AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ॲमेझॉनवरील बंपर सेलसाठी तयार रहा… iQoo च्या दमदार स्मार्टफोनवर 10 हजारांची सूट…

iQoo Neo 6 5G वर 3,000 रुपयांच्या इंस्टंट बँक डिस्काउंटनंतर हा स्मार्टफोन ग्राहकांना केवळ 29,999 रुपयांना खरेदी करता येणार आहे, तर iQOO Z6 Pro स्मार्टफोन या सेलमध्ये 23,999 रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो. Redmi 9 आणि Note 10 सीरीजवरही बेस्ट ऑफर येत आहेत. सध्या हा सेल ॲमेझॉनवर लाइव्ह झालेला नाही. परंतु लवकरच याची घोषणा होण्याचा अंदाज आहे.

ॲमेझॉनवरील बंपर सेलसाठी तयार रहा... iQoo च्या दमदार स्मार्टफोनवर 10 हजारांची सूट...
Image Credit source:
| Edited By: | Updated on: Jul 18, 2022 | 3:29 PM
Share

ॲमेझॉनवर (Amazon) सध्या प्राइम-डे सेल सुरू होण्यासाठी काही काळ अवकाश आहे. ॲमेझॉनच्या या सेलमध्ये ग्राहकांना iQoo स्मार्टफोनवर मोठी सूट मिळणार आहे. जर तुम्ही iQoo Z6 5G, iQoo Neo 6 5G आणि iQoo Z6 Pro खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही तुमच्यासाठी योग्य संधी आहे. तुम्हाला iQoo स्मार्टफोनवर 10,000 रुपयांपर्यंत सूटही मिळू शकते. iQoo Neo 6 5G 3,000 रुपयांच्या इंस्टंट बँक डिस्काउंटनंतर (Discount) 29,999 रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो, तर iQoo Z6 Pro सेलमध्ये 23,999 रुपयांना उपलब्ध केला जाउ शकतो. त्याच प्रमाणे iQoo Z6 5G स्मार्टफोन अवघ्या 14,999 रुपयांमध्ये खरेदी केला जाऊ शकतो. क्रेडिट कार्डच्या माध्यमातूनही भरघोस सूट देण्यात आली आहे. याशिवाय, निवडक स्मार्टफोनच्या (smartphones) मॉडेल्सवर एक्सचेंज देखील उपलब्ध आहेत.

iQoo Z6 5G वर बंपर सूट

iQoo Z6 5G (6GB+128GB) हा स्मार्टफोन ॲमेझॉनवरून 19 टक्के सवलतीनंतर 16,999 रुपयांमध्ये खरेदी केला जाऊ शकतो, तर iQoo Z6 Pro 5G (6GB+128GB) 14 टक्के सवलतीनंतर 23,999 मध्ये खरेदी केला जाऊ शकतो. याशिवाय, आयसीआयसीआय बँक क्रेडिट आणि डेबिट कार्ड व्यवहारांवर 3000 रुपयांची त्वरित सूट मिळू शकते.

Note 10 सीरीजवरही बेस्ट ऑफर

iQoo Neo 6 5G ची किंमत देखील 14 टक्क्यांपर्यंत कमी होणार असल्याचे बोलले जात आहे. सध्या हा फोन 5000 रुपयांच्या डिस्काउंटनंतर 29,999 रुपयांना खरेदी करता येईल. आयसीआयसीआय बँक क्रेडिट आणि डेबिट कार्डने पेमेंट करून 3000 रुपये डिस्काउंट मिळवता येणार आहे. तसेच, जर तुमचा जुना फोन चांगल्या स्थितीत असेल तर तुम्हाला यावर एक्सचेंज ऑफरमध्ये 11,950 रुपयांची सूट मिळू शकते. याशिवाय Redmi 9 आणि Note 10 सीरीजवरही बेस्ट ऑफर येत आहेत. सध्या हा सेल Amazon वर लाइव्ह झालेला नाही. परंतु लवकरच याची घोषणा होण्याचा अंदाज आहे. जर तुम्हाला सेलमध्ये फोन घ्यायचा असेल तर यासाठी ग्राहकांना काही काळ प्रतीक्षा करावी लागेल.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.