Omicron Effect: सोन्याच्या भावात तेजी, जाणून घ्या गुंतवणुकीबद्दल तज्ज्ञ काय सांगतात?
जगासह देशात पुन्हा एकदा कोरोना (Corona) संकटाने डोके वर काढले आहे. कोरोनाचा नवा व्हेरियंट असलेला ओमिक्रॉन (Omicron) हा अधिक घातक असल्याचा निर्वाळा जागतिक आरोग्य संघटनेकडून (WHO) देण्यात आल आहे. याचा परिणाम हा सोन्याच्या किमतीवर झाल्याचे पहायला मिळत आहे.
नवी दिल्ली: जगासह देशात पुन्हा एकदा कोरोना (Corona) संकटाने डोके वर काढले आहे. कोरोनाचा नवा व्हेरियंट असलेला ओमिक्रॉन (Omicron) हा अधिक घातक असल्याचा निर्वाळा जागतिक आरोग्य संघटनेकडून (WHO) देण्यात आल आहे. कोरानाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता निर्माण झाल्याने त्याचा परिणाम शेअर मार्केटसह सर्वच बाजारपेठेवर झाला आहे. कोरोन वाढीच्या पार्श्वभूमीवर सोन्याचे भाव देखील वधारले आहेत. सोन्याच्या दर प्रति ग्रॅम 219 रुपयांनी वाढले आहेत.
सोने प्रति तोळा 47,640 वर
आज 24 कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळा 219 रुपयांनी वाढून 47,640 वर पोहोचले आहेत. कमोडिटी बाजार तज्ज्ञांच्या मते सध्या जगावर कोरोनाचा नवा व्हेरियंट असलेल्या ओमिक्रॉन या विषाणूचे सावट आहे. याचाच परिणाम म्हणून पुढील काही दिवस सोन्याच्या दरामध्ये तेजी राहु शकते, दुसरीकडे वाढती महागाई, डॉलरच्या तुलनेमध्ये घसरलेला रुपया अशा कारणांमुळे देखील सोन्याच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. दरम्यान येणाऱ्या काळात सोन्याच्या दरामध्ये आणखी तेजी येण्याचा अंदाज आहे. त्यामुळे अल्पकालावधीसाठी सोन्यामध्ये केलेली गुंतवणुक अधिक नफा मिळून देऊ शकते असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे.
…तर होऊ शकतो फायदा
येणाऱ्या काळात सोन्यामध्ये गुंतवणुक केल्यास फायदा होऊ शकतो का याबाबत बोलताना मोलीलाल ओसवाल कमोडिटी सिसर्चचे उपाध्यक्ष अमित सजेजा यांनी म्हटले आहे की, सध्या सोन्याच्या दरामध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यामागचे प्रमुख कारण म्हणजे कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉन हे आहे. ओमिक्रॉनमुळे मार्केटवर पुन्हा एकदा दबाव निर्माण झाल्याने सोन्याचे दर वाढले आहेत. सोबतच महागाई आणि अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाचे झालेले अवमुल्य ही देखील प्रमुख कारणे आहेत. येत्या काळात सोन्याचे दर आणखी वाढण्याचे संकेत मिळत आहेत. अशा परिस्थितीमध्ये जर अल्प कालावधीसाठी सोन्यामध्ये गुंतवणुक केल्यास त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. पुढील महिन्यापर्यंत सोने प्रति तोळा 49 हजारांवर पोहचण्याची शक्यता असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.
दरात चढउतार
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरामध्ये सातत्याने चढउतार सुरू आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सोने प्रति तोळा 56 हजारांवर पोहोचले होते. मात्र त्यानंतर सोन्याच्या दरात सातत्याने घट झाली. सोन्याचे दर झपाट्याने कमी होत असल्याने अनेकांनी सोन्यामधील गुंतवणूक काढली होती. मात्र आता पुन्हा एकदा सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून देण्यात येत आहे.
संबंधित बातम्या
पोस्टाच्या ‘या’ योजनेत गुंतवा पैस, आपल्या मुलीचे भविष्य करा अधिक सुरक्षीत
Multibagger Penny Stock: 3 महिन्यांत 1200 टक्के परतावा, 1 लाख रुपयांचे झाले 13 लाख