SBI ने 42 कोटी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट, आता घर बसल्या मिळणार ‘या’ 9 सुविधांचा लाभ
एसबीआय योनो मोबाईल अॅपद्वारे डोरस्टेप बँकिंग सेवा सुरू करत आहेत. वेब पोर्टल आणि कॉल सेंटर या मोबाईल अॅपद्वारे या सुविधांचा लाभ ग्राहकांना घेता येणार आहे.
मुंबई : देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेने त्यांच्या 42 कोटी ग्राहकांना मोठं गिफ्ट दिलं आहे. ग्राहक आता घर बसल्या हँकेत्या 9 सेवांचा लाभ घेऊ शकतात. बँकेने दिलेल्साय माहितीनुसार, एसबीआय योनो मोबाईल अॅपद्वारे डोरस्टेप बँकिंग सेवा सुरू करत आहेत. वेब पोर्टल आणि कॉल सेंटर या मोबाईल अॅपद्वारे या सुविधांचा लाभ ग्राहकांना घेता येणार आहे. (online sbi start doorstep banking dsb services banking facility here is how it works)
इतकंच नाहीतर, कामकाजाच्या दिवशी, टोल फ्री क्रमांक 1800 1037 188 किंवा 1800 1213 721 वर सकाळी 9 ते संध्याकाळी 4 दरम्यान कॉल करता येईल. एसबीआय डोअरस्टेप बँकिंग सेवांविषयी अधिक माहितीसाठी, ग्राहक https://bank.sbi/dsb वर भेट देऊ शकतात. ग्राहक त्यांच्या गृह शाखेशी संपर्क साधू शकतात.
काय आहे. SBI ची डोअरस्टेप बँकिंग सेवा ?
बँकेने दिलेल्या माहितीनुसार, डोअरस्टेप बँकिंगला लाभ घेण्यासाठी ग्राहकांना नोंदणी करावी लागणार आहे. सगळ्यात आधी चेक, डिमांड ड्राफ्ट, वेतन ऑर्डर इत्यादी, फॉर्म 15G/15H , IT/GST चालान, अकाउंट स्टेटमेंट, मुदत ठेव पावती जमा करणं इत्यादी सुविधा यामाध्यमातून देण्यात आल्या आहेत. इतकंच नाही तर आता बँकेने आर्थिक सेवादेखील सुरू केल्या आहेत. यामध्ये PSBs चे ग्राहक कुठल्याही शुल्काशिवाय या सुविधांचा लाऊ घेऊ शकतात.
Your bank is now at your doorstep. Register for doorstep banking today!
To know more: https://t.co/m4Od9LFR3G
Toll-Free no. 1800 1037 188 or 1800 1213 721#DoorstepBanking #DSB #Banking #CashWithdrawal pic.twitter.com/nlfBxfklnP
— State Bank of India (@TheOfficialSBI) January 23, 2021
SBI ने ग्राहकांसाठी सुरू केल्या या 9 सुविधा
– नकदी प्राप्ति (कॅश पिकअप)
– रोख वितरण (कॅश डिलिव्हरी)
– चेक मिळवणे (पिकअप)
– मागणी स्लिप तपासणे
– फार्म 15H पिकअप
– ड्राफ्ट वितरण
– मुदत ठेव माहिती (सल्ला) आणि वितरण
– जीवन प्रमाणपत्र पिकअप करणे
– केआयसी कागदपत्रांची निवड
या सेवेचा कोण घेऊ शकतं फायदा
एसबीआयच्या वेबसाइटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार, नेत्रहीन व्यक्ती आणि अपंग या सुविधेचा फायदा घेऊ शकतात. इतकंच नाहीतर 70 वर्षांपेक्षा जास्त वयाचे ज्येष्ठ नागरिकही या सेवेचा लाभ घेऊ शकतात. (online sbi start doorstep banking dsb services banking facility here is how it works)
संबंधित बातम्या –
आता 5, 10 आणि 100 च्या जुन्या नोटा होणार बाद, पण त्याआधी वाचा ‘हा’ नियम
‘या’ 3 बँकांमध्ये खातं असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी, RBI ने केली मोठी घोषणा
Special Story : पैशाला पैसा जोडून बक्कळ कमवाल, गुंतवणुकीआधी लक्षात असूद्या ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी
(online sbi start doorstep banking dsb services banking facility here is how it works)