NPS योजनेत आता मिळणार जास्त नफा, पैसे काढण्याच्या नियमातही बदल होणार

पेन्शन फंड नियामक विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सुप्रतिम बंडोपाध्याय यांनी एनपीएसमध्ये विविध बदल करण्यासंदर्भात सरकारशी चर्चा कली आहे. (Pension Regulator in talks with govt for NPS overhaul)

NPS योजनेत आता मिळणार जास्त नफा, पैसे काढण्याच्या नियमातही बदल होणार
EPFO ने घेतलेले पाच मोठे निर्णय
Follow us
| Updated on: Jun 14, 2021 | 11:44 AM

मुंबई : आता NPS म्हणजेच राष्ट्रीय पेन्शन योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना अधिक नफा मिळणार आहे. तसेच गुंतवणूकदार आता या योजनेंतर्गत अधिक पैसे काढू शकतील. नुकतंच पेन्शन फंड नियामक एनपीएसच्या नियमात बदल करण्यासाठी सरकारशी चर्चा करीत आहे. यानुसार करात अधिक सवल, विमा एजंट्सला प्रोत्साहन देणे यासारखे अनेक बदल केले जाणार आहे. ज्याचा थेट फायदा गुंतवणूकदारांना होणार आहे. (Pension Regulator in talks with govt for NPS overhaul)

पेन्शन फंड नियामक विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सुप्रतिम बंडोपाध्याय यांनी एनपीएसमध्ये विविध बदल करण्यासंदर्भात सरकारशी चर्चा कली आहे. त्यानुसार राष्ट्रीय पेन्शन योजना अधिक चांगली कशी करता येईल, याबाबत काही उपाययोजना केल्या जाऊ शकतात का? याबाबत चर्चा करण्यात आली. सध्या सरकारकडून या उपाययोजनांवर विचार केला जात आहे.

नफा वाढणार

नॅशनल पेन्शन योजनेतील बदलांनुसार आता गुंतवणूकदार आपला संपूर्ण निधी Systematic Withdrawal Plan मध्ये टाकू शकतात. त्यामुळे त्यांचा नफा वाढेल. सध्या, गुंतवणूकदार निवृत्तीच्या वेळेस केवळ 60 टक्के रक्कम काढू शकतात. तर उर्वरित रक्कमेतून त्यांना annuity काढावी लागते. त्यानुसार त्यांना आयुष्यभर ठराविक रक्कम मिळते.

कोणकोणते फायदे मिळणार?

आता आपल्याला 60 टक्के नव्हे तर संपूर्ण पैसे काढता येतील. एन्युटीला महागाईशी जोडल्यास अधिक परतावा मिळेल कर बचतीच्या रकमेची मर्यादा 50 हजार वरून 1 लाख रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता वाढत्या महागाईनुसार पेन्शनवर परतावा मिळणार ठराविक मर्यादेपर्यंत निवृत्तीवेतनाची रक्कम कर मुक्त करण्याचा विचार

एकत्र काढता येणार पूर्ण रक्कम

समजा तुमच्या एनपीएस अकाऊंटमध्ये 5 लाख रुपये आहेत, तर आता नव्या बदलानुसार तुम्हाल सर्व पैसे एकाच वेळी काढता येऊ शकता. असा नवा बदल लवकरच केला जाऊ शकतात. यामुळे ज्या गुंतवणूकदाराला गरज भासल्यास तात्काळ संपूर्ण पैसे काढता येतील. सध्या या प्रणालीअंतर्गत गुंतवणूकदारांना फक्त 5 टक्के परतावा मिळतो. यामुळे गुंतवणूकदार त्यात फारसा रस दाखवत नाहीत. मात्र नवीन बदलानंतर त्यात जास्त परतावा मिळल्यानंतर गुंतवणूकदारांची संख्या वाढेल.

करातही सवलत

जास्त नफा मिळण्याबरोबरच आता एनपीएस अंतर्गत अधिक कर बचत होईल. पीएफआरडीएने सरकारला दिलेल्या सूचनेनुसार, एनपीएसमध्ये गुंतवणूक करून कर बचतीच्या रकमेची मर्यादा सध्याच्या 50,000 रुपयांवरून वाढवून 1 लाखापर्यंत केली पाहिजे. ही मर्यादा दुप्पट झाल्यास कर बचतीत गुंतवणूकदारांनाही बराच फायदा होईल. येत्या काही दिवसात याबाबतची नवी अधिसूचना जारी केली जाईल, असे नियामकाचे म्हणणं आहे. लवकरच ही नवीन यंत्रणा कार्यान्वित होईल, असे सांगितले जात आहे.

(Pension Regulator in talks with govt for NPS overhaul)

संबंधित बातम्या : 

Petrol Diesel Price | पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ कायम, महाराष्ट्रात शंभरी पार, नवे दर काय?

निवृत्त झाल्यानंतर पीएफ खात्यातील पैशांवर व्याज मिळते? जाणून घ्या सर्वकाही

SBI ग्राहकांनो सावधान! ऑनलाईन बँकिंग करतेवेळी कधीही करु नका ‘हे’ काम, अन्यथा होईल मोठे नुकसान

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.