AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अंबानी, अदानी आणि टाटा यांच्याशी स्पर्धा करण्यासाठी NTPC चा मेगा प्लॅन

एनटीपीसीने 2032 पर्यंत 60GW अक्षय ऊर्जा निर्मितीचे लक्ष्य ठेवले. 2032 पर्यंत 130 GW वीजनिर्मिती करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. यामध्ये अक्षय ऊर्जेचा वाटा 45 टक्क्यांच्या जवळ असेल. यापूर्वी एनटीपीसीने 2032 पर्यंत 32 जीडब्ल्यूचे नूतनीकरणयोग्य ऊर्जा लक्ष्य ठेवले होते, जे एकूण उद्दिष्टाच्या 25 टक्के होते.

अंबानी, अदानी आणि टाटा यांच्याशी स्पर्धा करण्यासाठी NTPC चा मेगा प्लॅन
adani ambani
| Edited By: | Updated on: Oct 03, 2021 | 5:37 PM
Share

नवी दिल्लीः नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन (NTPC) ने मार्च 2024 पर्यंत निर्गुंतवणुकीद्वारे 15 हजार कोटींचा निधी गोळा करण्याची योजना बनवली. यासाठी NTPC त्याच्या तीन सहाय्यक NTPC अक्षय ऊर्जा, NEEPCO (नॉर्थ ईस्टर्न इलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन) आणि NTPC विद्युत व्यापारी निगम यांची स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्टिंग करणार आहे. विश्वसनीय स्त्रोतांच्या हवाल्याने ही बातमी समोर येत आहे.

तीन सहाय्यक कंपन्यांची लिस्टिंग तयार

15 हजार कोटींचे निर्गुंतवणुकीचे लक्ष्य साध्य करण्यासाठी कंपनी तीन सहाय्यक कंपन्यांची लिस्टिंग तयार करेल. या व्यतिरिक्त एनएसपीसीएल (एनटीपीसी-सेल पॉवर कंपनी लिमिटेड) मधील आपला हिस्सा विकेल. या आर्थिक वर्षात हे काम पूर्ण होईल, असा विश्वास आहे. एनटीपीसी आणि सेल यांच्यात 50, 50 टक्के भागांसह हा संयुक्त उपक्रम आहे. या कंपनीची स्थापना 8 फेब्रुवारी 1999 रोजी झाली.

ऑक्टोबर 2022 पर्यंत लिस्टिंग पूर्ण होणार

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एनटीपीसी आरईएल (एनटीपीसी रिन्यूएबल एनर्जी) ची लिस्टिंग ऑक्टोबर 2022 पर्यंत पूर्ण होईल. एनटीपीसीचा त्यात 100% हिस्सा आहे. या कंपनीकडे सध्या 3450 मेगावॅटचा प्रकल्प आहे, त्यापैकी 820 मेगावॅटचे बांधकाम सुरू आहे. 2630 मेगावॅटच्या वीज खरेदी कराराबाबत काम सुरू आहे. नवीकरणीय ऊर्जा व्यवसाय सुरू करण्यासाठी ऑक्टोबर 2020 मध्ये या कंपनीची स्थापना करण्यात आली.

2032 पर्यंत 60GW अक्षय ऊर्जेचे लक्ष्य

एनटीपीसीने 2032 पर्यंत 60GW अक्षय ऊर्जा निर्मितीचे लक्ष्य ठेवले. 2032 पर्यंत 130 GW वीजनिर्मिती करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. यामध्ये अक्षय ऊर्जेचा वाटा 45 टक्क्यांच्या जवळ असेल. यापूर्वी एनटीपीसीने 2032 पर्यंत 32 जीडब्ल्यूचे नूतनीकरणयोग्य ऊर्जा लक्ष्य ठेवले होते, जे एकूण उद्दिष्टाच्या 25 टक्के होते.

अदानी हरित ऊर्जेवर 1.5 लाख कोटी खर्च करतील

खरं तर हरित ऊर्जेच्या क्षेत्रात देशातील मोठ्या कंपन्या झपाट्याने विस्तारत आहेत. अदानी यांनी अलीकडेच सांगितले की, ते पुढील 10 वर्षांत स्वच्छ ऊर्जेसाठी 20 अब्ज डॉलर किंवा 1.5 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करतील. मिंटच्या अहवालानुसार, अदानी समूह सध्या 4920 मेगावॅट अक्षय ऊर्जा निर्मिती करत आहे. याशिवाय 5124 मेगावॅट उत्पादन क्षमतेवर काम चालू आहे.

रिलायन्स ग्रीन एनर्जीची मेगा योजना

रिलायन्स इंडस्ट्रीजने स्वच्छ ऊर्जेसाठी रिलायन्स ग्रीनची स्थापना केली आणि या कंपनीसाठी 75 हजार कोटींचा मोठा निधी जाहीर करण्यात आला. आंतरराष्ट्रीय हवामान शिखर परिषद 2021 मध्ये बोलताना मुकेश अंबानी म्हणाले होते की, रिलायन्स 2030 पर्यंत अक्षय स्त्रोतांमधून 100 गिगावॅट ऊर्जा निर्माण करेल.

टाटा पॉवर आयपीओ लाँच करणार

टाटा समूहाची कंपनी टाटा पॉवर देखील स्वच्छ ऊर्जेमध्ये वेगाने प्रगती करत आहे. टाटा पॉवर आपला हरित ऊर्जा व्यवसाय शेअर बाजारात सूचीबद्ध करण्याचा विचार करत आहे. याद्वारे ती 3500 कोटींपेक्षा जास्त निधी गोळा करेल.

संबंधित बातम्या

रेल्वेचे एसी भाडे पूर्वीपेक्षा स्वस्त होणार, रेल्वेने ‘या’ गाड्यांमध्ये 3 टियर इकॉनॉमी डबे बसवले, यादी पाहा

स्टेट बँकेने ‘दमदार दस कॅशबॅक ऑफर’ केली सुरू, तुम्हाला SBI कार्डवर मिळणार 10,000 रुपयांपर्यंत लाभ

NTPC’s mega plan to compete with Ambani, Adani and Tata

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.