा सतत विस्तारत आहे. ऑनलाईन अर्ज किंवा एलपीजी गॅस कनेक्शन हस्तांतरित करण्याची प्रक्रिया देखील अगदी सोपी झालीय.
या सुविधेअंतर्गत जर आई -वडील, भावंड किंवा कुटुंबातील इतर कोणत्याही नातेवाईकाच्या नावाने आधीच गॅस कनेक्शन घेतले गेले असेल, तर कुटुंबातील इतर सदस्यही या पत्त्याचा लाभ घेऊ शकतात. फक्त या पत्त्याची पडताळणी करावी लागेल. ज्या कुटुंबाला गॅस सिलिंडर येते त्या तेल पुरवठा कंपनीच्या गॅस एजन्सीकडे जाऊन मूळ गॅस कनेक्शनशी संबंधित कागदपत्रे द्यावी लागतील. पडताळणीनंतर नवीन गॅस कनेक्शन उपलब्ध होईल.
Lpg Gas Cylinder Booking