Business Idea : महिन्याला 75000 हजारांची कमाई, सरकारचं आर्थिक पाठबळ; जाणून घ्या- नेमका व्यवसाय काय?

काही राज्यांत पर्यावरणास हानी पोहचविणाऱ्या प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी घालण्याचा देखील निर्णय घेण्यात आला होता. चालू जुलै महिन्यात प्लास्टिकपासून निर्मित बहुतांश प्लास्टिकच्या वस्तू बंदी कक्षेत असणार आहे.

Business Idea : महिन्याला 75000 हजारांची कमाई, सरकारचं आर्थिक पाठबळ; जाणून घ्या- नेमका व्यवसाय काय?
महिन्याला 75000 हजारांची कमाई, सरकारचं आर्थिक पाठबळImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jul 11, 2022 | 7:11 PM

नवी दिल्ली : तुम्ही व्यवसायाच्या नव्या कल्पनांच्या (New Business idea) शोधात असल्यास ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची ठरू शकते. तुमच्यासाठी कागदी पिशवी निर्मिती व्यवसायाची कल्पना सर्वोत्तम ठरू शकते. तुम्हाला कागदी पिशवी (Paper bag) व्यवसायासाठी प्राथमिक टप्प्यावर तुमच्या आर्थिक क्षमतेनुसार गुंतवणुकीचा टप्पा निवडावा लागेल. तुम्ही योग्य नियोजन, प्रभावी विपणन कौशल्याचा वापर केल्यास तुम्ही निश्चितच कमाई करू शकाल. प्लास्टिक पिशव्यांच्या (Plastic bag) वापरावर कठोर निर्बंध आणण्याच्या मानसिकतेत केंद्र व राज्य सरकार आहे. काही राज्यांत पर्यावरणास हानी पोहचविणाऱ्या प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी घालण्याचा देखील निर्णय घेण्यात आला होता. चालू जुलै महिन्यात प्लास्टिकपासून निर्मित बहुतांश प्लास्टिकच्या वस्तू बंदी कक्षेत असणार आहे. त्यामुळे छोट्या-मोठ्या व्यावसायिकांसोबतच सामान्य ग्राहकांचा कल प्लास्टिक पिशव्यांच्या वापराकडे असणार आहे.

तुमच्या कल्पनेवर केंद्राची ‘मुद्रा’

सध्या कागदी पिशव्यांच्या वापरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अनेक दुकानदारांनी थेट कागदी पिशवीतून ग्राहकांना थेट सामान उपलब्ध करण्यास सुरुवात केली आहे. प्रदूषणाला पायबंद घालण्यासाठी केंद्रासोबत राज्य सरकार विविध पर्यायांचा अवलंब करण्याच्या विचारात आहे. केंद्र सरकार कागदी पिशव्यांच्या निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी थेट अनुदान उपलब्ध करीत आहे. तुम्हाला केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी मुद्रा लोनच्या माध्यमातून आर्थिक मदतीची कवाडं थेट खुली होतील. व्यवसाय उभारणीसाठी 2% रक्कम गुंतवावी लागेल आणि 75% रकमेचा वाटा मुद्रा लोनच्या माध्यमातून उपलब्ध होईल. तुम्ही व्यवसाय करण्याच्या विचारात असल्यास मुद्रा लोनसाठी निश्चितपणे अर्ज करण्यास हरकत नाही.

नेमकी गुंतवणूक किती?

तुम्हाला कागदी पिशव्या बनविण्यासाठी मशीनचे सहाय्य घ्यावं लागेलं. सध्या बाजारात विविध प्रकारच्या पिशव्या निर्मिती करणारे मशीन आहेत. 2 लाखांपासून 8 लाखांपर्यंत मशीन आहेत. एका प्रकारच्या मशीनमधून 3-4 प्रकारच्या बॅग बनू शकतात. मशीन ठेवण्यासाठी स्वतंत्र जागा, विद्युत पुरवठा आणि आवश्यक असल्यास मनुष्यबळाची गरज भासू शकते.

हे सुद्धा वाचा

असा खर्च, असा नफा

कागदी पिशवी निर्मितीचं नेमकं गणित समजून घ्या. तुम्हाला 50-150 जीएसएम पेपर रोलची आवश्यकता असेल. सध्या बाजारात 30-35 रुपये प्रति किलो स्वरुपात कागदी रोल उपलब्ध आहेत. यासोबतच तुम्हाला डिंक आणि शाईची आवश्यकता निश्चितच असेल. तुम्हाला कागदी पिशव्या बनविण्यासाठी प्रति किलो 40 रुपयांचा अंदाजित खर्च अपेक्षित आहे. तुम्ही पिशव्यांचे विक्री मूल्य प्रति किलो 50 रुपये निश्चित केल्यास तुम्हाला 10 रुपयांचा नफा मिळू शकतो. तुमच्या कागदी पिशव्यांच्या निर्मिती क्षमतेनुसार उत्पादन निश्चित होऊ शकते. तुम्ही तासाला 550 रुपयांची कमाई करू शकतात. त्यामुळे महिन्याला 70-75 हजार रुपये निश्चित आहे. (Paper bag production will be best idea for new business start up)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.