AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वर्षाअखेरपर्यंत पेट्रोल 125 रुपयांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज, तज्ज्ञांचं म्हणणं काय?

क्रूड ऑईलचे दर वर्षभरात 26 डॉलर प्रती बॅरलने वाढले. जून 2020 मध्ये क्रूड ऑईलचे दर 40 डॉलर इतके होते. आता हे दर 76 डॉलरपर्यंत पोहोचले आहते. जगभरात कच्च्या तेलाच्या दराने टेन्शन वाढवलं आहे.

वर्षाअखेरपर्यंत पेट्रोल 125 रुपयांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज, तज्ज्ञांचं म्हणणं काय?
पेट्रोल-डिझेल
| Edited By: | Updated on: Jun 25, 2021 | 10:59 AM
Share

Petrol Price Latest Update नवी दिल्ली : पेट्रोल-डिझेलच्या (Petrol Diesel) किमतींची घोडदौड सुरु आहे. पेट्रोलच्या दरांनी शंभरी ओलांडली आहे. त्यामुळे सर्वसामान्य वाहनचालक मेटाकुटीला आले आहेत. एकीकडे अशी परिस्थिती असताना दुसरीकडे सरकार तेल कंपन्यांकडे बोट दाखवून, इंधन दर जागतिक क्रूड ऑईलवर (crude oil prices) ठरत असल्याचं सांगत आहे. इंधनाचे दर कधी कमी होणार, दर कमी होणार की नाही, असे प्रश्न सर्वसामान्यांकडून विचारले जात आहेत. मात्र तज्ज्ञांच्या मते, इंधनाचे दर कमी होण्याची शक्यता कमीच आहे. (Petrol Price Diesel rates Latest Update no relief till this year prices may goes above 125 rupees)

क्रूड ऑईलचे दर वर्षभरात 26 डॉलर प्रती बॅरलने वाढले. जून 2020 मध्ये क्रूड ऑईलचे दर 40 डॉलर इतके होते. आता हे दर 76 डॉलरपर्यंत पोहोचले आहते. जगभरात कच्च्या तेलाच्या दराने टेन्शन वाढवलं आहे. आता सर्वांच्या नजरा 1 जुलैला होणाऱ्या OPEC+ देशांच्या बैठकीकडे लागल्या आहेत. यामध्ये उत्पादन धोरणावर निर्णय होणार आहे. रशिया क्रूड ऑईलचा पुरवठा वाढवण्याच्या बाजूने आहे.

125 रुपयांपर्यंत पेट्रोल दर पोहोचणार?

जर OPEC+ देशांच्या बैठकीत उत्पादन वाढवण्याचा निर्णय झाला, तर भारतात पेट्रोल-डिझेलचे दर कमी होऊ शकतात. मात्र तज्ज्ञांच्या मते, भारतात लॉकडाऊनमुळे घटलेला महसूल, डॉलरच्या तुलनेत घसरणारा रुपया, याचा दबाव सरकारवर आहे. त्यातच सरकारने सर्वांना मोफत कोरोना लस देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सरकारकडून इंधनाचे दर कमी केले जाण्याची शक्यता फारच कमी आहे. त्यामुळे सध्याच्या दरानुसार, डिसेंबरपर्यंत पेट्रोलचे दर प्रती लिटर 125 रुपयांपर्यंत पोहोचू शकतात, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

पेट्रोलचे दर आणखी वाढणार

तज्ज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीमधील वाढ कायम आहे. त्याचा थेट परिणाम भारतातील महागाई दरावर होत आहे. इंधनाचे दर वाढल्यामुळे त्याचा परिणाम सर्वांवर होतो. त्यातच महसूल घटल्यामुळे सरकारकडून दरात कपात करण्याची शक्यता कमी आहे. परिणामी पेट्रोलचे दर वाढणार असा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.

कच्चे तेल 100 डॉलरपर्यंत पोहोचणार?

कच्च्या तेलाच्या किमतीत जूनच्या सुरुवातीपासून तेजी पाहायला मिळत आहे. पाहता पाहता हे दर 76 डॉलरपर्यंत पोहोचले आहेत. पुढील वर्षापर्यंत कच्च्या तेलाचे दर 100 डॉलरपर्यंत पोहोचतील, असा अंदाज बँक ऑफ अमेरिकाने वर्तवला आहे.

इराण आणि अमेरिका वाद

इराणवर अमेरिकेने लादलेल्या बंधनामुळेही कच्च्या तेलाच्या किमतीत चढउतार होत राहतात. जर इराण आणि अमेरिका यांच्यात अणू कराराबाबत काही सहतमी झाली, तर अमेरिका इराणवरील बंधनं कमी करु शकते. त्यामुळे इराणकडून इंधनाचा पुरवठा वाढवला जाऊ शकतो. मात्र दोन्ही देशांकडून याबाबत अद्याप कोणत्याच हालचाली नाहीत.

संबंधित बातम्या

Investment tips : 1 लाख गुंतवले, 1.28 कोटी मिळाले, 20 वर्षात तगडे रिटर्न कसे मिळाले?

आजपासून 10, 20, 25, 30 वर्षांनंतर 1 कोटींची किंमत किती असेल? जाणून घ्या

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.