…म्हणून मोदी सरकार इंधनावरील कर कमी करण्यासाठी अनुत्सुक?

Petrol & Diesel | केंद्र सरकार इंधनावरील अबकारी दरात कपात करेल, अशी चर्चा होती. जेणेकरून पेट्रोल-डिझेलचे दर 10 रुपयांनी कमी झाले असते. मात्र, मोदी सरकार सध्या इंधनावरील करात कपात करण्याच्या मानसिकतेत नाही.

...म्हणून मोदी सरकार इंधनावरील कर कमी करण्यासाठी अनुत्सुक?
पंतप्रधान नरेंद्र मोदी
Follow us
| Updated on: Jul 23, 2021 | 12:41 PM

नवी दिल्ली: देशातील इंधनाचे भाव गगनाला भिडल्याने केंद्रातील मोदी सरकार सामान्य जनता आणि विरोधकांच्या टीकेच्या केंद्रस्थानी आहे. सरकारने तातडीने हस्तक्षेप करुन इंधनाचे दर कमी करावेत, अशी मागणी सातत्याने होत आहे. मात्र, मोदी सरकारचा सध्याचा एकूण नूर पाहता जनतेला आणखी काही दिवस पेट्रोल-डिझेलची दरवाढ सहन करावी लागू शकते.

केंद्र सरकार इंधनावरील अबकारी दरात कपात करेल, अशी चर्चा होती. जेणेकरून पेट्रोल-डिझेलचे दर 10 रुपयांनी कमी झाले असते. मात्र, मोदी सरकार सध्या इंधनावरील करात कपात करण्याच्या मानसिकतेत नाही.

केंद्र सरकारने अबकारी दरात कपात केल्यास पेट्रोल-डिझेल दहा रुपयांनी स्वस्त होईल. मात्र, त्यामुळे महागाई दरात जास्तीत जास्त 0.2 टक्क्यांचीच घट होईल. याउलट सरकारच्या तिजोरीतील महसूल 0.58 टक्क्यांनी कमी होईल. त्यामुळे इंधनाच्या करकपातीचा विशेष फायदा होणार नाही. परिणामी मोदी सरकार यासाठी फार अनुकूल नाही. तसेच इंधनावरील करकपातीमुळे महसूल कमी होईल. सध्याच्या आर्थिक संकटाच्या काळात ही गोष्ट केंद्र सरकारसाठी चांगली नाही. त्यामुळे इंधनाच्या दरातील कपात आणखी काही दिवस लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत.

पेट्रोल-डिझेलच्या किंमती सलग पाचव्या दिवशी स्थिर

गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चढता आलेख असलेले इंधनाचे दर आता स्थिरावले आहेत. गेल्या पाच दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. मुंबईत सध्या प्रतिलीटर पेट्रोलसाठी 107.83 रुपये तर डिझेलसाठी 97.45 रुपये मोजावे लागत आहेत. यापूर्वी 17 जुलै रोजी इंधनाच्या दरात शेवटची दरवाढ नोंदवली गेली होती.

पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका संपल्यानंतर देशातील इंधनाच्या दराने वरच्या दिशेने प्रवास सुरु केला होता. 4 मेपासून आतापर्यंत पेट्रोलच्या दरात तब्बल 11 रुपयांची वाढ झाली आहे. इंधन दरवाढीमुळे इतर गोष्टींच्या किंमतीवरही परिणाम पाहायला मिळत आहे.

संबंधित बातम्या:

पेट्रोल-डिझेल पाठोपाठ आता सीएनजीच्या किंमतीही भडकल्या, पाहा किलोमागे किती रुपयांची वाढ…

CNG Price Hike Mumbai: मुंबईत CNG आणि पाईप गॅसच्या दरात वाढ

ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी सहज मिळू शकते 2 कोटींपर्यंत कर्ज, जाणून घ्या याबद्दल सर्वकाही

(Modi govt will not cutdown taxes on petrol and Diesel)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.