प्रत्येक महिन्याला कमवा बक्कळ पैसा, Post Office ची खास योजना, वाचा किती होणार फायदा?

मासिक उत्पन्न योजना (POMIS) ही अशीच एक छोटी बचत योजना आहे. ज्यामध्ये तुम्हाला दरमहा पैसे मिळवण्याची संधी मिळते. या योजनेत गुंतवणूक करून तुम्ही दरमहा एक निश्चित रक्कम कमवू शकता.

प्रत्येक महिन्याला कमवा बक्कळ पैसा, Post Office ची खास योजना, वाचा किती होणार फायदा?
Follow us
| Updated on: Feb 28, 2021 | 9:28 AM

Post Office Monthly Income Scheme : पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करणं हा नेहमीच एक सुरक्षित पर्याय आहे. इथं आपले पैसे देखील सुरक्षित आहेत आणि आपल्याला चांगलं उत्पन्न मिळतं. मासिक उत्पन्न योजना (POMIS) ही अशीच एक छोटी बचत योजना आहे. ज्यामध्ये तुम्हाला दरमहा पैसे मिळवण्याची संधी मिळते. या योजनेत गुंतवणूक करून तुम्ही दरमहा एक निश्चित रक्कम कमवू शकता. या योजनेंतर्गत तुम्ही एकल किंवा संयुक्त खातं उघडू शकता आणि एकमुखी रक्कम जमा करू शकता. (post office monthly income scheme know all about interest rate benefits tenure all details)

गुंतवणूकीवर कमवा दरमहा

या खात्यात जमा झालेल्या, रकमेनुसार दरमहा तुमच्या खात्यात कमाईची रक्कम येतच राहते. या योजनेचा परिपक्वता कालावधी 5 वर्षांचा आहे. पण तो पुढे 5-5 वर्षांसाठी वाढवला जाऊ शकतो.

कोणताही भारतीय नागरिक पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेत गुंतवणूक करु शकतो. Post Office योजनेत गुंतवणुकीवर कोणताही धोका नाही. इथं तुमच्या गुंतवणुकीवर सरकारी सुरक्षेची 100 टक्के हमी आहे.

या योजनेतून चांगलं उत्पन्न मिळतं. ज्या ग्राहकांना दरमहा निश्चित उत्पन्न मिळवायचं आहे त्यांच्यासाठी पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेत गुंतवणूक करणं सगळ्यात फायदेशीर आहे. नोकरी सोडल्यानंतर किंवा सेवानिवृत्तीनंतर एकरकमी रक्कम मिळते त्यांच्यासाठी ही योजना अतिशय चांगली आहे. एकरकमी गुंतवणुकीद्वारे दरमहा निश्चित उत्पन्न मिळू शकते.

कसं उघडाल खातं ?

या योजनेंतर्गत खातं उघडण्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये बचत खातं असणं आवश्यक आहे. खातं उघडण्यासाठी तुम्हाला आयडी पुरावा द्यावा लागेल. यासाठी आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, डीएल किंवा पासपोर्ट द्यावं लागेल. पासपोर्ट आकाराचे 2 फोटो सुद्धा खातं उघडण्यासाठी महत्त्वाचे आहेत. अ‍ॅड्रेस प्रूफसाठी एखादं ओळखपत्र, लाईट बिल, नगरपालिका बिल, निवासी प्रमाणपत्र किंवा शासकीय विभागाने दिलेला अन्य पुरावा असावा.

तुम्हाला कसा मिळेल फायदा ?

पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेसाठी चालू तिमाहीत सरकारने वार्षिक व्याज दर 6.6 टक्के निश्चित केला आहे. म्हणजे जर तुम्ही योजनेत 9 लाख रुपये जमा केले तर या रकमेवरील 6.6 टक्के वार्षिक व्याजदराप्रमाणे एकूण व्याज 59,400 रुपये असणार आहे.

जर ही रक्कम वर्षाच्या 12 महिन्यांत विभागली गेली तर दरमहा व्याज सुमारे 4950 रुपये असेल. एकाच खात्यातून तुम्ही 4,50,000 लाख रुपयांच्या गुंतवणूकीवर दरमहा व्याज म्हणून 2475 रुपये कमवाल. (post office monthly income scheme know all about interest rate benefits tenure all details)

संबंधित बातम्या – 

लवकरच सुरू होणार अपघात पॉलिसीची विक्री, 1 कोटी रुपयांपर्यंत विमा, वाचा सविस्तर

फक्त 94 रुपयांमध्ये मिळेल गॅस सिलेंडर, आज आहे शेवटची संधी; ‘असा’ करा बूक

Petrol-Diesel Price Today : राज्यात आज पेट्रोल स्वस्त की महाग? वाचा आजचे दर

SBI ची विशेष योजना सुरू; 5000 रुपयांच्या गुंतवणुकीवर लाखोंचा फायदा

(post office monthly income scheme know all about interest rate benefits tenure all details)

Non Stop LIVE Update
'भाजपनं शब्द मोडला; त्यांनी आता मौलानाचा फोटो..', मनसे नेत्याची टीका
'भाजपनं शब्द मोडला; त्यांनी आता मौलानाचा फोटो..', मनसे नेत्याची टीका.
मनसेचं इंजिन राज ठाकरेंच्या हातून जाणार? एकही विजय नाही, फटका बसणार?
मनसेचं इंजिन राज ठाकरेंच्या हातून जाणार? एकही विजय नाही, फटका बसणार?.
अजित पवारांचा पवार गटाच्या विजयी उमेदवाराला फोन... दादा काय म्हणाले?
अजित पवारांचा पवार गटाच्या विजयी उमेदवाराला फोन... दादा काय म्हणाले?.
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार.
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात.
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?.
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी.
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?.
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?.
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'.