मोठी बातमी! यापुढे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे विलीनीकरण होणार नाही, मोदी सरकारचा निर्णय

सध्या शेतकरी कर्ज माफ करण्याची कोणतीही योजना नाही. किसान कर्जामध्ये एससी/एसटी शेतकऱ्यांना वितरित केलेल्या कर्जाचाही समावेश आहे, अशी माहितीही अर्थ राज्यमंत्र्यांनी दिली.

मोठी बातमी! यापुढे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे विलीनीकरण होणार नाही, मोदी सरकारचा निर्णय
पंतप्रधान नरेंद्र मोदी
Follow us
| Updated on: Aug 02, 2021 | 2:13 PM

नवी दिल्लीः सध्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या विलीनीकरणासाठी सरकारची कोणतीही योजना नाही, अशी माहिती अर्थ राज्यमंत्र्यांनी सभागृहात दिली. यासंदर्भात कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव दिलेला नाही. दोन बँकांचे खासगीकरण केले जाईल, हे आधीच 2021 च्या अर्थसंकल्पात जाहीर केले गेलेय.  सध्या शेतकरी कर्ज माफ करण्याची कोणतीही योजना नाही. किसान कर्जामध्ये एससी/एसटी शेतकऱ्यांना वितरित केलेल्या कर्जाचाही समावेश आहे, अशी माहितीही अर्थ राज्यमंत्र्यांनी दिली.

दोन बँका आणि सरकारी विमा कंपनीचे खासगीकरण करण्याची घोषणा

1 फेब्रुवारी 2021 रोजी अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दोन बँका आणि सरकारी विमा कंपनीचे खासगीकरण करण्याची घोषणा केली. सरकारने चालू आर्थिक वर्ष म्हणजेच 2021-22 साठी 1.75 लाख कोटी रुपयांचे निर्गुंतवणूक आणि खासगीकरणाचे लक्ष्य ठेवले. नीती आयोगाला खासगीकरणासाठी निवडीचे काम सोपवण्यात आले. सध्याच्या माहितीनुसार, इंडियन ओव्हरसीज बँक आणि सेंट्रल बँक ऑफ इंडियाची खासगीकरणासाठी निवड करण्यात आलीय. पण याची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.

मोदी सरकारने बँकांचे विलीनीकरण कधी केले?

केंद्रातील मोदी सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची स्थिती दोन वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये सुधारण्यासाठी बँक एकत्रीकरणाची प्रक्रिया स्वीकारली. 2019 मध्ये सार्वजनिक क्षेत्रातील 10 बँकांचे विलीनीकरण करण्यात आले. याअंतर्गत सहा कमकुवत बँकांचे चार मोठ्या बँकांमध्ये विलीनीकरण करण्यात आले. ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया पंजाब नॅशनल बँकेत विलीन झाल्यात. अलाहाबाद बँक इंडियन बँकेत विलीन झाली. सिंडिकेट बँक कॅनरा बँकेत विलीन झाली. आंध्र बँक आणि कॉर्पोरेशन बँक यांचे युनियन बँक ऑफ इंडियामध्ये विलीनीकरण झाले.

पहिल्या टप्प्यात एसबीआयमध्ये विलीनीकरण

पहिल्या टप्प्यात पाच सहयोगी बँकांचे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विलीनीकरण करण्यात आले. याशिवाय विजया बँक आणि देना बँक यांचे बँक ऑफ बडोदामध्ये विलीनीकरण करण्यात आले. सध्या देशात 12 सार्वजनिक क्षेत्रातील बँका आहेत.

विलीनीकरणाचा परिणाम आणि बँकांच्या 5 वर्षांत बँकांची जोरदार कमाई

विलीनीकरणाचा सकारात्मक परिणाम दिसू लागला आहे. विलीनीकरणानंतर बँकांची कमाई वाढलीय. कोरोना महामारी असूनही आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी पाच वर्षांत प्रथमच कमाई केली. फक्त पंजाब अँड सिंध बँक आणि सेंट्रल बँकेचे नुकसान झाले. गेल्या आर्थिक वर्षात 12 बँकांची एकूण कमाई 31,817 कोटी रुपये होती. बुडीत कर्जाची समस्या हळूहळू कमी होत आहे, ज्यामुळे बँकांची स्थिती सुधारत आहे. आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे एकूण नुकसान 26015 कोटी होते.

संबंधित बातम्या

कोटक महिंद्रा बँकेचं डिलाईट प्लॅटिनम क्रेडिट कार्ड; 4500 रुपयांपर्यंत पेट्रोलच्या सवलतीसह अनेक फायदे

पुरुष असो की स्त्री, ‘या’ कंपनीतील प्रत्येक कर्मचाऱ्याला 26 आठवड्यांची रजा!

Public sector banks will not be merged, Modi government’s decision

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.