पेट्रोल, डिझेल दर वाढीसोबतच पुणेकरांना महागाईचा आणखी एक झटका; सीएनजीच्या भावात वाढ

एकीकडे देशभरात पेट्रल डिझेलचे दर दररोज वाढत आहेत. गेल्या 22 मार्चपासून इंधनाच्या किमतीमध्ये सातत्याने वाढ होत असतानाच आता पुणेकरांना आणखी एक मोठा झटका बसला आहे. तो म्हणजे शहरात सीएनजीच्या (CNG) दरात देखील वाढ करण्यात आली आहे.

पेट्रोल, डिझेल दर वाढीसोबतच पुणेकरांना महागाईचा आणखी एक झटका; सीएनजीच्या भावात वाढ
Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Apr 06, 2022 | 7:51 AM

पुण्यात (PUNE) महागाईचा (Inflation) भडका उडाला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ झाली आहे. आज पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेल प्रति लिटर मागे 85 पैशांनी महागल्याने पेट्रोल प्रति लिटर 119.96 रुपयांवर पोहोचले आहे. तर डिझेलने देखील शंभरी पार केली असून, डिझेल प्रति लिटर 102.67 रुपयांवर पोहोचले आहे. पुण्यात पावर पेट्रोल 124.46 रुपये लिटर मिळत आहे. एकीकडे देशभरात पेट्रल डिझेलचे दर दररोज वाढत आहेत. गेल्या 22 मार्चपासून इंधनाच्या किमतीमध्ये सातत्याने वाढ होत असतानाच आता पुणेकरांना आणखी एक मोठा झटका बसला आहे. तो म्हणजे शहरात सीएनजीच्या (CNG) दरात देखील वाढ करण्यात आली आहे. सीएनजीच्या दरात जवळपास सहा रुपयांनी वाढ झाली आहे. पूर्वी सीएनजी गॅसची किंमत प्रति किलो 62.20 रुपये एवढी होती. मात्र आता सीएनजीचे दर 68 रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. नवे दर मंगळवारी मध्यरात्रीपासून लागू करण्यात आले आहेत.

मुंबईत देखील दरवाढ

मुंबईत देखील सीएनजी आणि पीएनजीच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे. मुंबईत सीएनजीच्या दरात प्रति किलोमागे सात रुपयांची तर पीएनजीच्या दरात प्रति किलोमागे पाच रुपयांची वाढ करण्यात आली आहे. नव्या दरानुसार आता मुंबईत सीएनजीची किंमत प्रति किलो 67 रुपये एवढी झाली आहे. पूर्वी एक किलो सीएनजीसाठी साठ रुपये लागत होते. तर पीएनजीच्या दरात पाच रुपयांची वाढ करण्यात आली असून, पीएनजीची किंमत प्रति किलो 41रुपये एवढी झाली आहे. तर दुसरीकडे पुण्यात देखील सीएनजीच्या दरात प्रति किलोमागे सहा रुपयांची वाढ करण्यात आली आहे. आता पुण्यात सीएनजीचे दर प्रति किलो 68 रुपयांवर पोहोचले आहेत.

व्हॅटमध्ये कपात

राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पामध्ये सीएनजीवरील व्हॅट कमी करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार एक एप्रिलपासून सीएनजीवरील व्हॅट साडेतेरा टक्क्यांनी कमी करण्यात आल्याने सीएनजी प्रति किलोमागे सहा रुपयांनी तर पीएनजी साडेतीन रुपयांनी स्वस्त झाला होता. मात्र आता पुन्हा एकदा गॅस कंपन्यांनी सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ केल्याने स्वस्त सीएनजीचा आनंद नागरिकांना अवघे चार दिवसच मिळाला असेच म्हणावे लागेल.

संबंधित बातम्या

Petrol, diesel price: आज पुन्हा इंधनाच्या दरात वाढ, पेट्रोल, डिझेल 80 पैशांनी महाग

घरांच्या किमती वाढल्या; जाणून घ्या का वाढतायेत घरांचे दर?

15 दिवसांत 13 वेळा वाढ, प्रत्येकवेळी 80 पैशांची भर टाकण्यामागचं नेमकं कारण काय? उत्तर मिळालंय!

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.