Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुमच्याकडे दोन रुपयांचं नाणं आहे का? मग तुम्हीही होऊ शकता लखपती, जाणून घ्या कसे?

आज आम्ही तुम्हाला अशाच एका दोन रुपयांच्या नाण्याबद्दल सांगणार आहोत जे तुमच्या कलेक्शनमध्ये असेल तर तुम्ही घरबसल्या लखपती होऊ शकता.

तुमच्याकडे दोन रुपयांचं नाणं आहे का? मग तुम्हीही होऊ शकता लखपती, जाणून घ्या कसे?
coin
Follow us
| Updated on: Jun 10, 2021 | 11:34 AM

मुंबई : कोरोना काळात घरबसल्या पैसे कमवणाऱ्या संधीच्या शोधात अनेक जण असतात. आपल्यापैकी अनेकांच्या पॉकेट, पर्स किंवा कपाटात 1 किंवा 2 रुपयांची दुर्मिळ नाणी असतात. अनेकजण ही नाणी वर्षानुवर्षे जपून ठेवतात. पण हीच नाणी तुम्हाला लाखो रुपये कमवून देऊ शकतात. विचारात पडलात ना…पण हे खरं आहे. (Two Rupees Old Coin make You rich Know How)

गेल्या काही दिवसांपासून अनेकांमध्ये जुन्या नोटा आणि नाण्याचा संग्रह करण्याचे प्रमाण वाढलं आहे. ज्या लोकांना नाणी-नोटांचा संग्रह करण्याचा शौक असतो, ते या नोटा अत्यंत महागड्या किंमतीत विकत घेत आहेत. त्यामुळे जर तुमच्याकडे एखाद्या विशिष्ट नंबरची किंवा एखाद्या ठराविक काळातील नाणं असेल तर ते तुम्हाला लाखो रुपये मिळवून देऊ शकते.

घरबसल्या व्हाल लखपती

सध्या अनेक ऑनलाईन वेबसाईटवर खूप जुन्या दुर्मिळ नोटा-नाणी विकल्या जात आहे. जर तुम्हाला जुन्या नाण्यांचा संग्रह करण्याचा शौक असेल तर तुम्हाला एका रात्रीत लाखो रुपयांचा फायदा मिळू शकतो. आज आम्ही तुम्हाला अशाच एका दोन रुपयांच्या नाण्याबद्दल सांगणार आहोत जे तुमच्या कलेक्शनमध्ये असेल तर तुम्ही घरबसल्या लखपती होऊ शकता. जर तुमच्याकडे 2 रुपयांचे हे ठराविक वैशिष्ट्यं असलेले दुर्मिळ नाणे असेल तर तुम्हाला लाखो रुपये मिळू शकता.

दुर्मिळ नोटा-नाण्यांना लाखोंचा भाव 

सध्या क्विकर (Quickr) सारख्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर दुर्मिळ नोटा-नाण्यांची विक्री सुरु आहे. यात काही जण हे 1994 मध्ये निर्मित झालेले 2 रुपयांचे नाण्याच्या शोधात आहे. या नाण्याच्या मागच्या बाजूला भारताचा ध्वज आहे. क्विकर (Quickr) वेबसाईटवर या दुर्मिळ नाण्याची किंमत तब्बल 5 लाख रुपये निश्चित केली गेली आहे.

तर स्वातंत्र्यापूर्वी राणी व्हिक्टोरियाच्या काळात बनवण्यात आलेल्या चांदीच्या एक रुपयांच्या दुर्मिळ नाण्याची किंमत 5 लाख रुपये निश्चित करण्यात आलेली आहे. तर 1918 मधील George VI King Emperor च्या काळात निर्मिती झालेल्या एका रुपयांच्या ब्रिटीश नाण्याची किंमत 9 लाखांपर्यंत आहे.

अशी करा जुन्या दुर्मिळ नाणी-नोटांची विक्री?

जर तुमच्याकडेही 1 आणि 2 रुपयांची फार जुनी नोट किंवा दुर्मिळ नाणी असतील तर ते तुम्हाला लाखो रुपये मिळवून देऊ शकता. यासाठी तुम्हाला Ebay, Quickr यासारख्या वेबसाईटवर जाऊन रजिस्ट्रेशन करावे लागले. त्यासाठी त्या ठराविक नाण्याचा एक फोटो क्लिक करा आणि तो साईटवर अपलोड करा. यानंतर खरेदीदार तुमच्याशी थेट संपर्क साधतील. यानंतर तुम्ही किंमत आणि डिलिव्हरी यासर्व गोष्टी ठरवून त्याची तुम्ही विक्री करु शकतो. (Two Rupees Old Coin make You rich Know How)

संबंधित बातम्या : 

तुमच्याकडे 1 रुपयांची नोट आहे, मग तुम्हीही बनू शकता श्रीमंत, जाणून घ्या कसे?

प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना.
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका.
कुणाल कामराने पुन्हा एकदा सरकारला डिवचलं, 'त्या' ट्वीटची चर्चा
कुणाल कामराने पुन्हा एकदा सरकारला डिवचलं, 'त्या' ट्वीटची चर्चा.
'धनंजय मुंडे माझ्या घरी आले अन्...', अंजली दमानियांचा मोठा गौप्यस्फोट
'धनंजय मुंडे माझ्या घरी आले अन्...', अंजली दमानियांचा मोठा गौप्यस्फोट.