AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आजच करा जनधन खात्याशी Aadhaar लिंक, मिळतील 5000 रुपये

ओव्हरड्राफ्ट सुविधेमध्ये खातेधारक तेव्हाच पैसे काढू शकतो, जेव्हा त्याच्या खात्यात पैसे नसतील. म्हणजे ग्राहकाच्या खात्यामध्ये शुन्य बॅलेंस असेल तेव्हा या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.

आजच करा जनधन खात्याशी Aadhaar लिंक, मिळतील 5000 रुपये
| Edited By: | Updated on: Oct 14, 2020 | 8:19 AM
Share

नवी दिल्ली : प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत (Pradhan Mantri Jan Dhan Yojana) देशातील गरिबांचे खाते हे शून्य रक्कमेसह (Zero balance) बँक, पोस्ट ऑफिस आणि राष्ट्रीयकृत बँकांमध्ये उघडलं जातं. या योजनेअंतर्गत उघडण्यात आलेल्या खात्यावर ग्राहकांना अनेक सुविधा उपलब्ध आहेत. सगळ्यात खास वैशिष्ट्य म्हणजे तुमच्या खात्यामध्ये जरी पैसे नसले तरी तुम्ही 5 हजार रुपये बँकेतून काढू शकता. नागरिकांना आर्थिक नफा देणारी ही योजना सगळ्यांच्या फायद्याची आहे. जाणून घेऊयात नेमकी काय आहे ही योजना आणि कसा मिळवाल फायदा. (pradhan mantri jandhan account how to get overdraft facility of rs 5000)

कशी मिळणार 5 हजार रुपये काढण्याची सुविधा? प्रधानमंत्री जनधन योजनेचा (PMJDY) लाभ फक्त त्याच नागरिकांना मिळेणार त्यांचं अकाऊंट आधारशी लिंक आहे. या योजनेत ग्राहकांना अकाऊंटमधून 5000 रुपये ओव्हरड्राफ्ट करण्याची सुविधा मिळते. पण याचा फायदा करून घेण्यासाठी तुमचं अकाऊंट हे आधारशी लिंक असं आवश्यक आहे. देशातल्या प्रत्येक नागरिकाचं बँकेमध्ये खातं असावं आणि त्यांना आर्थिक मदत व्हावी असं या योजनेचं उद्दिष्ट आहे. या योजनेअंतर्गत तुम्ही 10 वर्षांखालील मुलाचंही खातं उघडू शकता.

काय आहे ओव्हरड्राफ्ट सुविधा? ओव्हरड्राफ्ट सुविधेमध्ये खातेधारक तेव्हाच पैसे काढू शकतो, जेव्हा त्याच्या खात्यात पैसे नसतील. म्हणजे ग्राहकाच्या खात्यामध्ये शुन्य बॅलेंस असेल तेव्हा या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सुविधेचा लाभ घेण्यासाठीदेखील तुम्हाला आधार अकाऊंटशी लिंक असणं महत्त्वाचं आहे.

ओव्हरड्राफ्ट सुविधेचा लाभ घेण्यासाठीच्या अटी या सुविधेच लाभ घेण्यासाठी खातेधारकाला पहिल्या 6 महिन्यापर्यंत खात्यामध्ये पुरेसे पैसे ठेवणं आवश्यक आहे. या दरम्यान, ग्राहकांना बँकेत वेळीवेळी व्यवहारही करावा लागेल. अशा खातेधारकांना बँकेकडून डेबिट कार्ड दिलं जातं, ज्याने तुम्ही खात्यामध्ये व्यवहार करू शकता. (pradhan mantri jandhan account how to get overdraft facility of rs 5000)

खातं उघडण्यासाठी आवश्यक कागदपत्रं प्रधानमंत्री जनधन योजनेत (PMJDY) खातं उघडण्यासाठी आधार कार्ड किंवा पासपोर्ट किंवा ड्रायव्हिंग परवाना किंवा PAN कार्ड द्यावं लागेल तर मतदार कार्ड, NREGA जॉब कार्ड, प्राधिकरणाकडून जारी केलेले पत्र ज्यामध्ये तुमचं नाव, पत्ता आणि आधार नंबर लिहिलेला असतो. गजेटेड आफिसरद्वारे दिलेलं पत्र ज्यामध्ये खाते उघडण्यासाठी प्रमाणित फोटो असतो.

नवं खातं उघडण्यासाठी काय करावं? जर तुम्ही प्रधानमंत्री जनधन योजनेत खात उघडण्यासाठी इच्छूक असाल तर नजिकच्या बँकेमध्ये तुम्ही सहजपणे खातं उघडू शकता. यासाठी तुम्हाला बँकेत फॉर्म भरावा लागेल. ज्यामध्ये तुमचं नाव, मोबाइल नंबर, बँकेच्या शाखेचं नाव, अर्जदाराचा पत्ता, नामनिर्देशित, व्यवसाय / रोजगार आणि वार्षिक उत्पन्न आणि अवलंबून असलेल्यांची संख्या, एसएसए कोड किंवा प्रभाग क्रमांक, गाव कोड किंवा शहर कोड अशी माहिती द्यावी लागेल.

इतर बातम्या –

Gold Price: 3 दिवसांनी पुन्हा स्वस्त झालं सोनं, पाहा काय आहेत आजचे दर

पैसे कमवण्याची सुवर्णसंधी! 5 आणि 10 रुपयांची नाणी विका, लखपती व्हा

(pradhan mantri jandhan account how to get overdraft facility of rs 5000)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.