IPO Tracker | मेडिकेअर लिमिटेडचा लवकरच आयपीओ, 2 हजार कोटींचे उद्दिष्ट

रेनबोच्या लहान मुलांसाठीच्या पहिल्या रुग्णालयाची हैदराबादमध्ये सुरुवात 1999 मध्ये झाली. जागतिक दर्जाची आरोग्य सुविधा प्रदान करण्यात कंपनीची ख्याती आहे. मल्टि स्पेशालिटी पीडियाट्रिक सर्व्हिसेस मध्ये जगभरात नावाजलेलं नाव आहे. नवजात बालकांच्या जटिल विकारांवर उपचार करण्यासाठी कंपनीची ओळख आहे.

IPO Tracker | मेडिकेअर लिमिटेडचा लवकरच आयपीओ, 2 हजार कोटींचे उद्दिष्ट
LIC IPO च्या दमदार प्रदर्शनासाठी केंद्र सरकारचा टेकू
Follow us
| Updated on: Dec 28, 2021 | 7:48 AM

नवी दिल्ली : वर्ष 2021 प्रमाणेच आगामी वर्ष आयपीओचं राहण्याची शक्यता आहे. रेनबो चिल्ड्रनच्या (Rainbow Children) मेडिकेअर लिमिटेडने (Medicare Ltd) इनिशियल पब्लिक आॕफरिंग (IPO) द्वारे 2 हजार कोटी रुपये उभारण्याचा निर्णय घेतला आहे. प्राथमिक कागदपत्रे सेबीकडे सादर करण्यात आली आहेत. इंग्लंडमधील वित्तीय संस्था सीडीसी ग्रूप पीएलसीचे सहाय्य रेनबोला मिळाले आहे.

रेनबोच्या लहान मुलांसाठीच्या पहिल्या रुग्णालयाची हैदराबादमध्ये सुरुवात 1999 मध्ये झाली. जागतिक दर्जाची आरोग्य सुविधा प्रदान करण्यात कंपनीची ख्याती आहे. मल्टि स्पेशालिटी पीडियाट्रिक सर्व्हिसेस मध्ये जगभरात नावाजलेलं नाव आहे. नवजात बालकांच्या जटिल विकारांवर उपचार करण्यासाठी कंपनीची ओळख आहे.

पैशाचा विनियोग कशाप्रकारे?

पीटीआयच्या वृत्तानुसार, रेनबोच्या आयपीओची साईझ 2 हजार कोटींहून अधिक असण्याची शक्यता आहे. सार्वजनिक इश्यूच्या स्वरुपात 280 कोटी रुपयांपर्यंतच्या इक्विटी शेअर्सचे फ्रेश इश्यू आणि शेअरधारकांद्वारे 2.4 कोटी इक्विटी शेअर पर्यंत आॕफर सेल समाविष्ट आहे. प्रमोटर्स रमेश कंचारला, दिनेश कंचारला आणि आदर्श कंचारला तसेच गुंतवणूकदार सीडीसी ग्रुप, सीडीसी इंडिया ऑफर फॉर सेल द्वारे शेअर्सला ऑफलोड करतील.

रेनबो चिल्ड्रन मेडिकेअर फ्रेश इश्यू द्वारे मिळालेल्या रकमेचा वापर नॉन कन्व्हर्टिबल डिबेंचर्सला (NCD) तत्काळ रिडीम करण्याद्वारे नवीन रुग्णालयांची निर्मिती आणि नवीन रुग्णालयांसाठी वैद्यकीय उपकरणांच्या खरेदीसाठी केला जाईल.तसेच रकमेचा उपयोग सामान्य कॉर्पोरेट उद्देशासाठी देखील केला जाईल.

‘रेनबो’चा विस्तार:

रेनबोची भारतातील सहा शहरात 14 रुग्णालये आणि तीन क्लिनिक आहेत. एकूण 1500 बेडची क्षमता आहे. नवजात बालकांपासून विविध टप्प्यांवरील बालकांवर उपचारासाठी रेनबोची ख्याती आहे.

गुंतवणूकदारांचा ‘सर्वोच्च’ प्रतिसाद!

एका अहवालानुसार, वर्ष 2021 मध्ये 59 कंपनीच्या आयपीओ पैकी 36 कंपन्यांना दहा पट सबस्क्रिप्शन मिळाले आहे. त्यापैकी 6 कंपन्यांच्या आयपीओला 100 पटी पर्यंत सबस्क्रिप्शन मिळाले. 8 आयपीओला तीन पट आणि उर्वरित 15 कंपन्यांच्या आयपीओला तीन पटीपर्यंत सबस्क्रिप्शन मिळाले आहे. सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे आयपीओला रिटेल गुंतवणूकदारांची सर्वाधिक पसंती दिली आहे. एकूण इश्यू मध्ये रिटेलचा हिस्सा 10 पटीहून अधिक आहे.

आयपीओ म्हणजे काय?

आयपीओ म्हणजे इनिशियल पब्लिक आॕफर. कंपनीद्वारे मार्केटमध्ये पैसे गोळा/उभारण्याचा आयपीओ महत्वाचा मार्ग आहे.

संबंधित बातम्या :

पिळवणूकीविरोधात असंघटित कामगारांच्या आवाजाला धार, मोदी सरकारचे ‘समाधान’कारक पोर्टल

आरोग्य विमा काढताना काय काळजी घ्यावी?, जाणून घ्या या महत्त्वपूर्ण बाबी

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.