Petrol Diesel Price | इंधन दरवाढीचा भडका, महाराष्ट्रात पेट्रोल शंभरी पार, नवे दर काय?

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत (Petrol Diesel Rate) सातत्याने वाढ होत आहे. (Petrol Diesel Price Fuel Rate Today 07 June 2021)

Petrol Diesel Price | इंधन दरवाढीचा भडका, महाराष्ट्रात पेट्रोल शंभरी पार, नवे दर काय?
Follow us
| Updated on: Jun 07, 2021 | 11:37 AM

मुंबई : आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. याचा परिणाम देशांतर्गत बाजारात (Domestic Market) इंधनाच्या दरावरही झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत (Petrol Diesel Rate) सातत्याने वाढ होत आहे. देशभरातील विविध शहरांमध्ये आज (सोमवार, 7 जून 2021) पेट्रोल दरात प्रतिलीटर 28 पैशांनी वाढ झाली आहे. तर डिझेलचा दरही 27 पैशांनी वाढला आहे. (Petrol Diesel Price Fuel Rate Today 07 June 2021)

सध्या बऱ्याच शहरांमध्ये पेट्रोलची किंमत प्रतिलीटर 100 रुपयांच्या पलीकडे गेली आहे. तर डिझेलची किंमत ही प्रतिलीटर 90 रुपयांच्या पुढे गेली आहे. गेल्या 21 दिवसांपासून पेट्रोल-डिझेलची किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. आतापर्यंत पेट्रोल प्रतिलीटर 4.99 रुपयांनी महाग झाले आहे. तर डिझेल प्रतिलीटर 5.44रुपयांनी महाग झाले आहे.

मुंबई-पुण्यासह अनेक शहरात पेट्रोलचं शतक

मुंबई, पुण्यासह इतर शहरात पेट्रोलच्या दराने शतक गाठलं आहे. आज पुणे शहरात पेट्रोलचा दर हा शंभरच्या पुढे गेला आहे. सध्या पुणे शहरात पेट्रोल हे प्रतिलीटर 101.38 रुपये इतका झाला आहे. तर डिझेलचा दर हा 91.94 रुपये इतका आहे. त्याशिवाय मुंबईत पेट्रोलने शंभरी ओलांडली आहे. मुंबईत पेट्रोल हे 100.98 रुपये प्रतिलीटर इतक्या दराने विकले जात आहे. तर मुंबईत डिझेलचा दर 92.99 रुपये एवढा आहे.

महाराष्ट्रातील जिल्ह्यांचे पेट्रोल-डिझेलचे दर

क्रमांक शहरे पेट्रोल (रुपये) डिझेल (रुपये)
1 अहमदनगर ₹ 101.13 ₹ 91.69
2 अकोला ₹ 100.85 ₹ 91.46
3 अमरावती ₹ 102.01 ₹ 92.57
4 औरंगाबाद ₹ 102.17 ₹ 94.18
5 भंडारा ₹ 101.75 ₹ 92.33
6 बीड ₹ 101.19 ₹ 91.76
7 बुलडाणा ₹ 102.28 ₹ 92.81
8 चंद्रपूर ₹ 101.61 ₹ 92.19
9 धुळे ₹ 101.28 ₹ 91.86
10 गडचिरोली ₹ 101.87 ₹ 92.45
11 गोंदिया ₹ 101.81 ₹ 92.38
12 मुंबई उपनगर ₹ 101.09 ₹ 93.09
13 हिंगोली ₹ 102.14 ₹ 92.70
14 जळगाव ₹ 101.46 ₹ 92.02
15 जालना ₹ 102.08 ₹ 92.62
16 कोल्हापूर ₹ 100.92 ₹ 91.52
17 लातूर ₹ 101.90 ₹ 92.46
18 मुंबई शहर ₹ 100.98 ₹ 92.99
19 नागपूर ₹ 100.99 ₹ 91.60
20 नांदेड ₹ 103.27 ₹ 93.78
21 नंदूरबार ₹ 101.91 ₹ 92.47
22 नाशिक ₹ 101.36 ₹ 91.92
23 उस्मानाबाद ₹ 101.41 ₹ 91.99
24 पालघर ₹ 100.75 ₹ 91.31
25 परभणी ₹ 103.30 ₹ 93.79
26 पुणे ₹ 101.38 ₹ 91.94
27 रायगड ₹ 100.68 ₹ 91.24
28 रत्नागिरी ₹ 101.80 ₹ 92.31
29 सांगली ₹ 100.73 ₹ 91.35
30 सातारा ₹ 101.66 ₹ 92.24
31 सिंधुदुर्ग ₹ 102.47 ₹ 93.01
32 सोलापूर ₹ 101.11 ₹ 91.71
33 ठाणे ₹ 100.68 ₹ 91.24
34 वर्धा ₹ 101.01 ₹ 91.61
35 वाशिम ₹ 101.60 ₹ 92.19
36 यवतमाळ ₹ 102.28 ₹ 92.84

दररोज 6 वाजता किमती बदलतात

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होत असतात. पेट्रोल डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत, यावर पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात.

पेट्रोल डिझेलचे दर अशा प्रकारे तपासा

एसएमएसद्वारे आपण पेट्रोल डिझेलची किंमत शोधू शकता. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल डिझेलचे दर अद्ययावत केले जातात. इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार, आपल्याला आरएसपीसह आपला शहर कोड टाइप करावा लागेल आणि 9224992249 या क्रमांकावर एसएमएस पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे. आपण हे आयओसीएल वेबसाईटवरून पाहू शकता.

त्याच वेळी, आपल्या शहरातील पेट्रोल डिझेलची किंमत आपण बीपीसीएल ग्राहक RSP 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक यांना 9222201122 संदेश पाठवून जाणून घेऊ शकता.  (Petrol Diesel Price Fuel Rate Today 07 June 2021)

संबंधित बातम्या : 

PHOTO | दर महिन्याला LIC मध्ये करा 3810 रुपयांची गुंतवणूक, 25 वर्षात मिळतील 77 लाख

महागाईचा भडका, इंधनदरवाढीपाठोपाठ खाद्यतेलाच्या किंमती गगनाला, दर काय?

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.