6th Pay Commission बाबत मोठी बातमी, 1 जुलैपासून सर्व नियम लागू होणार

पंजाब सरकारने 6th Pay Commission विषयी मोठा निर्णय घेतलाय. कॅप्टन अमरिंदर सिंह सरकारने (Captain Amarinder Singh) 6 व्या वेतन आयोगच्या सर्व शिफारसी मान्य केल्याची घोषणा केलीय.

6th Pay Commission बाबत मोठी बातमी, 1 जुलैपासून सर्व नियम लागू होणार
Follow us
| Updated on: Jun 18, 2021 | 7:54 PM

नवी दिल्ली : पंजाब सरकारने 6th Pay Commission विषयी मोठा निर्णय घेतलाय. कॅप्टन अमरिंदर सिंह सरकारने (Captain Amarinder Singh) 6 व्या वेतन आयोगच्या सर्व शिफारसी मान्य केल्याची घोषणा केलीय. सरकारच्या या निर्णयामुळे 5.4 लाख कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे (Panjab CM Captain Amarinder Singh accept all recommendation of 6th Pay Commission).

अमरिंदर सिंह सरकारने 6 व्या वेतन आयोग 1 जुलै 2021 पासून सर्व शिफारसी लागू करण्याचे आदेश दिले आहेत. या शिफारसी 1 जानेवारी 2016 पासून लागू होणार आहेत. पंजाबच्या 6 व्या वेतन आयोगाने मे 2021 मध्ये राज्य कर्मचाऱ्यांचं वेतन दुप्पट करण्याची शिफारस केली होती. यानुसार मिनिमम पे स्केल 6,950 वरुन वाढवून 18,000 करण्याची शिफारस होती. वेतन आयोगाने याची अंमलबजावणी 1 जानेवारी 2016 पासून करण्याची मागणी केली होती.

हिमाचल प्रदेश सरकार देखील या शिफारशी लागू करणार

दरम्यान, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर म्हणाले, “पंजाबने नव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे हिमाचल प्रदेश सरकार देखील या शिफारशी लागू करेल. राज्य सरकार या शिफारशींचा लाभ राज्यातील कर्मचाऱ्यांना देईल. यासाठी संयुक्त समन्वय समितीची बैठक बोलावण्यात येणार आहे. त्या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या सर्व अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न केला जाईल.”

हिमाचलमधील राज्य सरकारने राज्यातील कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना मागील 3 वर्षांमध्ये 2402 कोटी रुपयांचा लाभ दिलाय. कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्याच्या रुपात 1140 कोटी रुपयांची आर्थिक मदत करण्यात आलीय.

ग्रॅच्युटीच्या रकमेत वाढ होणार

सरकारने 2003 ते 2017 या काळात निवृत्त झालेल्या नव्या पेंशन कर्मचाऱ्यांसाठी निवृत्ती आणि ग्रॅच्युटीत वाढ केलीय. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना जवळपास 110 कोटी रुपयांचा फायदा होणार आहे. सरकारने केलेल्या दाव्यानुसार, नव्या पेंशन योजनेनुसार मूळ वेतन, महागाई भत्ता आणि एनपीएत राज्याची भागेदारी 10 टक्क्यांवरुन वाढवून 14 टक्के करण्यात आलीय.

20 हजार कोटी रुपयांचा खर्च येणार

जयराम ठाकूर म्हणाले, “2021-2021 या आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पात 20 हजार कोटी रुपये कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि पेंशनवर खर्च होणार आहेत.” यावेळी त्यांनी कोरोना काळात सरकारी कर्मचाऱ्यांनी उत्तम काम केल्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत.

हेही वाचा :

Government Employee Salary Hike : 7 लाख सरकारी कर्मचाऱ्यांची लॉटरी लागणार, मेपासून नशिब उजळणार

व्हिडीओ पाहा :

Panjab CM Captain Amarinder Singh accept all recommendation of 6th Pay Commission

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.