Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विधानसभा निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी इंधनाचे नवे दर जाहीर; जाणून घ्या आपल्या शहरातील पेट्रोल, डिझेलचे भाव

Petrol-Diesel Price : गुरुवारी पाच राज्यांच्या विधानसभेचा निकाल लागला. विधानसभेच्या निकालानंतर वाढत्या कच्च्या तेलाचे (Crude Oil) भाव पहाता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये (Petrol-Diesel Rates) दरवाढ होईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. आज पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे दर जाहीर करण्यात आले.

विधानसभा निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी इंधनाचे नवे दर जाहीर; जाणून घ्या आपल्या शहरातील पेट्रोल, डिझेलचे भाव
Follow us
| Updated on: Mar 12, 2022 | 9:33 AM

Petrol-Diesel Price : गुरुवारी पाच राज्यांच्या विधानसभेचा निकाल लागला. विधानसभेच्या निकालानंतर वाढत्या कच्च्या तेलाचे (Crude Oil) भाव पहाता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये (Petrol-Diesel Rates) दरवाढ होईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. विधासभा निकालाच्या दुसऱ्या दिवशी आज शनिवारी पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जाहीर करण्यात आले आहे. नव्या दरानुसार आज देखील पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या किमतीमध्ये कोणताही बदल करण्यात आला नसून, पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत. चार नोव्हेंबर 2021 रोजी पेट्रोल आणि डिझेलवरील कर कमी करण्यात आल्याने पेट्रोल प्रति लिटर मागे पाच रुपयांनी तर डिझेल दहा रुपयांनी स्वस्त झाले होते. त्यानंतर इंधनाचे दर स्थिर असून, त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

प्रमुख शहरातील इंधनाचे दर

ओसीएलकडून प्राप्त माहितीनुसार आज राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर प्रती लिटर 95.41 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 86.67 रुपये एवढा आहे. मुंबत पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे 109.98 व 94.14 रुपये एवढा आहे. कोलकातामध्ये एक लिटर पेट्रलसाठी 104.67 रुपये आणि डिझेलसाठी 89.79 रुपये आकारले जात आहेत. तर चेन्नईमध्ये एक लिटर पेट्रोलचा दर 101.40 रुपये तर डिझेलचा दर 91.43 रुपये एवढा आहे.

कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या

रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाचे दर सातत्याने वाढत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये कच्च्या तेलाचे दर 120 डॉलर प्रति बॅरलच्या पुढे पोहोचले आहेत. कच्च्या तेलाचे दर वाढत असल्याने पेट्रल, डिझेलची दरवाढ अटळी मानली जात आहे. पाच राज्यातील निवडणुका होताच दर वाढविले जातील असा अंदाज होता. मात्र आजही दर स्थिर ठेवण्यात आले आहेत.

संबंधित बातम्या

नव्या सरकारसमोर बिकट वाट; खर्च, कर्ज आणि वित्तीय तूट भरुन काढण्याचे आव्हान

निवृत्तीनंतर हक्काचा आधार; तुम्हाला ‘ईपीएस’बद्दल माहितीये का?

पतीकडून पत्नीला मिळणाऱ्या गिफ्टवर कर लागतो का? जाणून घ्या गिफ्टवरील कराबाबतचे महत्त्वपूर्ण नियम

महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य.
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया.
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं.
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल.