Budget 2022 | तिजोरीत गंगाजळीः मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्कातून सरकार मालामाल, एक लाख कोटींची कमाई
कोरोना महामारीचा फटका बसला असतानाही आणि बांधकाम क्षेत्राने पुन्हा आघाडी घेतल्याचे चित्र आहे. मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्कातून चालु आर्थिक वर्षातील आठ महिन्यांतील कमाईने सरकारला मालामाल केले.
मुंबई: कोरोनाच्या (Corona) पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत बांधकाम क्षेत्राला जबरी फटका बसला. अनेकाच्या नोक-या गेल्या. अनेकाच्या वेतनात कमालीची कपात करण्यात आली. त्यामुळे नोकरदारवर्ग नवीन घर खरेदी करण्यास धजावत नव्हता. त्यामुळे रिअल इस्टेट क्षेत्र काही काळासाठी कोमात गेल्यासारखे झाले होते. घराच्या किंमती आवाक्याबाहेर चालल्याने सर्वसामान्य नागरिक, नोकरदार चिंतेत आहेत. तर दुसरीकडे सिमेंट, विटा, लोखंडी साहित्य, टाईल्स आणि तत्सम वस्तुंच्या किंमती वाढत असल्याने कमी खर्चात बांधकाम कसे करावे या चिंतेत व्यावसायिक आहेत. कोरोनाचा परिणाम या क्षेत्रावर स्पष्टपणे दिसून येत आहे. सरकारने बांधकाम क्षेत्रासाठी विशेष प्रोत्साहन योजना जाहीर करावे, जेणेकरून यापूर्वीचे नुकसान भरून काढता येईल, अशी मागणी करण्यात येत आहे. अशा ही परिस्थितीत कोरोनाचा धक्का पचवत रिअल इस्टेट क्षेत्राने पुन्हा वेग घेतला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या आठ महिन्यांत म्हणजे 2021-22 मध्ये राज्यांनी मालमत्ता विक्रीवर मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क (Stamp Duty and Registration Charges) म्हणून 1,00,124.6 कोटी रुपये कमावले आहेत. हे गेल्या आर्थिक वर्षातील (2020-21) (Economic Year) कमाईच्या 79% इतके आहे. गेल्या आर्थिक वर्षात 1,27,759 कोटी रुपयांचा महसूल जमा झाला होता. मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेस (Motilal Oswal Financial Services) या ब्रोकरेज फर्मच्या अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे.
या अहवालानुसार, एप्रिल-नोव्हेंबर 2021 दरम्यान महसूल संकलनात महाराष्ट्र 17.1% आणि उत्तर प्रदेशचा 12.8% वाटा असून अनुक्रमे ही राज्ये पहिल्या आणि दुस-या स्थानावर आहे. महाराष्ट्राने 17,096.9 कोटी रुपये आणि उत्तर प्रदेशने12,785.6 कोटी रुपये जमा केले आहेत. गेल्या आर्थिक वर्षात महाराष्ट्र 19.9% च्या हिश्श्यासह प्रथम आणि उत्तर प्रदेश 12.9% सह दुस -या क्रमांकावर होता. महाराष्ट्रात 25,427 २५,४२७.७ कोटी रुपये आणि गेल्या तुलनेत 16,475.2 कोटी रुपये महसूल जमा झाला होता. एप्रिल ते नोव्हेंबर 2021 दरम्यान मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्कातून वसुलीच्या टक्केवारीत महाराष्ट्र 17.1, उत्तरप्रदेश 12.8, गुजरात 6.5, हरियाणा 5.0, मध्यप्रदेश 4.7, राजस्थान 3, बिहार 3, पंजाब2 2.1 इतका वाट आहे.
प्रमुख राज्यातील स्टाम ड्युटी व रजिस्ट्रेशनमधून कमाई
राज्य 20-21 मधील हिस्सा (कोटी) कमाई(%) 21-22 मधील हिस्सा(कोटी) कमाई(%) महाराष्ट्र 25,427.7 19.9 17,096.9 17.1 उत्तरप्रदेश 16,475.2 12.9 12,785.6 12.8 गुजरात 7,390.2 5.8 6,471.1 6.5 हरियाणा 5,157.0 4.0 4,989.0 5.0 मध्यप्रदेश 6,760.5 5.3 4,657.0 4.7 राजस्थान 5,297.3 4.1 3,925.4 3.0 बिहार 4,206.3 3.3 3,004.4 3.0 पंजाब 2,469.0 1.9 2,089.7 2.1 छत्तीसगड 1,584.9 1.2 1,032.3 1.0 झारखंड 708.1 0.6 601.7 0.6 सर्व राज्य 1,27,751.9 1,00,124.6 (कोटी रुपयांत)
संबंधित बातम्या :
BUDGET 2022: विमानतळ संख्येत दुप्पटीनं, सौर उर्जेत तिपटीनं वाढ; 4 वर्षात 3 कोटी घर उजळली!
कोरोनामुळे अडचणी वाढल्या, पण सर्वाधिक लसीकरण झालेल्या देशात भारत अग्रेसर: राष्ट्रपती रामनाथ कोविंद
विपुलच्या नोकरीच्या शोध संपेल ? काय आहेत नवपदवीधारकांच्या बजेटकडून अपेक्षा?