ऑनलाईन गांजा विक्री प्रकरण; अॅमझॉन इंडियाच्या कार्यकारी संचालकांविरोधात गुन्हा दाखल
मध्यप्रदेशच्या भिंड जिल्ह्यातून ऑनलाईन गांजा विक्रीचे रॅकेट समोर आले होते. ऑनलाईन शॉपिंग साईट असणाऱ्या अॅमझॉनवरून गांजा मागवण्यात आल्याचे पोलिसांनी म्हटले होते. आता या प्रकरणात अॅमझॉन इंडियाच्या कार्यकारी संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवी दिल्ली – मध्यप्रदेशच्या भिंड जिल्ह्यातून ऑनलाईन गांजा विक्रीचे रॅकेट समोर आले होते. ऑनलाईन शॉपिंग साईट असणाऱ्या अॅमझॉनवरून गांजा मागवण्यात आल्याचे पोलिसांनी म्हटले होते. आता या प्रकरणात अॅमझॉन इंडियाच्या कार्यकारी संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वीटनरच्या नावाखाली या ऑनलाईन साईटवरून गांजांची विक्री करण्यात आल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.
…तर प्रकरणाची चौकशी करू
दरम्यान या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना अॅमझॉनने म्हटले होते की, कोणत्याही प्रकारच्या अवैध उत्पाद विक्रीला कंपनी परवानगी देत नाही. असा प्रकार खरच घडला असेल तर कंपनीकडून या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यात येईल. याबाबत बोलताना भिंडचे पोलीस अधीक्षक मनोज कुमार सिंह यांनी सांगितले की, अॅमझॉनवरून ऑनलाईन गांजाची विक्री झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर अॅमझॉन इंडियाच्या कार्यकारी संचालकांविरोधात अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
21.7 किलो गांजा जप्त
पुढे बोलताना मनोज कुमार सिंह म्हणाले की, ग्वालियरचे रहिवासी असलेल्या बिजेंद्र तोमर आणि सूरज उर्फ कल्लू पवैया यांच्याकडून 21.7 किलो गांजा जप्त करण्यात आला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली असात, गांजाची ही डिलिव्हरी अॅमझॉनवरून झाल्याचे पोलीस तपासात समोर आले. या प्रकरणात आता अॅमझॉन इंडियाच्या कार्यकारी संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संबंधित बातम्या
कपडे महागणार | ड्रेस आणि फुटवेअरवर 5% ऐवजी 12% GST, जानेवारी 2022 पासून नवे दर
EPFO ची मोठी घोषणा| आता नोकरी बदलल्यावर दोन पीएफ खाती एकत्र करावी लागणार नाहीत, कारण…
EPFO Subscribers : सप्टेंबरमध्ये 15.41 लाख सदस्य EPFO मध्ये सामील, 9 लाख नवे सदस्य