‘या” शेअरमध्ये गुंतवणूक केल्यानंतर आठवड्यात 50 टक्क्यांपेक्षा अधिक परतावा, दर 25 रुपयांपेक्षाही कमी

देशांतर्गत शेअर बाजारात सध्या चांगलीच वाढ होताना दिसतेय. त्यामुळेच कमी गुंतवणुकीत अधिक परतावा मिळवण्याचीही संधी तयार झालीय.

'या शेअरमध्ये गुंतवणूक केल्यानंतर आठवड्यात 50 टक्क्यांपेक्षा अधिक परतावा, दर 25 रुपयांपेक्षाही कमी
Follow us
| Updated on: Jun 10, 2021 | 5:46 PM

नवी दिल्ली : देशांतर्गत शेअर बाजारात सध्या चांगलीच वाढ होताना दिसतेय. त्यामुळेच कमी गुंतवणुकीत अधिक परतावा मिळवण्याचीही संधी तयार झालीय. शेअर बाजारात सध्या असाच एक शेअर आहे ज्यामध्ये गुंतवणूक केल्यास एका आठवड्यात 50 टक्क्यांपेक्षा अधिकचा परतावा मिळत आहे. यात स्मॉलकॅप शेअरमध्ये चांगला परताना मिळत आहे. शुगर सेक्टरच्या रेणुका शुगर्सच्या (Shree Renuka Sugars Limited) शेअरमध्ये आज (10 जून) 5 टक्क्यांपर्यंत अपर सर्किट लागलंय. बीएसईवर हा शेअर 52 आठवड्यांच्या नव्या उंचीवर पोहचलाय. सध्या या शेअरचे दर 22.80 रुपये आहेत. या शेअरने एका आठवड्यात 50 टक्क्यांपेक्षा अधिकचा फायदा दिलाय. त्यामुळे या शुगर कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना चांगलाच फायदा झालाय (Price of Shree Renuka Sugars Limited shares increase more than 50 percent).

रेणुका शुगर्सचा शेअर 12 महिन्यात 220 टक्क्यांपेक्षा अधिक वाढलाय. यावर्षीच्या सुरुवातीपासून या शेअरमध्ये 90 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली. यामुळे एका वर्षापूर्वी या शेअरमध्ये केलेली 15 लाख रुपयांची गुंतवणूक वाढून आता 15.60 लाख रुपये झालीय.

स्टॉकमध्ये वाढीचं कारण काय?

केंद्र सरकारने कार्बन उत्सर्जनात घट करण्यासाठी आणि आयातीवरील अवलंबन कमी व्हावं म्हणून पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल ब्लेंडिंग करण्याचं ध्येय गाठण्यासाठी 5 वर्षांची मुदत कमी करुन 2025 केलीय. त्यामुळे इथेनॉल निर्मिती करणाऱ्या शुगर सेक्टरच्या शेअरमध्ये मोठी वाढ होताना दिसत आहे.

गन्ने और गेहूं, टूटे चावल जैसे खराब हो चुके खाद्यान्न तथा कृषि अवशेषों से इथेनॉल निकाला जाता है. इससे प्रदूषण भी कम होता है और किसानों को अलग आमदनी कमाने का एक जरिया भी मिलता है.

स्टॉकमध्ये 50 टक्क्यांपेक्षा अधिकची वाढ

रेणुका शुगर्सच्या शेअरमध्ये एका आठवड्यात 52 टक्के वाढ पाहायला मिळाली. 2 जून 2021 रोजी शेअरचे जक 14.95 रुपये होते. आज याच शेअरचे दर 22.80 रुपये झालेत. किमतीतील ही वाढ 52 टक्के इतकी आहे.

सध्या पेट्रोलमध्ये जवळपास 8.5 टक्के इथेनॉल मिसळले जाते. 2014 पर्यंत हे प्रमाण 1-1.5 टक्केच होतं. इथेनॉलच्या खरेदीत 38 कोटी लिटरवरुन आता 320 कोटी लिटर अशी वाढ झालीय. जेव्हा इंधनात 20 टक्के इथेनॉल मिसळलं जाईल तेव्हा इथेनॉलच्या खरेदीत आणखी वाढ होईल.

रेणुका शुगरचा व्यवसाय किती?

रेणुका शुगर्स जगातील 11 शुगर मिल्सचं संचालन करते. रेणुका शुगरच्या सेंटर-साऊथ ब्राझिलमध्ये 4 आणि भारतात 7 मिल्स आहेत. या मिल्स इथेनॉल इंटीग्रेटेड आणि पावर जेनरेट करण्यासाठी सक्षम आहेत. त्यांच्या भारतात 2 मोठ्या पोर्ट बेस्ड शुगर रिफाइनरी देखील आहेत.

हेही वाचा :

मॅनेजमेंट बदलताच ‘या’ कंपनीचे शेअर होल्डर्स मालामाल, एका शेअरची किंमत 100 रुपयांहून कमी

अझीम प्रेमजींच्या विप्रोनं रचला इतिहास, पहिल्यांदाच बाजारमूल्य तीन लाख कोटींच्या पुढे

मुकेश अंबानींना एका दिवसात तब्बल 34,676 कोटी रुपयांचा नफा, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ पाहा :

Price of Shree Renuka Sugars Limited shares increase more than 50 percent

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.