Petrol at 100: ऐन महागाईत पेट्रोलचंही शतक, 3 अंकी किंमतीमुळे पंप पडले बंद

महानगरांमध्ये तर इंधनाची किंमत 95 च्या पुढे गेली आहे. मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये प्रीमियम पेट्रोलची किंमत 100 रुपयांवर पोहोचली आहे.

Petrol at 100: ऐन महागाईत पेट्रोलचंही शतक, 3 अंकी किंमतीमुळे पंप पडले बंद
Petrol-Diesel Price Today
Follow us
| Updated on: Feb 14, 2021 | 2:29 PM

Petrol at 100 : गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत सातत्याने वाढ होताना दिसून आली. यामुळे बहुतेक शहरांमध्ये 90 च्या किंमती पोहोचल्या. महानगरांमध्ये तर इंधनाची किंमत 95 च्या पुढे गेली आहे. मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये प्रीमियम पेट्रोलची किंमत 100 रुपयांवर पोहोचली आहे. भोपाळमध्ये आज अतिरिक्त प्रीमियम पेट्रोलची किंमत प्रति लिटर 99.99 रुपये आहे. तर साध्या पेट्रोलची किंमत प्रतिलिटर 96.69 रुपयांवर पोहोचली आहे. यावेळी डिझेल 87.20 रुपये तर प्रीमियम डिझेलची किंमत 91.31 रुपयांवर गेली आहे. (petrol rate at 100 in many cities old pumps can not display 3 digits price)

असं पाहिला गेलं तर गेल्या सात दिवसात पेट्रोलच्या किंमतीत 2.08 रुपयांची वाढ झाली आहे तर डिझेलच्या किंमतीत प्रतिलिटर 2.23 रुपये वाढ झाली. आता फक्त फेब्रुवारी महिन्याबद्दलच बोलायचं झालं तर डिझेलच्या किंमतीमध्ये 2.58 रुपये आणि पेट्रोलमध्ये 2.43 रुपये प्रतिलिटर वाढ झाली. जागतिक बाजारपेठेतील तेजीमुळे स्थानिक शहरांमध्ये कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे भाव वाढवले.

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याचा थेट परिणाम पेट्रोल पंपांवर झाला आहे. कारण पेट्रोलच्या मशीनमध्ये 3 अंकी डिस्पेलच नाही आहे. त्यामुळे अनेक नागरिकांनी ऐन सुट्टीच्या दिवशी मनस्ताप सहन करावा लागत आहे.

आज दिल्लीत डिझेलच्या किंमतीत 29 पैशांची वाढ झाली आहे, तर इतर शहरांमध्येही किंमतींमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. दिल्ली आणि मुंबईमध्ये पेट्रोलची किंमत आत्तापर्यंतच्या उच्चांकी पातळीवर गेली आहे. इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार, रविवारी म्हणजेच आज दिल्लीत पेट्रोलची किंमत प्रति लिटर 88.73 रुपये आहे, तर मुंबईत 95.21 रुपये आहे. कोलकातामध्ये पेट्रोल दर प्रतिलिटर 90.01 रुपये तर चेन्नईमध्ये ते प्रति लिटर 90.96 रुपये आहे.

इतकंच नाहीतर आज दिल्लीत डिझेल 79 .0.०6 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. मुंबईत डिझेलचा दर प्रति लिटर 86.04 आहे, कोलकातामध्ये प्रतिलिटर 82.65 रुपये, चेन्नईमध्ये डिझेलचा दर प्रतिलिटर .1 84.१6 रुपये आहे.

प्रमुख शहरांमध्ये पेट्रोलचे दर

दिल्ली (Delhi Petrol Price Today): 88.73 रुपये प्रतिलिटर

मुंबई (Mumbai Petrol Price Today): 95.21 रुपये प्रतिलिटर

कोलकाता (Kolkata Petrol Price Today):90.01 रुपये प्रतिलिटर

चेन्नई (Chennai Petrol Price Today): 90.96 रुपये प्रतिलिटर

नोएडा (Noida Petrol Price Today): 87.50 रुपये प्रतिलिटर

प्रमुख शहरांमध्ये डिझेलचे दर

दिल्ली (Delhi Diesel Price Today): 79.03 रुपये प्रतिलिटर

मुंबई (Mumbai Diesel Price Today): 86.06 रुपये प्रतिलिटर

कोलकाता (Kolkata Diesel Price Today): 82.65 रुपये प्रतिलिटर

चेन्नई (Chennai Diesel Price Today): 84.16 रुपये प्रतिलिटर

नोएडा (Noida Diesel Price Today): 79.49 रुपये प्रतिलिटर

दररोज 6 वाजता किमती बदलतात

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होत असतात. पेट्रोल डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत, यावर पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात.

पेट्रोल डिझेलचे दर अशा प्रकारे तपासा

एसएमएसद्वारे आपण पेट्रोल डिझेलची किंमत शोधू शकता. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल डिझेलचे दर अद्ययावत केले जातात. इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार, आपल्याला आरएसपीसह आपला शहर कोड टाइप करावा लागेल आणि 9224992249 या क्रमांकावर एसएमएस पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे. आपण हे आयओसीएल वेबसाईटवरून पाहू शकता. त्याच वेळी, आपल्या शहरातील पेट्रोल डिझेलची किंमत आपण बीपीसीएल ग्राहक RSP 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक यांना 9222201122 संदेश पाठवून जाणून घेऊ शकता. (petrol rate at 100 in many cities old pumps can not display 3 digits price)

संबंधित बातम्या – 

तुम्ही या बँकेचे ग्राहक असाल तर लक्ष द्या, 1 मार्चपासून बँकेत होणार आहे मोठा बदल

SBI, HDFC बँक, ICICI आणि BOB ची स्पेशल FD ऑफर, जाणून घ्या डिटेल्स

Petrol Diesel Price: आठवड्याच्या शेवटीही पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या, इथे वाचा ताजे दर

(petrol rate at 100 in many cities old pumps can not display 3 digits price)

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.