…म्हणून पेट्रोल-डिझेलचे दर वाढतायत, पेट्रोलियम मंत्र्यांनी सांगितले कधी होणार स्वस्त?

पेट्रोल, डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणल्यास त्यांचे दर कमी होऊ शकतात, असंही पेट्रोलियम मंत्र्यांनी सांगितलंय. dharmendra pradhan petrol diesel price

...म्हणून पेट्रोल-डिझेलचे दर वाढतायत, पेट्रोलियम मंत्र्यांनी सांगितले कधी होणार स्वस्त?
संग्रहित छायाचित्र.
Follow us
| Updated on: Jun 07, 2021 | 8:53 PM

नवी दिल्लीः केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्यानं देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीही भडकल्याचं सांगितलंय. अलिकडच्या काळात पेट्रोल, डिझेलच्या किमती वाढल्याचे धर्मेंद्र प्रधान यांनी कबूल केले. ते म्हणाले की, वस्तू व सेवा कर (GST) च्या कार्यक्षेत्रात पेट्रोल, डिझेल आणण्याबाबत कोणताही निर्णय जीएसटी कौन्सिलने घ्यावा. पेट्रोल, डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणल्यास त्यांचे दर कमी होऊ शकतात, असंही पेट्रोलियम मंत्र्यांनी सांगितलंय. (petrol diesel price hike dharmendra pradhan blames it on global crude oil price)

कच्च्या तेलाने प्रति बॅरल 70 डॉलर ओलांडले

पेट्रोलियम पदार्थांच्या किमतीत वाढ होण्यामागील मुख्य कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत 70 डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचली. त्यामुळे देशांतर्गत बाजारातही किमती वाढल्या, त्याचा ग्राहकांवर नकारात्मक परिणाम होत आहे. भारत आपल्या गरजेच्या 80 टक्के तेल आयात करतो.

पेट्रोल, डिझेल यांना जीएसटीच्या कक्षेत आणणे आवश्यक

पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ करण्याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर पेट्रोलियम मंत्री देत ​​होते. वडोदरास्थित इंडियन ऑईल कॉर्पोरेशन (IOC) च्या विस्तारासंदर्भात गुजरात सरकार आणि IOC यांच्यात सामंजस्य करार झालेल्या प्रसंगी धर्मेंद्र प्रधान गांधीनगरला पोहोचले होते. पेट्रोल, डिझेल यांना जीएसटीच्या कक्षेत आणण्याच्या आपल्या भूमिकेबद्दल विचारले असता, जनतेला इंधनाच्या वाढत्या किमतीपासून दिलासा मिळावा, यासाठी तसं करणं आवश्यक असल्याचंही त्यांनी सांगितलंय.

राजस्थानमध्ये आता डिझेलची किंमतही 100 रुपयांच्या जवळपास

राजस्थानमध्ये पेट्रोलनंतर आता सोमवारी डिझेलची किंमतही प्रतिलिटर 100 रुपयांच्या जवळपास पोहोचलीय. आज पेट्रोल 28 पैसे प्रतिलिटर आणि डिझेल 27 पैसे प्रतिलिटर महागले. राजस्थानमधील श्रीगंगानगर जिल्ह्यात पेट्रोलची किंमत प्रतिलिटर 106.39 रुपये आणि डिझेलची किंमत प्रति लिटर 99.24 रुपयांवर पोहोचली. 4 मेपासून किमतींमध्ये ही 21 वी वाढ आहे, ज्यामुळे देशातील इंधनाच्या किमती ऐतिहासिक उच्चांकावर आहेत. राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि लडाख या सहा राज्यांत आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पेट्रोल प्रतिलिटर 100 रुपयांच्या वर विक्री करीत आहे. व्हॅट आणि फ्रेट शुल्कासारख्या स्थानिक करांच्या आधारावर इंधनाचे दर राज्यात वेगवेगळे असतात.

संबंधित बातम्या

Parle-G आता बिस्कीटशिवाय पीठ तयार करणार, ITC सह पतंजलीसारख्या ब्रँडला मिळणार टक्कर

Gold Price Today: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने स्वस्त, 10 ग्रॅम सोन्याचे दर जाणून घ्या

petrol diesel price hike dharmendra pradhan blames it on global crude oil price

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.